बाप्पाचा नैवेद्यः स्ट्रॉबेरी कलाकंद
स्ट्रॉबेरी कलाकंद
साहित्य:
स्ट्रॉबेरी क्रश १०० ग्रॅम,
पनीर १०० ग्रॅम,
साखर १०० ग्रॅम,
खवा १०० ग्रॅम,
वेलची पावडर,
बदाम काप
कृती:
मी तयार मॅप्रोचा स्ट्रॉबेरी क्रश वापरला पण ताज्या असतील तर जास्त चांगल्या!
खवा, साखर, पनीर आणि स्ट्रॉबेरी क्रश सर्व एका कढईत एकत्र करावे.
मंद गॅसवर ढवळत राहावे.
ताटाला तुपाचा हात लावून घ्यावा.
बदामाचे काप करावे.
मिश्रण घट्ट होऊ द्यावे. गोळा होऊ लागला की खाली उतरून वेलची पावडर घालावी, छान घोटावे.
गोळा झाला की ताटात थापावा.
बदामाच्या कापानी सजवून वड्या पाडाव्या. झटपट कलाकंद तयार आहे!
.
.
.

.
.

वाचने
12110
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
स्ट्रॉबेरी कलाकंद
In reply to स्ट्रॉबेरी कलाकंद by II श्रीमंत पेशवे II
हो नक्कीच
वा! झकास!
वा
छान!
मस्तच.
पटकन उचलून तोंडात घालावीशी
In reply to पटकन उचलून तोंडात घालावीशी by पूर्वाविवेक
नाही गं क्रश वापरलाय
छान पाकृ व रंगीत फोटू.
वाह मस्त
धन्यवाद!
छान
किती सुरेख रंग आलाय.
छान
In reply to छान by इडली डोसा
दूध पावडर?
In reply to दूध पावडर? by अनन्न्या
दूध पावडर
In reply to छान by इडली डोसा
खवा
सुंदर पाकृ !
सुंदर रंग, सुरेख पाकृ.
आहा! खासच.
आहा!!!