मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पाचा नैवेद्यः स्ट्रॉबेरी कलाकंद

अनन्न्या · · पाककृती
स्ट्रॉबेरी कलाकंद साहित्य: स्ट्रॉबेरी क्रश १०० ग्रॅम, पनीर १०० ग्रॅम, साखर १०० ग्रॅम, खवा १०० ग्रॅम, वेलची पावडर, बदाम काप कृती: मी तयार मॅप्रोचा स्ट्रॉबेरी क्रश वापरला पण ताज्या असतील तर जास्त चांगल्या! खवा, साखर, पनीर आणि स्ट्रॉबेरी क्रश सर्व एका कढईत एकत्र करावे. मंद गॅसवर ढवळत राहावे. ताटाला तुपाचा हात लावून घ्यावा. बदामाचे काप करावे. मिश्रण घट्ट होऊ द्यावे. गोळा होऊ लागला की खाली उतरून वेलची पावडर घालावी, छान घोटावे. गोळा झाला की ताटात थापावा. बदामाच्या कापानी सजवून वड्या पाडाव्या. झटपट कलाकंद तयार आहे! . 1 . . 1

वाचने 12110 वाचनखूण प्रतिक्रिया 21

मनिमौ Sat, 09/02/2017 - 23:05
क्रश ऐवजी स्ट्रॉबेरी वापरली तर छान आंबटगोड क्रंची चव येईल अस वाटतय. आता ताज्या बेरीज मिळाल्या की नक्की करून बघणार

इडली डोसा Sun, 09/03/2017 - 21:55
सोपी वाटतीय पाकृ, खव्या ऐवजी दुसरं काय घालता येईल? खवा इथे मिळणार नाही बहुतेक.

जुइ Sat, 09/09/2017 - 06:39
काय झटपट झाले आहे स्ट्राबेरी कलाकंद. नक्की करते!