Skip to main content

बाप्पाचा नैवेद्यः ऐरोळ्या

लेखक सूड यांनी बुधवार, 30/08/2017 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
ऐरोळ्या: साहित्यः बेसन एक वाटी कणीक अर्धी वाटी तांदूळ अर्धी वाटी अर्ध्या नारळाचं दूध साखर एक वाटी साजूक तूप मोहन आणि तळणीसाठी वेलदोडे पूड सजावटीला बदाम पिस्त्याचे काप चिमूटभर मीठ (ऐच्छिक) . 1 . . कृती: बेसन, कणीक, तांदूळ पिठी चाळून एकत्र मिसळावी. त्यात १ टेबलस्पून तूप तापवून मोहन घालावं. मोहन मिश्रणाला सगळीकडे एकसारखं लागलं की त्यात आधी नारळाचं घट्ट दूध मिसळावं, आणि नंतर मग पातळ दूध मिसळून भज्याच्या पीठापेक्षा किंचित घट्ट भिजवावं. नंतर कढईत तूप तापत ठेवून चमच्याने हे मिश्ररण सोडून ऐरोळ्या मंद आचेवर खरपूस तळाव्यात. साखरेचा गुलाबजामच्या पाकापेक्षा जरा घट्ट पाक करुन ठेवावा त्यात वेलदोडे पूड घालावी आणि खायला द्यायच्या पंधरा मिनिटं आधी ऐरोळ्या पाकात घालाव्यात. खायला देताना बदाम पिस्त्याचे काप पेरावेत. . 1 . (*मी वाचलेल्या पारंपारिक पद्धतीत तयार सरसरीत पीठातच सुका मेवा आणि पीठीसाखर घालून मग ते तळतात. मी हा थोडा बदल केला आहे.)

वाचने 17638
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

_/\_ शि.सा.न. तुला. सगळ्या बायकांना तू स्वयंपाकाच्या बाबत कॉम्प्लेक्स देऊ शकतोस. ही पारंपरिक मस्त पाकृ आहे. आणि करून बघावी असे वाटायला लागले आहे.

पैसाक्काला +१ मी तर बिगीनर लेवल ला हाय अजुन

भारीच की ! ते तेवढं चमच्यानं तेलात सोडतानाचा फोटो बरीक टाकला असतास तर पिठाचं टेकस्चर आणि हा शेप कसा आला ते नीट समजलं असतं :)

वाह्ह... हा पदार्थ मला ठावूक नव्हता ! [ आधी इथे याची पाकॄ वाचल्याचे तरी आता स्मरत नाही. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पेसालागी ऑर्डर कुट्टे... ;) BRAHMA

किती सुरेख. आता नक्की करुन पाहीन. पीठ तुपात सोडताना चमचा उभा धरला होतास का रे? मस्त एकावर एक लेअर आलेत. अगदी सावकाश सोड्लं आहेस वाटतं पीठ

In reply to by सविता००१

पीठाची सलग तार येईल ईतपतच पातळ करायचं, अगदी डोशाच्या पीठाइतकं पातळ करायचं नाही. आच मंद असल्याने तूप तापलेलं असलं तरी अगदी खदखदत नसतं. त्यामुळे चमच्याने अलगद सोडायला सुरुवात करायची आणि चमच्यातलं पीठ संपेस्तवर तिथल्या तिथेच किंचित गोलाकार फिरवल्यासारखं करत राहायचं मग असे वेटोळे येतात. नंतर पुन्हा कधी केल्या तर करतानाचे पण एकदोन फोटो टाकेन.

मस्तच दिसत आहेत. ह्या वर्षी पारंपरिक, अनवट प्रसाद येत आहेत बाप्पा करता हे बघून छान वाटते आहे. स्वाती

फार निगुतीने केलेला पदार्थ आहे, करून पहावा असा! अप्रतिम!

ऐरोळ्या खूपचं सुरेख दिसत आहेत. गुलाबासारखा आकार आला आहे ++११ सूडची पाकृ म्हणजे प्रश्नचं नाही देखणी असणारच :)

इतका गोंडस, नाजूक दिसणारा पदार्थ मोडून खायचा कसा!! अर्थात मी केला तर इतका सुबक न झाल्याने असा प्रश्न नाही पडणार म्हणा.. :D

सुरुवातीचं साहित्य वाचून वाटलं निनावं आहे कि काय.

अगदी नाविन्यपूर्ण पाकृ!! आवडली.