मिपावर खरेदीचे बरेच धागे आहेत.एवढ्यातच/हल्लीच काय खरेदी केलंत असे!
मग एवढ्यातच काय बचत केलीत असा धागा का असू नये? बचत सुध्दा महत्वाची आहेच की!
पैसा खेळता राहिला तरच अर्थव्यवस्था सुरळीत राहते हे खरं! पण खरेदीचा अतिरेक किंवा अनावश्यक खरेदी टाळता येऊ शकते का? किंवा तीच वस्तू कमी दरात कुठे मिळेल हे आधीच समजलं तर?आधी कळालं असतं तर थोडे पैसे वाचले असते ही चुटपूट मनाला लागून राहते.
कोणती खरेदी गरजेची आणि कोणती अनावश्यक हे व्यक्तीपरत्वे बदलू शकतं;पण वस्तूचं मोहक रुप किंवा अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी गरज नसताना खरेदीला उद्युक्त करु शकते.किंवा काही वेळा "तिच्याकडे आहे माझ्याकडे का नको?" ही ईर्षाही अशा अनावश्यक खरेदीला कारणीभूत ठरते.
मग यातूनच काही वेळा घरात वादही होतात.आधीची वस्तू असताना ही नवीन घेतल्यामुळे जोडीदाराची किंवा घरातल्या इतरांची चिडचिड होऊ शकते.
हौसेला मोल नसतं,पैसा खेळता राहिला तरच अर्थव्यवस्था टिकते हे ही खरं पण सध्या नोकर्या कमी होताहेत.अशा अनावश्यक खरेदीमुळे गरजेच्या गोष्टीला किंवा अचानक उद्भवणार्या खर्चासाठी पैसे कमी पडू शकतात.तो ताण असतोच.
किंवा पैसे जरी चिक्कार असले तरीही दिसेल ती प्रत्येक गोष्ट जराही विचार न करता खरेदी करुन जागा अडवण्यात किंवा ती काही दिवस वापरुन नंतर टाकून देऊन कचर्यात भर घालावी का?
मग बचत करण्यासाठी तुम्ही काय करता? अनावश्यक खरेदीचा मोह कसा टाळता? खरंच गरज आहे का हे कसं ठरवता?
हे झालं मानसिक नियंत्रणाबद्दल.पण प्रत्यक्ष कृती करुनही काही बचत करता येईल का?
घरात आधीच असलेल्या वस्तूंचा थोड्याशा दुरुस्तीने किंवा थोडी मॉडीफाय करुन नवीन वस्तूऐवजी जुन्याच वस्तूचं रुपांतर नवीन वापरयोग्य वस्तूत करणे(Recycle) हे प्रकार केले असतील तर तेही सांगा(फोटो टाकलेत तर अधिक चांगलं)
प्लॅस्टीक आणि पेट्रोल यांच्या वारेमाप उपयोगाबद्दल तर न बोलणं चांगलं!
थोडक्यात पैशांची बचत आणि वस्तूचं कचर्यात होणारं रुपांतर टाळण्यासाठी काय काय करता येऊ शकतं त्यावर चर्चा व्हावी.
त्यासाठी मात्र तुम्हाला तुमचा नेटचा थोडा बॅलन्स आणि प्रतिसादासाठी थोडाफार वेळ खर्च करावाच लागेल.त्याला पर्याय नाही!
वर्गीकरण
वाचने
9358
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप छान आणि महत्वाचा धागा.
सहमत
In reply to खुप छान आणि महत्वाचा धागा. by दुर्गविहारी
उलट वस्तू थोड्या कमी दर्जाची
In reply to सहमत by उपयोजक
आदी बचत करुन मग उरलेले पैसे
छान धागा. दहा एक वर्षांपासून
डीशवॉशर लिक्विड/ पावडर
In reply to छान धागा. दहा एक वर्षांपासून by रेवती
तूनळीवरील रेसिपी पाहून करणार
In reply to डीशवॉशर लिक्विड/ पावडर by अभिदेश
धन्यवाद
In reply to तूनळीवरील रेसिपी पाहून करणार by रेवती
खूप सुंदर धागा पण प्रति किया
रेवती तैंना खूप धन्यवाद
मग एवढ्यातच काय बचत केलीत?
अगदीच !
In reply to मग एवढ्यातच काय बचत केलीत? by अत्रे
उपयोगी धागा
मिपाचे मायबोली होणार लवकरच
स्पावड्या स्पावड्या लेका,
In reply to मिपाचे मायबोली होणार लवकरच by स्पा
वन स्पा'रो डज नॅाट मेक अ
In reply to मिपाचे मायबोली होणार लवकरच by स्पा
जुगाड
हिरो पॅशनप्रोचा एअर फिल्टर
In reply to जुगाड by उपयोजक
फोटो देत नाही कारण ह्याची ऑर्डर मिळेल
In reply to हिरो पॅशनप्रोचा एअर फिल्टर by अभ्या..
हिंदकेसरी आपला मोबाईल आणि
In reply to फोटो देत नाही कारण ह्याची ऑर्डर मिळेल by तुषार काळभोर
वा!
In reply to हिरो पॅशनप्रोचा एअर फिल्टर by अभ्या..
छान धागा
Buggati
अप्रतिम !
In reply to Buggati by कपिलमुनी
बुगाटी
In reply to Buggati by कपिलमुनी
२०१४ मध्ये
घराच्या गुंतवणूकीचं व्याज
In reply to २०१४ मध्ये by विटेकर
धागा आवडला
छान मुद्दा!
In reply to धागा आवडला by पैसा
याच विषयाशी मिळताजुळता
बाथरुमच्या टाईल्स मधून लिकेज
धागा चांगला आहे
सध्या
५.५. लाखात नवीन पेट्रोल गाड़ी
रिफर्बिश्ड म्याकबुक प्रो घेऊन
पुण्यात डाळीच्या
आधी गुंतवणूक .. मग उरलेल्यात ऐश
वा वा
In reply to आधी गुंतवणूक .. मग उरलेल्यात ऐश by अमर विश्वास