८/१० दिवसापुर्वी मला कोटक बँकेचा ई-मेल आलाय.. एक एक्सेल sheet पाठवली ...ज्यात २००७-२०११ चे क्रेडिट कार्ड चे statement आहे... माझे नाव/पत्ता काहीही नाही त्या एक्सेल sheet मध्ये.. ५/६ दिवसापासून सारखे कॉल्स ही येताहेत... नाव माझेच सांगतात ( त्याच्या डेटा मध्ये माझे middle नाव नाहीये ...) आणि address ही माझाच सांगत आहेत.. RBS ने त्यांचा business phoenix arc ला आणि phoenix arc ने कोटक ला विकलाय असे सांगत आहेत.. आणि त्या क्रेडिट कार्ड बॅलन्स नुसार १ लाख रुपये माझ्याकडे येणे आहेत असे म्हणत आहेत.. मी त्यांना सांगतोय कि जर मी असे काही कार्ड घेतलेच नाही तर पैसे का भरू? त्यांनी मला ID आणि ऍड्रेस प्रूफ मेल ने पाठवा असे सांगितले...मी ते नाही पाठवले...कारण हे लोक काही misuse करतील असे वाटतेय.. काल त्यांचा माणूस घरी येऊन माझे documents चेक करणार होता...पण दिवसभरात ४/५ वेळेस वेगवेगळे time सांगून ही नाही आला.. मी त्यांना सांगितले होते कि मी कुठल्याही document ची कॉपी तुम्हाला देणार नाही...फक्त तुम्ही तुमच्या कडील क्रेडिट कार्ड अँप्लिकेशन फॉर्म वर असलेले डिटेल्स ( पूर्ण नाव , फोटो, pan नंबर , जन्मतारीख , ऍड्रेस प्रूफ इत्यादी ) माझ्या documents शी पडताळून बघा... पण त्यांचा माणूस नाही आला... ईमेल " कोटक.कॉम " अश्या खऱ्या डोमेन वरून आलीये...आणि त्यात कोटक बँकेचा नगर रोड पुणे चा खरा पत्ता ही आहे ( signature मध्ये) पण phone करतांना ते लोक कायम mobile वरून करत आहेत... कुणा मिपाकरांस असा काही अनुभव आलाय का? मी आता ते सगळे नंबर ब्लॉक केलेत आणि ए-मेल ला उत्तर देणे बंद केले आहे...
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
4831
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॉक्युमेंट्स देऊ नका
जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ता
स्वतः पोलीस आहे असे सांगणे
In reply to जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ता by सुबोध खरे
गुन्हा कोण दाखल करणार?
In reply to स्वतः पोलीस आहे असे सांगणे by वाल्मिकी
पोलीस स्टेशनात ड्युटी आहे
In reply to स्वतः पोलीस आहे असे सांगणे by वाल्मिकी
सिद्ध कसा करणार?
In reply to स्वतः पोलीस आहे असे सांगणे by वाल्मिकी
स्वतः पोलीस आहे असे सांगणे
In reply to स्वतः पोलीस आहे असे सांगणे by वाल्मिकी
कुठलीही बँक एक्सेल शीट ईमेल
हा शुद्ध
ज्या बँकेतूं मेल आली आहे त्या
८/१० दिवसापुर्वी मला कोटक
हा fraud आहे. कोणतेही
kotak.bank.in
असा इमेल असायला हवा. नाहीये. fraud आहे. पुढे चला.
मला आय शी आय शी आय ने
काही वर्षापुर्वी पिडले होते. दोन हजार तेरा मधे मी नुकताच रिटायर्ड झालो होतो.
तुमचा पन्नास हजाराचा विमा मॅच्युअर्ड झालाय. पैसे पाठवण्यासाठी पत्ता पाठवा.
मी फक्त एकच वाक्य बोलत राहिलो. माझ्या विमा अर्जावर जो पत्ता दिलाय तीथेच मी रहातो. त्याच पत्त्यावर पेसे पाठवा.
एक सहा महिने पिडले. नंतर बहुतेक रिटायर्ड मेन्ट मधे मिळालेल्या पैशाची वाट लागल्याने बॅकेत बॅलन्स खुप कमी उरला. मग त्याने नाद सोडला.
मी विमा उतरवलाच नव्हता.
गरज असेल तर बॅक स्वताच कारवाई करेल. ट्रॅप मधे फसू नका.
फसवणुकीचा प्रकार आहे…
फसवणुकीचा प्रकार आहे. त्यांना काहीही माहिती देऊ नका. आपला पत्ता देऊ नका आणि कुणाला घरी सुद्धा बोलावू नका. पाहिजे तर सायबर गुन्हे विभागाला माहिती द्या आणि कोटक च्या फ्रॉड विभागाला सुद्दा माहिती द्या. इथे कोटक बँक चे नाव आले असल्याने कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना इन्सेन्टिव्ह आहे. ते पाहून घेतील.
हि मंडळी प्रसंगी तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा येऊन राडा करू शकतात त्यामुळे जितकि कमी माहिती देता येणे शक्य आहे तितकी द्या. खोटी माहिती सुद्धा दिल्यास चालेल. म्हणजे तुमच्या शहराच्या अगदी बाहेर, जिथे प्रचंड ट्राफिक वगैरे असते तिथे ह्यांना बोलावा ते सुद्धा ट्राफिक जास्त असते तेंव्हा.
लै जूना धागा कसा काय वर आलाय?
मी तेव्हा त्यांंचे सर्वच नंबर ब्लॉक केले होते . छान वाटलं.... तो काळ आठवला.....
नंतर काय झालं?
In reply to लै जूना धागा कसा काय वर आलाय? by IT hamal
नंतर काय झालं?
शेवट काय झाला पण मग?
In reply to लै जूना धागा कसा काय वर आलाय? by IT hamal
शेवट काय झाला पण मग?
त्यांनी माझा नाद सोडला
काही नाही झालं ....मी त्यांचे 4/5 नंबर ब्लॉक केले. त्यानंतर त्यांचे कॉल येणं थांबलं आणि मी सुखात जगू लागलो ...