मी शेती करतो व त्यावर माझ्यापुरता चरीतार्थ चालवतो.सातारा शहराजवळच आमचे शेत असल्याने मला शेतात राहवे लागत नाही.आठवड्यातून दोन तीन चकरा होतात तेव्हढेच.शेतात पुर्वी गहू ,ज्वारी,मका हे पीक वडील घेत होते.गहू ज्वारी घरी खायला व्हायची.पण आजकाल असल्या भुस्कट पिकाच्या फंदात कोणच पडत नसल्याने आम्हीही उस हेच पीक घेतो.उसाला एकदा पक्की बांधणी (लागणीनंतर चार पाच महीन्याने) झाल्यानंतर फक्त पाणी द्यायला लागते.त्यासाठी एक माणूस ठेवला आहे.
तर!!! मी आठवड्यातले पाच दिवस रिकामटेकडाच असतो.पुर्वि मित्र असायचे त्यांच्यामुळे वेळ जायचा .पण सातारा एमआय्डीसीचे बारा वाजल्याने बरेच मित्र पुण्यात व काही परदेशात आहेत.इंटरनेटचे मला खूप आकर्षण होते ,अजुनही आहे.सुरवातीला वेळ चांगला जायचा नेटमुळे पण सध्या माझा वेळ जाता जात नाही.घर खायला उठते.बाहेर बोंबलत कीति फिरनार ,मग नेटवर काही कुचाळक्या करणे,एकटाच ट्रेकला जाणे असले खर्चिक उद्योग करत बसतो.माझे हे उद्योग आता खिशावरही ताण टाकत आहेत.माझे दिवसाला दहा सिगरेटचे प्रमाणही जैसे थे आहेच.(यावर एक धागा काढला होता)
मला काम करायचे आहे ,असे काहीतरी काम ज्याने वेळ जाईल आणि बर्यापैकी पैसे मिळतील.व नवीन मित्र जोडता येतील.पण मला सोशल फोबीया आहे,म्हणजे मला कामाच्या ठीकाणी भीती वाटते,मुल्यांकनाची(performance anxiety)प्रचंड भीती वाटते.पण यावर ट्रीटमेंट चालू असल्याने यावर कंट्रोल आहे.माझे शिक्षण बीएस्सी इतके झाले आहे.वय तीस आहे.
तर काय करता येईल मला?
पब्लिक रिलेशन जॉब अर्थातच नकोय. असे कोणतेतरी काम मला सूचवा जेणेकरुन् महीण्यातले वीस बाविस दिवस बसून राहणे कमी होईल.व्यवसाय सूचवला तरी चालेल.धन्यवाद.
वाचने
8589
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवांतरः
एकही चांगली कंपणी नाही.आहेत
In reply to अवांतरः by आदूबाळ
Are you serious about it?
Are you serious about it?>>>
In reply to Are you serious about it? by पैसा
+१
In reply to Are you serious about it? by पैसा
जे मिपावर करताय तेच चांगलं आहे की !
आठवड्याला किती तास काम
शेतीमधेच
सेतू केंद्र काढा
दोन क्रुझर आणि इंडिका काढून
राजकारणात या
या साठी मला आधी रोज दारु पिऊन
In reply to राजकारणात या by Ranapratap
हा हा हा.......
In reply to या साठी मला आधी रोज दारु पिऊन by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
एखादी परकीय भाषा शिका
हम्म
सातारा शहराचे सगळ्यात चांगले
जयंतकाका, फार उत्तम प्रतिसाद.
In reply to सातारा शहराचे सगळ्यात चांगले by जयंत कुलकर्णी
शेतात उसाच्या फडात मध्यभागी
का ?
In reply to शेतात उसाच्या फडात मध्यभागी by श्रीगुरुजी
त्यांचं(ट फि) लग्न झालेलं
In reply to का ? by अभिदेश
LOL
In reply to त्यांचं(ट फि) लग्न झालेलं by सुबोध खरे
हॅतिज्यायला, मला वाटले गांजा
In reply to त्यांचं(ट फि) लग्न झालेलं by सुबोध खरे
समझनेवालोंंको इशारा काफी है.
In reply to का ? by अभिदेश
त्यांच्याकडे असेल जागा
जागा तासावर भाड्याने देता
In reply to त्यांच्याकडे असेल जागा by वरुण मोहिते
श्रीगुरुजी,तुमच्याशी मतभेद
In reply to जागा तासावर भाड्याने देता by श्रीगुरुजी
सातारा शहराच्या आजूबाजूला
धन्यवाद ,संपर्क करेन .
In reply to सातारा शहराच्या आजूबाजूला by अमरेंद्र बाहुबली
इंट्रेस्टिंग!
In reply to सातारा शहराच्या आजूबाजूला by अमरेंद्र बाहुबली
हां मला पण हे समजून घ्यायचं
In reply to इंट्रेस्टिंग! by खेडूत
हो बरोबर! खेडुत साहेब व
In reply to हां मला पण हे समजून घ्यायचं by आदूबाळ
सुझलॉन साठी
In reply to सातारा शहराच्या आजूबाजूला by अमरेंद्र बाहुबली
आधी होतो. आता बदलली. दुसरी
In reply to सुझलॉन साठी by वरुण मोहिते
याबाबत कुतुहल आहे. तुमच्या
In reply to आधी होतो. आता बदलली. दुसरी by अमरेंद्र बाहुबली
असं कुणी रिकामं / कामाशिवाय
ब्लॉगिंग करा
सैम प्रोब्लम
हायला
Subodh ji I like it.
मका
शेअर खरेदी विक्री करा