लेखककेडीयांनी सोमवार, 21/08/2017 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य
१ पॅक मॅग्गी नूडल्स, फक्त मसाला घालून शिजवून
१ लहान कोबी, उभा पातळ चिरून
१ कप पातीचा कांदा, चिरून
१ ढोबळी मिरची लांब चिरून
१५ ते २० लसूण पाकळ्या, बारीक चिरून
अर्धा इंच आलं, बारीक चिरून
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
२ ते ३ चमचे शेझवान सॉस [आवडीनुसार कमी/जास्त)
१ चमचा काळीमिरी पावडर
अर्धी वाटी बेसन
पाव वाटी कॉर्नफ्लॉर
मीठ चवीनुसार
तळणी साठी तेल
गेले २ दिवस पाऊस पडत होता, म्हंटल नेहेमीच्या कांदा भजी पेक्षा जरा वेगळं करून पाहावं. मग हि इंडो-चायनीज भजी केली, गरम भजी आणि शेझवान सॉस कॉम्बिनेशन उत्तम झालेलं. ह्यात नूडल्स मुळे एक मस्त कुरकुरीतपणा येतो. मुलांनी आवडीने संपवली!
कृती
नूडल्स नेहेमी शिजवतो तसे शिजून घ्या. फक्त भाज्या घालू नका. नूडल्स शिजवून निथळत ठेवा. नूडल्स कात्रीने थोड्या कमी लांबीच्या कापून घ्या. एका भांड्यात नूडल्स, भाज्या, शेझवान सॉस, काळीमिरी पावडर घालून मग त्यात कॉर्नफ्लॉवर आणि लागेल तेवढं बेसन घाला. (साधारण अर्धा कप पेक्षा किंचित कमी लागतं).
मिश्रण एकजीव करून घ्या. [हे घट्टसर भिजवायचंय, लागलं तर किंचित पाणी घाला]. चवीनुसार मीठ घालून मिश्रण थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवा. कढई मध्ये तेल गरम करून, चमचा किंवा फोर्क ने भज्या तेलात सोडून, मध्यम आचेवर तळून घ्या. गरमागरम भजी शेझवान/टोमॅटो सॉस सोबत खायला घ्या!
तीन दिवस रिपरिपणार्या पावसात ही अशी पाकृ म्हणजे किती जीवघेणा प्रकार आहे याची कल्पना आहे काय ???!!!
तोंडाला पाणी सुटून सुटून डिहायड्रेशन व्हायला आलंय :)
प्रतिक्रिया
व्हॉट ऍन आयडिया सरजी!
धन्यवाद!
In reply to व्हॉट ऍन आयडिया सरजी! by वामन देशमुख
@काय तरी एक एक चीजा निघतात
In reply to व्हॉट ऍन आयडिया सरजी! by वामन देशमुख
फोटू व कृती आवडली.
तीन दिवस रिपरिपणार्या पावसात
:-))
In reply to तीन दिवस रिपरिपणार्या पावसात by डॉ सुहास म्हात्रे
वाह...!!!
अहाहा!
काहीही प्रतिक्रीया देणार नाहिये....
डॉक, जरा सवड काढून या पुण्यात
In reply to काहीही प्रतिक्रीया देणार नाहिये.... by डॉ श्रीहास
आयतं आमंत्रण भेटतयं डॉक. मी
In reply to डॉक, जरा सवड काढून या पुण्यात by केडी
एकदम झकास..
नेहमी प्रमाणे खूप चविष्ट दिसत
वाह!
वा!
भारी
वाह क्या बात है.. कसल्या
एकदम जब्बऱ्या रेसिपी
मस्त
टेम्प्टिंग दिसतंय. पण नूडल्स