Skip to main content

कॅबेज अँड क्रिस्पी नूडल पकोडा

लेखक केडी यांनी सोमवार, 21/08/2017 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
Image1 साहित्य १ पॅक मॅग्गी नूडल्स, फक्त मसाला घालून शिजवून १ लहान कोबी, उभा पातळ चिरून १ कप पातीचा कांदा, चिरून १ ढोबळी मिरची लांब चिरून १५ ते २० लसूण पाकळ्या, बारीक चिरून अर्धा इंच आलं, बारीक चिरून १ हिरवी मिरची, बारीक चिरून २ ते ३ चमचे शेझवान सॉस [आवडीनुसार कमी/जास्त) १ चमचा काळीमिरी पावडर अर्धी वाटी बेसन पाव वाटी कॉर्नफ्लॉर मीठ चवीनुसार तळणी साठी तेल गेले २ दिवस पाऊस पडत होता, म्हंटल नेहेमीच्या कांदा भजी पेक्षा जरा वेगळं करून पाहावं. मग हि इंडो-चायनीज भजी केली, गरम भजी आणि शेझवान सॉस कॉम्बिनेशन उत्तम झालेलं. ह्यात नूडल्स मुळे एक मस्त कुरकुरीतपणा येतो. मुलांनी आवडीने संपवली! कृती नूडल्स नेहेमी शिजवतो तसे शिजून घ्या. फक्त भाज्या घालू नका. नूडल्स शिजवून निथळत ठेवा. नूडल्स कात्रीने थोड्या कमी लांबीच्या कापून घ्या. एका भांड्यात नूडल्स, भाज्या, शेझवान सॉस, काळीमिरी पावडर घालून मग त्यात कॉर्नफ्लॉवर आणि लागेल तेवढं बेसन घाला. (साधारण अर्धा कप पेक्षा किंचित कमी लागतं). Step1 Step2 मिश्रण एकजीव करून घ्या. [हे घट्टसर भिजवायचंय, लागलं तर किंचित पाणी घाला]. चवीनुसार मीठ घालून मिश्रण थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवा. कढई मध्ये तेल गरम करून, चमचा किंवा फोर्क ने भज्या तेलात सोडून, मध्यम आचेवर तळून घ्या. गरमागरम भजी शेझवान/टोमॅटो सॉस सोबत खायला घ्या! Step3 Step4

वाचने 10280
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

तीन दिवस रिपरिपणार्‍या पावसात ही अशी पाकृ म्हणजे किती जीवघेणा प्रकार आहे याची कल्पना आहे काय ???!!! तोंडाला पाणी सुटून सुटून डिहायड्रेशन व्हायला आलंय :)

हा पकोडा खाण्याऐवजी नुसता बघत बसाव वाटतय....

फोटू व पाकृ दोन्ही मस्त.

वाह!

वा! काय भन्नाट कल्पना! फोटोबद्दल नेहमी वेगळं काय लिहिणार? खासच!

करून बघायला हवं

नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख

टेम्प्टिंग दिसतंय. पण नूडल्स भजी हे नाव वाचून पूर्वीही असा प्रश्न पडला होता की शिजवलेल्या / कच्च्या, कशाही नूडल्स तळल्या तर किती तेल पीत असतील.