✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पेंट बाप्पा मोरया २०१७

अ
अभ्या.. यांनी
Fri, 08/04/2017 - 20:08  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी. गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात. गतसाली आयोजित गणेशचित्रमालेला मिळालेल्या ऊत्स्फुर्त प्रतिसादानंतर यंदाची गणेशचित्रमाला सादर करण्यास अत्यंत आनंद होत आहे. मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात. आता मात्र जरा आपल्या मिपाबाप्पाचा विचार करुयात. यंदाच्या मिपागणेशोत्सवास आपणास नेहमीप्रमाणेच रंगदार आणि ढंगदार बनवायचे आहे आणि तेही सर्वांच्या सहकार्याने. चला तर मग. भरपूर वेळ आहे आपल्याला. हे पाहा इतकेसे काम आहे फक्तः आपण सर्वच जण एमएस पेंट हे सोपे अ‍ॅप्लिकेशन बर्‍याच कामांसाठी वापरतो. तर यंदा ह्या अ‍ॅप्लिकेशनात रेखाटायचाय आपला मनातला बाप्पा. पेंटमधील कोणतेही टूल वापरा. कसाही रंगवा. फक्त फोटोशॉप वगैरे अ‍ॅडव्हान्स प्रकार नकोत. ह्या चित्रमालेत फक्त एमएस पेंटमधीलच बाप्पा स्वीकारले जातील. तुमच्या घरातील छोट्या कलाकारांनी हे रेखाटले असतील तरीही तसे त्यांच्या नावा अन वयासहित नोंदवून पाठवा. ही चिमुकली मंडळीही एकप्रकारे मिपापरिवाराचे सदस्यच आहेत. त्यांच्या कलाकृतींचे कौतुक आपण करणार आहोत. आता हे कशासाठी? तर गणेशोत्सव रंगदार करण्यासाठी रंगभुषा मंडळ सज्ज झालेले आहे. गणेशोत्सवात मिपाची बॅनर्स ही सार्‍या मिपाकरांकडून सांगून सवरुन, त्यांच्या कलाकृतींची बनवून लावायची आहेत. इथून बर्‍याच नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा होणार आहे, तेंव्हा ह्या स्पर्धेत म्हणा की आपल्या घरच्या कामात म्हणा, सार्‍याच सदस्यांचे भरीव योगदान आवश्यक आहे. तर मग चला. लागा कामाला. बच्चे कंपनी असेल तर त्यांनाही हे सांगून करुन घ्या अन पाठवा आम्हाला खूप सारे बाप्पा. काही अडचणी असतील तर मी आहे सांगायला, बाकी इतरही बरीच तज्ञ मंडळी असतील. आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स दि. २० ऑगस्ट २०१७ पर्यंत कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात. त्यानंतर पाठवलेल्या चित्रांचा ह्या चित्रमालेत सहभाग असणार नाहीये. धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9528 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

उत्तम! नुकतीच पेंट बंद होणार

पिलीयन रायडर
Fri, 08/04/2017 - 20:59 नवीन
उत्तम! नुकतीच पेंट बंद होणार अशी बातमी होती. बहुदा लोकाग्रहामुळे होणार नाही बंद म्हणे. त्या अनुषंगाने चांगला उपक्रम! करायलाही सोप्पा!
  • Log in or register to post comments

आमचा पण सहभाग नक्की असेल!!!

दशानन
Fri, 08/04/2017 - 21:22 नवीन
आमचा पण सहभाग नक्की असेल!!! मोरया!
  • Log in or register to post comments

वाह! मस्तच.

पद्मावति
Fri, 08/04/2017 - 23:01 नवीन
वाह! मस्तच.
  • Log in or register to post comments

प्रयत्न करतंय नि जमला नीट तं

सूड
Sat, 08/05/2017 - 10:40 नवीन
प्रयत्न करतंय नि जमला नीट तं धाडतंय.
  • Log in or register to post comments

तुका जमतां रे. धाड.

अभ्या..
Sat, 08/05/2017 - 15:47 नवीन
तुका जमतां रे. धाड. . . वशाड मेलो. (धन्यवाद, हे म्हणायची संधी दिल्याबद्दल ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दोन तीन पाठवायचे त्यातून एक

सूड
Mon, 08/07/2017 - 11:48 नवीन
दोन तीन पाठवायचे त्यातून एक निवडणार असं काही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त उपक्रम,

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 08/05/2017 - 11:00 नवीन
अभेंद्रजी, आपले निवेदन वचून एम एस पेंट मधे हात चालवायचा प्रयत्न केला. पण इकडे चित्र काढणे भलतेच अवघड आहे असे वाटले. (अर्थात मी पहिल्यांदाच असे चित्र काढायचा प्रयत्न केला होता) पण आमच्या गणपतीचा मारुती झाला. आमच्या सारख्या नवशिकाउंसाठी जर आपण एम एस पेंट वापरण्यासाठी काही सोप्या युक्त्या सांगितल्या तर पुन्हा एकदा प्रयत्न करेन म्हणतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अगदिच सहमत ...

जेनी...
Sat, 08/05/2017 - 15:06 नवीन
अगदिच सहमत ... एखादं चित्र एक्षम्प्ले म्हणुन पैन्त मध्ये द्रव करुन दाखवायला हवं .. होय कि नै पैबु काका ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पैन्त मध्ये द्रव अवघडे.

अभ्या..
Sat, 08/05/2017 - 15:41 नवीन
पैन्त मध्ये द्रव
अवघडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

राजे ..... आपली काहितरी गफलत

जेनी...
Tue, 08/08/2017 - 00:19 नवीन
राजे ..... आपली काहितरी गफलत होतेय .. आम्हास द्वीअर्थी असे काहिही लिहावयाचे नव्हते ... तरिही आपण आमच्या प्रतिसादातुन मोजकेच शब्द निवडुन.. आम्हास हास्यविनोदाचे क्षण बहाल केल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सांगतो माऊली, सांगतो.

अभ्या..
Sat, 08/05/2017 - 15:40 नवीन
सांगतो माऊली, सांगतो. चार युक्तीच्या, चार भक्तीच्या अन चार मुक्तीच्या गोष्टी सांगितल्याशिवाय मोरया म्हणायचंच नै आपण. ;) जरा सवड मिळाली की टंकेन. आता आलोच आहे तर एक टीप घ्या जाताजाता, प्रायमरी ड्रॉईंग पेन्शीलीने नै ओढायचे. लै थिन आणि विचित्र लाईन येते. बेस्ट ऑप्शन म्हणजे ब्रश घ्यायचा. त्यातले राउंड टिप मधले मिडल साईज टिप निवडायचे. काळाभोर कलर घ्यायचा आन फिरवायचा माउस कॉन्फीडन्टली. मस्त ग्राफेक झाले की त्यात व्हायब्रंट कलर भरायचे एकेक बकेटीने. लगेच तुम्ही पिकासोला पण इकून येताल. हैकानैका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

लगेच तुम्ही पिकासोला पण इकून येताल

चांदणे संदीप
Tue, 08/08/2017 - 10:13 नवीन
लगेच तुम्ही पिकासोला पण इकून येताल
ठठो!! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

निव्वळ एमएस पेंट वापरून

एस
Sat, 08/05/2017 - 20:21 नवीन
निव्वळ एमएस पेंट वापरून संगणकावर केलेले 'मोनालिसा' चे चित्र असा एक व्हिडिओ यूट्यूबवर बऱ्याच दिवसांपूर्वी पाहिला होता. अशक्य भारी प्रकार होता. पेंट बाप्पांची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

कालच बँकचोर नावाचा चित्रपट

अंतु बर्वा
Mon, 08/07/2017 - 20:51 नवीन
कालच बँकचोर नावाचा चित्रपट पाहण्यात आला.. त्यात म्हटल्याप्रमाणे, GBMLR!! (गणपती बाप्पा मोरया, लेट्स रॉक!) :-)
  • Log in or register to post comments

अभ्या....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/14/2017 - 16:29 नवीन
उपक्रमाला शुभेच्छा रे...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वाह!

जुइ
Tue, 08/15/2017 - 02:10 नवीन
या वेळेस अगदी अनोख्या उपक्रमाचे नियोजन केले आहे . शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

काल

सूड
Mon, 08/21/2017 - 12:01 नवीन
पाठवला आहे.
  • Log in or register to post comments

पाठवला

मीता
Mon, 08/21/2017 - 15:37 नवीन
पाठवला
  • Log in or register to post comments

गणपती बाप्पा मोरया ......

II श्रीमंत पेशवे II
Mon, 08/21/2017 - 16:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

II श्रीमंत पेशवे II
Mon, 08/21/2017 - 17:49 नवीन
  • Log in or register to post comments

http://imgur.com/BLJ9kxP

II श्रीमंत पेशवे II
Mon, 08/21/2017 - 17:51 नवीन
http://imgur.com/BLJ9kxPImage removed.
  • Log in or register to post comments

ऑस्सम!!

तुषार काळभोर
Tue, 08/22/2017 - 20:18 नवीन
मस्स्त चित्र काढलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II श्रीमंत पेशवे II

दोन उभ्या रेषा श्रीमंत पेशवे

अभ्या..
Tue, 08/22/2017 - 20:30 नवीन
दोन उभ्या रेषा श्रीमंत पेशवे दोन उभा रेषा श्रीमंतांची इच्छा असेल तर हे स्वामीनिर्मीत श्रीगजानानाचे चित्र मिपाच्या स्पर्धेसाठी वापरले तर चालेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II श्रीमंत पेशवे II

आणि आता प्लीज दुसर्‍या कोणी

अभ्या..
Tue, 08/22/2017 - 20:33 नवीन
आणि आता प्लीज दुसर्‍या कोणी चित्रे पाठवू नका प्लीज. पुरेसी म्हणण्यापेक्षा जास्त चित्रे आलीत. धन्यवाद मिपाकरांनो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

किती वेळा ?

माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/27/2017 - 17:10 नवीन
इतकी अजिजी सोलापूरकरांकडून . . . . पटत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ते मरो, तिसर्‍या दिवशी पण एकच

सूड
Sun, 08/27/2017 - 18:23 नवीन
ते मरो, तिसर्‍या दिवशी पण एकच एक ब्यानर दिसतोय, क्या गडबड हय दया क्षमा शांति?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

हेच म्हणतो...

सतिश गावडे
Sun, 08/27/2017 - 18:43 नवीन
आम्हालाही बघू द्या की पेंट बाप्पा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरे ह्या पेंट बाप्पा मोरयाचं

प्रीत-मोहर
Mon, 08/28/2017 - 14:51 नवीन
अरे ह्या पेंट बाप्पा मोरयाचं काय झाल?
  • Log in or register to post comments

क्षमस्व मंडळी. मी जरा गणपतीची

अभ्या..
Mon, 08/28/2017 - 14:56 नवीन
क्षमस्व मंडळी. मी जरा गणपतीची कामे जास्तच केल्याने आजारपण अनुभवतो आहे. ३ दिवस झाले काम्पुटरलाच हात लावलेला नाहीये. त्यामुळे होते ते प्लानिंग शिस्तीत बोंबलले गेले आहे. बप्पा पण म्हणले २ दिवस एक्स्ट्रा राहतो. मग लवकरच करु मॅनेज म्हणे.
  • Log in or register to post comments

अभ्या..

तुषार काळभोर
Sat, 09/02/2017 - 09:38 नवीन
कालचं बॅनर दिसत नव्हतं. आजचं बॅनर खूप छान आहे. हे पेंट बाप्पाचं बॅनर रोज गायब होईल. ते सर्व बॅनर्स या धाग्यात ठेवता येतील का? म्हणजे रोज बॅनर प्रकाशित करायचं आणि या धाग्यात (मूळ धाग्यात किंवा प्रतिसादात) ठेवायचं.
  • Log in or register to post comments

"या वर्षीच्या सगळ्या बॅनर

मोदक
Sat, 09/02/2017 - 10:10 नवीन
"या वर्षीच्या सगळ्या बॅनर साठी एक नवीन धागा काढा" असे आमच्या सवंगड्याला सुचवले आहे. सायकलीतून फुरसत मिळाली की तो काढेल किंवा अभ्याला सांगेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

०२-सप्टेंबर

तुषार काळभोर
Sat, 09/02/2017 - 09:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर आहे.

पद्मावति
Sat, 09/02/2017 - 13:27 नवीन
फारच सुंदर आहे. कालचे सूड यांचे चित्रपण मस्तं होते.
  • Log in or register to post comments

सूड चे चित्र कधी आले? एक

पिलीयन रायडर
Sat, 09/02/2017 - 13:41 नवीन
सूड चे चित्र कधी आले? एक संपूर्ण दिवस तिथे चित्र दिसत नव्हते खरं तर. इथे टाका परत प्लिज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

आतापर्यंतचे "मिपा गणेशोत्सव

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/02/2017 - 15:17 नवीन
आतापर्यंतचे "मिपा गणेशोत्सव २०१७" बॅनर्स... Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

या प्रकल्पाने मिपाकरांमधले अनेक कलाकार प्रकाशात येत आहेत ! केवळ 'एमएस पेंट' वापरून ते इतकी किमया साधू शकतात तर प्रगत पारंपारिक व आधुनिक साधने हाती घेऊन ते काय करू शकतील !!
  • Log in or register to post comments

वा, वा, आता सगळी बॅनर्स इथे

यशोधरा
Sun, 09/03/2017 - 12:21 नवीन
वा, वा, आता सगळी बॅनर्स इथे येऊदेत. मस्त आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आजचा बॅनर

तुषार काळभोर
Sun, 09/03/2017 - 16:19 नवीन
वरच्या प्रतिसादात दिसतोय. पण पानाच्या वरती दिसत नाहीये. परवा सूड चा बॅनर सुद्धा दिसत नव्हता
  • Log in or register to post comments

खुप सुंदर गणपती आहेत पेंटमधील

सतिश गावडे
Sun, 09/03/2017 - 17:53 नवीन
खुप सुंदर गणपती आहेत पेंटमधील. एका साध्या टूलमधून इतकी सुंदर चित्रे केवळ कलाकार लोकच काढू शकतात. (आम्ही हे टूल फक्त एरर स्क्रिनशॉट पेस्ट करण्यासाठी वापरतो ;) )
  • Log in or register to post comments

एमएस विंडोमधले स्क्रिनशॉट्स

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/03/2017 - 23:29 नवीन
एमएस विंडोमधले स्क्रिनशॉट्स घ्यायला विंडोतलेच "स्निपिंग टूल" ब्येष्ट. मात्र, स्क्रिनशॉट्समध्ये एडिटिंग व टेक्स्टिंग करायचे असल्यास पेंट उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

छानच रेखाटले आहेत सगळ्यांनी

पिलीयन रायडर
Wed, 09/06/2017 - 03:58 नवीन
छानच रेखाटले आहेत सगळ्यांनी बाप्पा! आवडला यंदाचाही उपक्रम! पण बाकीचेही येऊ द्यात ना. अगदी बॅनर नसले तरी ज्या काही रफ इमेजेस असतील त्याही बघायला आवडतील. इतका उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय तर बघण्याची फार उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा