✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राजकारण आणि आपण !

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Sun, 08/20/2017 - 16:25  ·  लेख
लेख
हल्ली शेकडा ९९% पेपर आणि वृत्तवाहिन्यांवर केवळ आणि केवळ राजकारणाशी संबंधित बातम्यांचा रतीब पहायला मिळतो. पेपरात पहिलं पान राजकारण . . . टीव्हीवर बातम्या लावल्या की राजकारण . . . . अतिरेक झालाय असं नाही का वाटत ? मी तर अतिशय उबगलोय बुवा . . . राजकारण हा जीवनाचा एक भाग असू शकतो पण तो इतका महत्वाचा आहे का की त्याचा इतका उदो उदो करावा ? जो प्रकार भारतात क्रिकेटचा तोच देशाच्या राजकारणाचा . . . . गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी, देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारं राजकारण हेच सामान्य माणसाचं आयुष्य आहे का ? ते सोडून दुसरं काही महत्वाचं नसतं का ? राजकारणाचा नक्की उगम केव्हा आणि कशासाठी झाला असावा ? काही लोकांना नाही समजत ह्या घडामोडी आणि त्यांचं महत्व . . . . मग ते जगात रहायच्या योग्यतेचे नाहीत का ? मागे कोणी कोणाला कसा शह दिला आणि काय घडलं ह्या वायफळ गोष्टी आपल्या आधीच कमी साठवणूक क्षमता असलेल्या मेंदूत साठवून ठेवून वेळी अवेळी दुसऱ्या माणसाच्या तोंडावर घडाघडा बोलता आलं म्हणजे आपण काही फार मोठा तीर मारला असं काही असतं का ? मिठाने जेवण चविष्ट होतं म्हणून कोणी मिठाचीच भाजी आमटी करुन खात नाही तसंच राजकारण नाही का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5583 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

मला तर वाटते मीडियामध्ये केवळ

अत्रे
Sun, 08/20/2017 - 18:19 नवीन
मला तर वाटते मीडियामध्ये केवळ वरवरच्या बातम्या देतात. राजकारण प्रत्यक्षात कसे चालते हे दाखवण्याचे पत्रकारांची हिम्मत नसते.
  • Log in or register to post comments

मानव समाजशील प्राणी आहे,

पगला गजोधर
Sun, 08/20/2017 - 18:29 नवीन
मानव समाजशील प्राणी आहे, समजकारण व राजकारण यांच्या एकमेकात तंगडया गुंतलेल्या आहेत. समुहाबाहेर राहणाऱ्या व्यक्ति कदाचित राजकारणापासुन अलिप्त राहतीलही.... बहूतकरुंन जिथे मनुष्य समूह असतो, तिथे तिथे राजकारण असतेच ....
  • Log in or register to post comments

हे मात्र खरं आहे.आजकाल ३ c

chintamani1969
Sun, 08/20/2017 - 20:46 नवीन
हे मात्र खरं आहे.आजकाल ३ c (crime,cricket,cinema)ला फारच महत्व यायला लागल आहे.आणि स्पर्धेत उतरल्याने जवळपास प्रत्येक वृतपत्र वा वाहिनी एक सारखेच वाटायला लागले आहेत .
  • Log in or register to post comments

सहमत

अमरेंद्र बाहुबली
Sun, 08/20/2017 - 21:48 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chintamani1969

बाकी, कुक्कुटशर्विलक

पगला गजोधर
Mon, 08/21/2017 - 09:50 नवीन
बाकी, कुक्कुटशर्विलक-प्रतिपालक भक्तांनी, राजकारणाच्या नावाने नाके मुरड़ताना पाहणे, म्हणजे शाहजोगपणा हैटट आहे...
  • Log in or register to post comments

पूर्वी कसं होतं

बोका-ए-आझम
Mon, 08/21/2017 - 10:19 नवीन
सहिष्णू वातावरण होतं, सगळे आपापली कामं करत होते, अतिरेकी येऊन निमूटपणे हल्ले करुन जात नव्हते, रेल्वे अपघात होत नव्हते, इन्सेफॅलायटीसचा शोध पण लागलेला नव्हता, देशात लोकशाही होती, एका अत्यंत सेवाभावी घराण्याची तितकीच सेवाभावी सत्ता होती. त्यामुळे लोकांना बातम्या नाही कळल्या तरी फरक पडत नव्हता. पण मे २०१४ मध्ये देशावर अंतर्गत परचक्र आलं. असहिष्णुता वाढली, एका ठराविक धर्माच्या लोकांना जगणं मुश्किल झालं. त्यामुळे आता वर्तमानपत्रांत आणि इतर ठिकाणी येणाऱ्या बातम्या हाच काय तो आधार राहिलेला आहे.
  • Log in or register to post comments

खरं आहे बोकोबा

मी-सौरभ
Mon, 08/21/2017 - 11:17 नवीन
भाजपा मुळेच ही अवस्था आलीये देशावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

+१

मोदक
Mon, 08/21/2017 - 13:31 नवीन
+१ २०१४ पूर्वी असहिष्णुता नव्हती. लोकांना मोदीभक्त, मोदीरूग्ण असे विनाकारण संबोधून त्यांचा अपमान करण्याची गरज भासत नव्हती. समोरच्याचा मुद्दा बरोबर असला आणि आपल्याकडे उत्तर नसले की "तू भक्तच आहेस" अशी पळवाट काढावी लागत नव्हती. महत्वाचे म्हणजे अशा फालतू प्रकाराला वैतागून समोरच्या प्रत्युत्तर दिले की "बघ बघ म्हणजे तू भक्तच आहेस" असे शेपूट घालण्याचीही आवश्यकता भासत नव्हती. समोरच्याला उचकवताना (आपण ओवेसीची औलाद असल्याच्या थाटात) तुमचे पंतप्रधान, तुमचे मोदी अशा लेव्हलला संभाषण न्यावे लागत नव्हते. सगळे सुशेगात होते. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

खर आहे

सुखीमाणूस
Mon, 08/21/2017 - 13:15 नवीन
पेपरवाले सध्याच्या सरकारच्या मागे लागलेत. एवढे आधीच्या सरकारच्या मागे लागले नव्हते आता निवडणूका जवळ येतायत तेव्हा अजून वाढेल हे सगळे पण सरकार वरचा असा अंकुश चांगला आहे की कारण भाजपा मधे आयात फार वाढली आहे. आणि सत्तधारी माजायला वेळ लागत नाही मला स्वताला २०१९ मधे भाजपा सत्तेवर आणि त्यांच्यावर media चा अंकूश हेच model चांगले वाटते आहे. इतर कोणतेही सरकार आले तर माझ्या खापर पणत्या नक्की बुरख्यात आणि बिच्चार्या असतील. मला भाजपा सरकारमुळे हिंदू प्रतिगामित्व वाढण्याची तेवढी भीती वाटत नाही कारण अंकूश ठेवणारे खूप आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

"पेपरवाले सध्याच्या सरकारच्या

पगला गजोधर
Mon, 08/21/2017 - 13:30 नवीन
"पेपरवाले सध्याच्या सरकारच्या मागे लागलेत."
म्हणजे नक्की काय ? "मीडियाचा अंकुश" म्हणजे नक्की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

+111111

भंकस बाबा
Wed, 08/30/2017 - 09:50 नवीन
हाणला च्यामायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मी काय म्हणतो...

मी-सौरभ
Mon, 08/21/2017 - 10:42 नवीन
तुम्ही हे सगळं सोडा आणि कविता लिहायला लागा. मग तुम्हाला जग रंगीबेरंगी दिसू लागेल. टीव्ही वर न्यूज लावू नका, पेपर घेणं बंद करा. आयुष्यात मजा परतून येईल आणि उबग पळून जाईल.
  • Log in or register to post comments

खरय! जळी स्थळी काष्ठी पाषाणी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/21/2017 - 10:58 नवीन
खरय! जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच राजकारण आणी तेच फालतू क्रिकेट. त्यांची च चर्चा. आग लागो....! ईतक बरं मुलींना या दोन्ही गोष्टी समजत नाही. तरी त्यांच्या ईतक्या गप्पा चालतात. समजलं असतं तर.......!
  • Log in or register to post comments

मुलींना राजकारण आणि क्रिकेट समजत नाही?

बोका-ए-आझम
Mon, 08/21/2017 - 11:02 नवीन
बरखा दत्त आणि मायंती लँगर यांनी काय करावे ब्रे?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लँगर

कपिलमुनी
Mon, 08/21/2017 - 11:07 नवीन
लँगर बाईंना काय बोलायचं काम नाय ! बेष्ट हैत ! म्याच मध्ये दुसरा काय बी बघण्या सारखा नाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

लँगर बाईंना काय बोलायचं काम

मोदक
Mon, 08/21/2017 - 13:20 नवीन
लँगर बाईंना काय बोलायचं काम नाय ! बेष्ट हैत ! प्राडॉ वेगळा पुरूष विभाग यासाठी मागत होते तर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बरखा दत्त आणि मायंती लँगर

पगला गजोधर
Mon, 08/21/2017 - 11:13 नवीन
बरखा दत्त आणि मायंती लँगर यांनासुद्धा अनाहिता सदस्यत्व देण्यात यावे..…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बरखा दत्त?? ती नक्की बाई आहे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/21/2017 - 12:29 नवीन
बरखा दत्त?? ती नक्की बाई आहे का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

डाउट का यावा?

अत्रे
Mon, 08/21/2017 - 13:00 नवीन
डाउट का यावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बघा की राव, आजकाल साहित्य,

अभ्या..
Mon, 08/21/2017 - 11:05 नवीन
बघा की राव, आजकाल साहित्य, टुकार गाण्याचे विडंबन असल्या गोष्टीत पण लोक राजकारण आणतात, गचाळ धंदे नुसते.
  • Log in or register to post comments

व्हॉट्सअॅप चाणक्य उवाच . . .

पगला गजोधर
Sun, 09/03/2017 - 19:32 नवीन
व्हॉट्सअॅप चाणक्य उवाच . . . गॅस सिलिंडरच्या किंमती वाढविणे हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे . आतंकवादी महाग गॅस विकत घेऊ शकणार नाहीत , त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करतील . दूरवरून दिसणारा धूर पाहून भारत ताबडतोब सर्जिकल स्ट्राईक करेल . नोटबंदीच्या अपार यशानंतर गॅस सिलिंडर च्या किंमती वाढविणे हे आतंकवाद निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा