Skip to main content

रिमझिम पाऊस पडतो ..!!

लेखक विशुमित यांनी बुधवार, 16/08/2017 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम पाऊस पडतो सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!! हा वारा निवारा मनाचा चिंब झाला पिसारा झाडांचा धुंध ही निशा आली नशा भिजली आकाशा सखी रे तुझी... रिमझिम पाऊस पडतो ..!! चालविला धिंगाणा विजांनी मोकळे केस सोडले मेघांनी माझिया या सख्या रात्री अश्या कवेत(मिठीत) तुझ्या आवळून घे.... रिमझिम पाऊस पडतो...!! रिमझिम पाऊस पडतो सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!!
लेखनविषय:

वाचने 4711
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by धर्मराजमुटके

धन्यवाद धर्मराज जी ..!! बोली भाषे वरून घेतला होता हा शब्द. पण "कवेत" हा शब्दच बरोबर वाटत आहे. कृपया बदल करून देता का संपादक महोदय?

मराठातलं सुन्न आणि हिंदीतील सूनं (सुना सुना लाग राहा है आज मधला) यात फरक आहे ना? कवितेत दोघांचं एकत्रीकरण झालेला दिसतंय.

In reply to by अत्रे

हिंदीतील सुनं अपेक्षित आहे. "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" मधले सुनं.

खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया. Marathi kavita

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर खूप खूप आभारी आहे..!! माझी कविता सार्थकी लागली.

जेम्स जी, पैजार जी , अभेंद्र जी... खूप आभारी आहे. करत असतो थोडा थोडा प्रयत्न. पण भाषा आणि व्याकरण कच्च आहे. माझ्या लेखी मिपामुळे बरीच सुधारणा झाली आहे लेखनात. भविष्यात चांगले प्रयत्न चालू राहतील. --------------- मी काही मराठी गाणी पण कंपोज केली आहेत (चालीसकट). रिमझिम पण त्या पैकी एक आहे. रेकॉर्डिंग करण्याचा मानस आहे. त्यासाठी मागे डांगेंनी "वेल्लाभट" यांचे नाव सुचवले होते. कामाच्या व्यापामुळे बारगळले आहे.