✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मदत हवी आहे - बाल्कनीतील शेती (फोटोंसह)

म
मोदक यांनी
Fri, 06/02/2017 - 00:20  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, शहरातील फ्लॅटला जोडून असलेल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये मिपाकरांनी शेतीचे प्रयोग केले आहेत का..? केले असल्यास आपले अनुभव कृपया या धाग्यावर द्या. **** माझा अनुभव **** फ्लॅटला जोडून दोन मोठी टेरेस मिळाल्याने.. चाफा, भरपूर प्रकारचे गुलाब, तगर, मोगरा, अनंत, जुई, पारिजातक, तीन प्रकारची आबोली, शेवंती वगैरे वगैरे वेगवेगळी फुलझाडे.. तुळस, कोरफड, कोथिंबीर, पुदीना, ओवा, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, गवती चहा आणि ऑलस्पाईस वगैरे झाडे लावली. मोठ्या आकाराच्या कुंड्या आणून त्यामध्ये पपई, लिंबू अशी झाडेही लावली. नीट जोपासना केल्याने ही झाडे अपेक्षेनुसार वाढत आहेत आणि उपयोगात येत आहेत. नंतर टेरेसमधील एका भिंतीच्या आधाराने भोपळा, काकडी, दोडका, कारले, घोसावळे, पडवळ, दुधी, श्रावणघेवडा, साधा घेवडा, तूर, चवळी, मूग असे वेलही चढवले. - या सर्व झाडांसाठी वेगवेगळ्या आकाराच्या मातीच्या कुंड्या वापरल्या. - कुंडी विकणार्‍याकडे असते तीच माती वापरली. - खत म्हणून सोसायटीने केलेले कंपोस्ट खत आणि एक प्रकारचे शेणखत वापरले - कुंड्यांमध्ये मातीसोबत कोकोपिट वापरले. - पाणी नियमीतपणे घातले जाते. - झाडांना आणि वेलांना भरपूर ऊन मिळते. - दुकानातून आणलेले बियाणे वापरले. तर मला मदत पुढील बाबींमध्ये हवी आहे. १) फुलझाडे आणि इतर झाडे नीट वाढत आहेत मात्र वेल एका सायकल नंतर मरून जातात. म्हणजे बियाणांपासून वेल तयार होतो, फुले आणि बर्‍यापैकी शेंगा लागतात. त्या शेंगा काढण्याची वेळ आली की वेलच मरून जातो. म्हणजे एकदा लावलेल्या बियाणांमधून एकदाच शेंगा / फळे मिळतात. असे होण्याचे कारण काय असावे..? २) टेरेसचा आकार पुढील प्रमाणे टेरेस नंबर १ - १००० ते १२०० स्क्वेअर फूट - व्यवस्थीत ऊन येते आणि पाण्याचा निचरा होण्याची सोय आहे. टेरेस नंबर २ - १०० ते १५० स्क्वेअर फूट - ऊन येत नाही आणि पाण्याचा निचरा होण्याची सोय आहे. ..तर या टेरेसवर माती, कोकोपिट आणि अन्य पूरक पदार्थ वापरून मी दिड ते दोन फुट शेतजमिनीसारखा थर तयार केला व वांगी, भेंडी, गवार अशी झाडे लावली तर काय काय काळजी घ्यावी लागेल..? (टेरेसमधून खाली पाणी गळणे थांबवण्यासाठी फ्लेक्स प्रिंटींगवाल्या शीटचा सर्वात खालचा थर देऊ शकतो.) ३) ऊन न येणार्‍या टेरेसवर कोणत्या प्रकारची झाडे लावावीत..? सध्या कोरफड लावली आहे. पण अगदीच कमी प्रमाणात. ४) टेरेसवरील शेतीची अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत - त्यांचा कितपत उपयोग होतो..? ५) मातीचा पोत सुधारावा यासाठी काय उपाययोजना करावी..? (वेली मरण्यामागे कदाचित हे कारण असू शकते, पण नक्की कल्पना नाही) ***** फोटो ***** भिंतीला मोठे मोठे खिळे मारून नायलॉनची दोरी बांधली आहे आणि त्याच्या आधाराने वेलीचा मांडव करायचा प्रयत्न सुरू आहे. . आणखी एक फोटो... . फुलझाडे . फुलझाडे आणखी एक व्हू.. . रिकामी जागा.. . **** अनुभव समाप्त **** पुनश्चः - शहरातील फ्लॅटला जोडून असलेल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये मिपाकरांनी शेतीचे प्रयोग केले आहेत का..? केले असल्यास आपले अनुभव कृपया या धाग्यावर द्या. आणखी एक - हे प्रयोग शेतीतील अज्ञानी आणि अडाणी माणसांनी केले आहेत त्यामुळे "आक्षरास हासू नये." ;)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
151991 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

कमळ आणि कोरफड याविषयी दोन

कंजूस
Fri, 06/30/2017 - 08:42 नवीन
कमळ आणि कोरफड याविषयी दोन व्हिडिओ सापडले. 1)कमळ ABC Gardening Australia 2014 - Blue Lotus Water Garden ( 5:30, 19 MB ) Link:https://youtube.com/watch?v=xxO0ezsm80o ------------------------------- कोरफड 2)Gardening Australia ABC - Aloe Aloe segment 5:45 , 24 MB Link:https://youtube.com/watch?v=e3gjxLsgZ6o हे टबात लावून पाहता येईल. मी कमळ लावलेले पण बाल्कनित वरचे उन मिळत नाही. टेसवर शक्य आहे.
  • Log in or register to post comments

*टेरेसवर*

कंजूस
Fri, 06/30/2017 - 08:45 नवीन
*टेरेसवर* पिंपरी-चिंचवड मेन रोडवरच्या एका लान्ड्रिवाल्याने छपरावर टबांत पंचविसेक कमळे लावली आहेत त्याचा एकदा पेपरात लेख वाचल्याचे आठवतय.
  • Log in or register to post comments

फेसबुकवरचे हे पेज उपयोगी पडु

पिलीयन रायडर
गुरुवार, 08/17/2017 - 22:21 नवीन
फेसबुकवरचे हे पेज उपयोगी पडु शकेल. खफ वर आजकाल मध्ये बरीच चर्चा होतेय ह्या विषयावर. अवांतर - हा धागा मोदकच्या ट्रॅक मध्ये दिसत नाही. गुगल करुन शोधला. ह्या धाग्याला खाली कॅप्चा कोडही दिसत आहे. धागा "कृषी"ह्या विभागात आहे म्हणुन का?
  • Log in or register to post comments

टेस्टिंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/18/2017 - 15:53 नवीन
सांगतो, गड़बड़ असेल तर... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

एक्काकाकांनी पद्धत

रेवती
Fri, 08/18/2017 - 17:48 नवीन
एक्काकाकांनी पद्धत सांगितल्याप्रमाणे मेथी पेरली त्याला तीन दिवस झाले. बेताने पाणी घातले. कोंब दिसायला लागलेत.
  • Log in or register to post comments

काय पद्धत आहे म्हणे..?

मोदक
Fri, 08/18/2017 - 22:54 नवीन
काय पद्धत आहे म्हणे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

घरातल्या-घरात मेथी पिकवायची

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/18/2017 - 23:17 नवीन
घरातल्या-घरात मेथी पिकवायची सरळ सोपी पद्धत. बाजारात मिळणारे मेथीचे दाणे हे मेथीचे बी असते; तेच वापरून लागवड करायची असते. ही घ्या घरातल्या मेथीच्या शेतीची संपूर्ण प्रणाली ( ;) :) )... Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed. हे फोटो, घरातल्या एकरकंडिशन्ड वातावरणात, एक-दोन दिवसांच्या अंतराने काढलेले आहेत. लागवडीसाठीचा कार्टन/ट्रे पुळणीच्या (बारीक) रेतीने भरावा. माती न वापरता रेती वापरल्याने चिखल होत नाही व तयार मेथी सहजपणे उपटून काढाता येते. त्याच रेतीत परत नवीन लागवड करता येते. रेतीवर मेथीचे दाणे पसरून त्यांच्यावर १-२ मिमी जाडीचा रेतीचा थर द्यावा किंवा रेतीवर मेथी पसरून ते जेमतेम रेतीखाली जातील अश्या तर्‍हेने हाताने रेती फिरवावी. मेथी पृष्ठभागाच्या खूप खाली ठेवल्यास ती रुजून वर यायला जास्त वेळ लागतो व पाण्याच्या अतिरेकाने कुजण्याची शक्यता वाढते. रेती केवळ ओली होईल पण पाणथळ होणार नाही इतपतच पाणी शिंपडावे. दर दिवशी गरजेप्रमाणे (साधारणपणे हिवाळ्यात एकदा व उन्हाळ्यात दोनदा असे) रेती ओलसर राहील इतपतच पाणी द्यावे. रेती पाणथळ झाल्यास मेथीचे दाणे व मुळे कुजतात. पाणथळपणा टाळण्यासाठी, मेथीच्या लागवडीसाठी छिद्रे असलेला छोटा (सुपमार्केट्समधून मिळणार्‍या फळांचा) कार्टन वापरून त्याच्या खाली घडी घातलेले वर्तमानपत्र अंथरल्यास, ते छिद्रांतून झिरपलेले पाणी धरून ठेवते. त्यामुळे, पाणथळपणा टाळून रेतीचा तळ जास्त काळ ओला राहतो. वर्तमानपत्राखाली छिद्रे नसलेला मोठा प्लॅस्टीकचा कार्टन/ट्रे ठेवल्यास झिरपणार्‍या पाण्याने होऊ शकणारी अस्वच्छता अथवा खिडकी खराब होणे टाळता येते. ट्रे खिडकीत ठेवल्यास तडक उन (उजेड व उब) मिळाल्याने मेथीची भरकन वाढ होते व भाजीही उत्तम प्रतीची (जास्त हिरवी व चवदार) मिळते. बाल्कनी/टेरेस मध्येही ही लागवड करता येईल, पण हवामानाप्रमाणे पाण्याचे तंत्र बदलावे लागेल. कुटुंबाला एक वेळेस पुरेल इतकी मेथी मिळेल अश्या आकारांच्या ट्रेमध्ये, चारपाच दिवसांच्या अंतराने एक ट्रे, अशी तीन-चार ट्रेमध्ये लागवड करावी. तयार मेथी काढून झाल्यावर त्याच ट्रे मध्ये लगेच परत लागवड करत राहिल्यास वर्षभर हवी तेव्हा कोवळ्या मेथीची भाजी मिळते. बाजारात मिळणार्‍या जून मेथीपेक्षा ही कोवळ्या मेथीची भाजी जास्त चवदार लागते. शिवाय, इतर भाज्यांची चव वाढवायला ताजी मेथी (ही कसुरी मेथीपेक्षा केव्हाही जास्त सरस असते) सतत उपलब्ध राहते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद काका.. मी याच धर्तीवर

मोदक
Sat, 08/19/2017 - 10:46 नवीन
धन्यवाद काका.. मी याच धर्तीवर पण एक वेगळा प्रयोग करणार आहे. लवकरच फोटो देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पुळणीच्या रेतीत रोपांनी शोषून

गवि
Sat, 08/19/2017 - 11:04 नवीन
पुळणीच्या रेतीत रोपांनी शोषून घेण्यासारखे पोषक घटक असतात का? एकामागून एक बॅचेस काढत राहिल्या तरी हे घटक टिकतात का? की फक्त पाण्यावरच रोपं वाढतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पुळणीच्या रेतीत असणारे घटक

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/19/2017 - 16:14 नवीन
पुळणीच्या रेतीत असणारे घटक आणि पाणी, एकामागोमाग काढलेल्या १० पिकांना तरी पुरेसे होतात असा स्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा