विषय जूनाच आहे,पण माझे मत मांडतो.
भारतीय जातीव्यवस्थेमुळे फार मोठा समाज वंचीत राहीला.या समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची संकल्पना मांडली व ती अमलात आणली.घटनेत तशी तरतूद करुन ठेवली.पण द्रष्ट्या बाबासाहेबांनी ही तरतूद फक्त दहा वर्ष असावी असे मत मांडले होते.
मीस्वतः जातीने हिंदू माळी आहे ,म्हणजे ओबीसी कॅटेगरीतला.आपण इतरमागासवर्गीय आहोत म्हणजे आपण आरक्षणाचे समर्थनच केले पाहीजे हे माझे कॉलेजपर्यंतचे मत होते.पुढे ते बदलत गेले.पण अधूनमधुन हे मत रिलॅप्स होत होते ज्याचे दाखले तुम्हाला माझ्याच काही पोस्टमध्ये दिसतील.पण मुदलातच मला आरक्षणाची संकल्पना अन्यायकारकच वाटत आली आहे.याचे म्हहत्वाचे कारण म्हणजे आरक्षणाने व्यवस्थेत दर्जा राखला जात नाही.याचे उदाहरण मी स्वतःच्या बाबतीत अनुभवले आहे.आम्हाला शिकवायला जे शिक्षक होते त्यातले निम्मे आरक्षणातून आलेले व निम्मे मंडल आयोगाच्या आधी मेरीटवर आलेले .जे ८० च्या आधी नोकरीत लागलेले शिक्षक होते ते सिन्सीयर ,आपल्या विषयाचे सखोल ज्ञान व विद्यार्थ्यांविषयी आस्था असलेले होते,याचा अर्थ आरक्षणातून आलेले शिक्षक टाकाउ होते असे नव्हे.पण दर्जाच्या बाबतीत मला हा फरक जाणवत होता.
पुढे अनेकदा सरकारी दवाखाणे ,पीड्ब्ल्युडी,कृषी विभाग इथले अनुभव येत गेले .अत्यंत सडलेल्या व्यवस्था आहेत या.याला फक्त आरक्षण कारणीभूत आहे असे नाही, पण ते एक महत्वाचे कारण आहे.
उच्चशीक्षण घेऊन अनेकजण बेकार राहतात,मनाजोगते काम करता येत नाही त्यामुळे हा बुद्धीजीवी वर्ग (सर्व जातीतले)परदेशात गेला.माझेच अनेक मित्र आज गल्फ ,युरोप,अमेरीकेत आहेत.त्यांच्याशी वाद विवादात हा मुद्दा नेहमी यायचा/येतो.
स्वतः ओबीसी असून मी कोणतेही आरक्षण न घेता माझे शिक्षण खुल्या प्रवर्गातून पुर्ण केले.पण तू खुल्या प्रवर्गातली एक जागा अडवून तुझ्या जातबांधवासाठी आरक्षणातली एक जागा सोडलीस असाही आरोप माझ्यावर काही ब्राह्मण/मराठा मित्रांनी केला.
आज मराठा आरक्षणाची हाकाटी दिली जात आहे.अनेक उच्च समजल्या जाणार्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत.हे पाहून आपण कुठे जात आहोत हा प्रश्न पडतो.
मला वाटते गुणवत्तेला प्रोत्साहन देणारी व्यवस्था आपल्याला आणायची असेल तर शिक्षण नोकरी ,बढतीमधील आरक्षण रद्द करायला हवे.कुठलीही व्यवस्था जी गुणवत्ताधारीत असते ती सक्षमपणे काम करु शकते हे सत्य नाकारुन काहीही साध्य होणार नाही.भारतातील आरक्षण रद्द झाल्यास् भारत फार प्रगती करेल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही ,पण निदान व्यवस्था चांगल्या होतील.अभ्यासू,चिकाटीने व्यासंग करणार्यांना न्याय मिळेल ,मग तो कोणताही जात धर्माचा का असेना.माझ्या विचारात जे काही बदल झाले त्या पैकी हा सुदृढ समाजव्यवस्थेसाठी आवश्यक विषयावर आहे.हा विषय चावून चोथा झाला आहे.पण नवीन सदस्य ,आंतरजालावरील अनुभवी व्यक्ती यांनी इथे मतप्रदर्शन करावे अशी अपेक्षा आहे.धन्यवाद
(ता.क.--- " ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी करावी का????" हा तद्दन वादंगासाठीचा धागा मी काढला होता,त्याची लिंक देऊन मला झोडपू नये.
तरोताजा कलम-- हा धागा वादंगासाठी काढलेला नाही,निकोप वादविवाद अपेक्षीत आहे.)
वाचने
9025
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाचा ट्यार्पी वाढविण्याच्या
आरक्षण पद्धतीचा त्याकाळात
अंताक्षरी खेळायची का?
हा काय प्रकार आहे?
In reply to अंताक्षरी खेळायची का? by श्रीगुरुजी
इतिहास को जानो.... ;)
In reply to हा काय प्रकार आहे? by दशानन
टफीच्या धाग्यांवर अंताक्षरी
In reply to हा काय प्रकार आहे? by दशानन
तुमच्या कीबोर्डवर फक्त एकदा
<<<<मीस्वतः जातीने हिंदू माळी
<<<<मीस्वतः जातीने हिंदू माळी
स्वतः ओबीसी असून मी कोणतेही
बादवे, आत्तापर्यंत देशाची
शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण !
अतिरंजित प्रतिसाद वाटला..!!
In reply to शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण ! by सौन्दर्य
'शंका दर्शवली'
In reply to अतिरंजित प्रतिसाद वाटला..!! by विशुमित
आज जवळजवळ ६५ वर्षे झाली आरक्षण निर्माण करून
In reply to 'शंका दर्शवली' by सौन्दर्य
आरक्षण हे आर्थिक आधारावर
In reply to शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण ! by सौन्दर्य
+१
In reply to आरक्षण हे आर्थिक आधारावर by प्रतापराव
नाही नाही.. सरसकट बोलु नका.
In reply to +१ by विशुमित
एकदम संतुलित प्रतिसाद
In reply to नाही नाही.. सरसकट बोलु नका. by पिलीयन रायडर
नाही नाही.. सरसकट बोलु नका.
In reply to नाही नाही.. सरसकट बोलु नका. by पिलीयन रायडर
+1.
In reply to +१ by विशुमित
आरक्षणाचा अंतिम उद्देश
In reply to आरक्षण हे आर्थिक आधारावर by प्रतापराव
धाग्याचा विषय ओपनच्या मुलांचे
देशाचा विकास झपाट्याने होईल का?
In reply to धाग्याचा विषय ओपनच्या मुलांचे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मला वाटते सरकार सध्या ज्या
आरक्षण आणि गरीबी
1. 1940च्या दशकात पडले तेवढेच
In reply to आरक्षण आणि गरीबी by गामा पैलवान
२०१० चे दुष्काळ जास्त भयानक
In reply to 1. 1940च्या दशकात पडले तेवढेच by आदूबाळ
दलित आरक्शण गरजेचं आहे. ओबीसी
आवरा ह्यांना कोणितरी ;) बाबा
सफरचंद आणि हीरोहोंडा
>>