अशा प्रकारच्या कथा कथित स्वरूपात कदाचित विपश्यनेचा प्रसार करणार्यांकडे उपलब्ध असू शकतील. आजच्या घडीला तुम्ही उल्लेखलेला बुद्धविचाराचा प्रचार आणि प्रसार लक्षावधी विपश्यी साधक प्रत्यक्षात करीत आहेतच. आस्था, संस्कार आदि टीव्ही माध्यमातून पू. सत्यनारायण गोयंका यांची प्रवचनेही प्रसारित - प्रक्षेपित होत असतातच. देशभरात त्यांची अगणित सेंटर्स आहेत. (हे सर्व अर्थात तुम्हाला माहीत असेलच).
कोणाला कशा प्रकारे साधना करावीशी वाटेल, तशी ती त्याने करावी हे तत्व मुळात आधी मान्य करूनही हा प्रश्न मनात आला, की बुद्धाच्याच कथांचा प्रसार करावा असे विशेषत्वाने आपल्याला का वाटले असावे?
कदाचित मी फारच विषयाला सोडून लिहिले असेल; तसे असेल, तर क्षमस्व!
तुम्ही वरील लेखाची सुरवात तुमच्या मित्राच्या कौशल्य सांगून केली. तुमच्या मित्रापाशी ती कथाकथनाची दुर्मिळ कला आहे, असे राहून-राहून जाणवते.
त्यांचे बोलणे ध्वनिमुद्रित करून घेतल्यास बहार येईल, आणि तुमच्या मनातला प्रकल्प यशस्वी होईल.
दोनजनाच्या संवादातून घडणार्या छोट्याशा कथा आणि त्यातून दिलेला मोठा संदेश अशा प्रकारचा विचार माझ्या मनात आहे. यात एका ज्ञानी आणि अज्ञानी व्यक्तिचा संदेश / संवाद गृहीत धरलेला आहे. बुद्धच का? येथे नारद आणि वाल्या, यम-नचिकेत, अष्टावक्र-जनक असाही संवाद योजुन काही संदेश देता येईल, दुसरा भाग म्हणजे कथाकथनाचे अंगभूत सामर्थ्य ज्याच्या अंगात आहे त्याला या प्रयोगाद्वारे एक नविन वाट चोखाळता येईल.
येथे उल्लेख केलेल्या माझ्या मित्राकडे मराठी भाषेचे ज्ञान नाही आणि दुसरे म्हणजे त्याला ही कल्पना कितपत आवडेल हेही पहावे लागेल. अर्थात कल्पना छानच आहे.
सर्वसाधारणपणे प्रवचने हे एकांगी प्रचाराचे वाटतात त्यात एकाच व्यक्तिने कथाकथन करुन कोणतेही तत्वज्ञान न सांगण्याचा आव न आणता, असे कथन करावे असे मला अभिप्रेत आहे. अर्थातच या माधमावर हुकमत ( प्रभूत्व) असणार्यांनी विचार करावा असे मला वाटते.
मी या लेखातील उल्लेख केलेक्या माझ्या मित्राशी बोलत असता त्याच्या या कथनकौशल्यावर कौतुकाचा अभिप्राय म्हणून अभावितपणे सांगितले की, आप बहुत अच्छी बात करते हो, त्यावर त्याने स्मित हास्य करुन सांगितले की आजतक ऐसा कोई नही मिला की वो कहे की आप बहुत सच्ची बात करते हो. मै आजतक ऐसे आदमी की राह देख रहा हु की वो कहे की मै सच्ची बात कर रहा हु.
प्रतिक्रिया
बुद्धकथा
तुमच्या मित्रांना गळ घालावी
एक माध्यम म्हणून पहायला हवे.
आम्ही नाही ब्बॉ
अच्छा और सच्चा.