Skip to main content

गणेशोत्सव हायजॅक ?

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 12/08/2017 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
"शिवजयंती सार्वजनिक उत्सव", याचे जनक महात्मा फुले असून, तो उत्सव हायजॅक होऊन, दुसऱ्या कोणाच्या नावे प्रोपागेंडा केला जात असू शकतो काय ?, याबाबत मागे मिपावर मी एक धागा काढला होता. (रेफ: शिवजयंती हायजॅक ) असो आता "सार्वजनिक गणेशोत्सवाचे" जनक कोण ? यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ…लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले गेले. पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केला आहे. गेल्यावर्षी सुध्दा या मंडळाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकारने त्याकडे कानाडोळा केल्यानेच अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली. 1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. 1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली. 1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली. 1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली तर लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ? तुम्हाला काय वाटते ? (जाता जाता अवांतर : नामांकित न्यूज ब्युरो च्या संदर्भाने ... "राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे." या बातमी मागच्या बातमीचा वर वरील उल्लेखलेल्या हायजॅकिंगच्या घटनांमागील एम. ओ. मधे काही साम्यस्थळे आढळतात काय ?)

वाचने 29103
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

मुघलांचा इतिहास वगळला. ह्यात धक्कादायक काय?? ते तर लूटारू होते. ऊलट मराठ्यांचा इतिहास वाढवला. हे आनंददायक. सकारात्मक विचार करा.

कैच्याकै, आमच्या सोलापूरचा आजोबा गणपती 1882 ला 81 ला स्थापन झालाय. 135 वे वर्ष झाले त्यांचे. तो बघून तर लोकमान्य इंस्पायरर्ड झाले असा इतिहास आहे. हा भाऊ रंगारी कोण मधेच?

In reply to by अभ्या..

तेच महंतोय, मग तुम्हीपन, खरा इतिहास पुढे आना । म्हणजे असे इतिहास बदलू लोक , लोकांच्या लक्षात येतील.

In reply to by पगला गजोधर

अडलंय की नडलंय? ते न्यायाधीश बघून घेतील खरा इतिहास वाचून काय सांगायचे ते. . अस्सल वाघ असल्या याचिका बिचिका नसतात वापरत ;)

In reply to by अभ्या..

अस्सल आता कोण उरलय महाराजा ? कोल्हा आता सिंहाच कातड ओढून वावरतोय, कातड सुद्धा चायना मेड. याचिकाबिचिकेच्या ऐवजी इतिहास / पुरावे बदलन्याकड़े कल....

लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ? सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लो. टिळक असोत वा भाऊ रंगारी वा शरद पवार, जे कोण असतील त्याने आज शष्प फरक पडत नाही. नक्की कोण होते हे समजून घेण्याची उत्सुकता नाही आणि गरजही नाही. राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात काय धक्कादायक आहे? मुघलांचा इतिहास काढल्याने काय फरक पडतो? तो इतिहास शिकण्याची गरजच काय?

In reply to by श्रीगुरुजी

इतिहास शिकण्याची शस्प गरज जर नाही ? कोणी त्यावेळी कोणती भूमिका घेतली, आज काय बोलत आहेत, हे जाणून घेत नाहीत, तर शालेय इतिहासाची मोडतोड़ कशाला ? बाबरी मस्जिद चा इतिहास न जाणून घेता का ती फोडली ? महान परंपरा, अनेक स्मृत्या का उगाळल्या जातात मग ? नेताजिंच्या मृत्युविशयक कुजबूजी अजूनही का करतात काही लोक ?

In reply to by पगला गजोधर

http://www.misalpav.com/comment/953575#comment-953575 याच न्यायाने बाबरी मशीद आणि गणेशोत्सव याचा संबंध नाही. तुम्ही मुद्दाम संबंध नसलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत का? मुघल इतिहास वगळण्यात आला आहे हे नक्की काय? तसे असेल तर त्या पुस्तकांची माहिती देऊन वेगळा धागा काढून चर्चा करा. पाठ्यपुस्तकात मुघल इतिहास आणि गणेशोत्सव भाऊ रंगारी याचा संबंध नाही बाबरी मशीदीचा इतिहास तुम्ही वाचून माहिती करून मांडा. मोठा विषय आहे. खटल्यामुळे बरीच माहिती लोकांपर्यंत आली आहे. त्यावर स्वतंत्र पुराव्यानिशी चर्चा करा. त्याचा गणेशोत्सवाशी कसलाही संबंध नाही.

In reply to by मैत्र

धागा हा गणेशोत्सवा बद्दल नाहीये, तर काही ऐतीहासिक फॅक्ट आणि सदय स्थितितिल पब्लिक परसेप्शन बद्दल आहे, आणि आपल्याकडे पब्लिक परसेप्शन फेक इन्फो / न्यूज द्वारे इतिहास म्हणून ठसवन्याची कार्यपद्धत चांगलीच फोफावलिये, पब्लिक परसेप्शन 2 प्रकारे प्रभावित केल जात आहे, पहिली कुजबूजी यंत्रने मार्फत, जस की टिळकानी गणेशोत्सवा ची सुरुवात केली, शिवजन्मोत्सव सुरु केला, वै आणि दूसरी शैक्षणिक इतिहासात फेरफार करुन. इतिहासात फेरफार करुन बाबरी मस्जिद ही राम जन्म भूमि होती, हे काही फार अवघड राहिले नाही, भलेही रामायण हे साहित्य आहे, इतिहास नाही. उद्या काय तर हल्दी घाटतील लढाई अकबर हरला, अस पिल्लू सुद्धा सोडून देण्यात येईल, काय भरावसा ? पुढे तसाच इतिहास ही शिकवाला जाईल. आय होप आता तरी धाग्याचा मुद्दा लक्षात आला असेल.

In reply to by पगला गजोधर

"चुकीचा इतिहास लिहिला आहे किंवा प्रसार केला आहे" अशी मुद्दाम खोटी बोंब करून सामान्य जनतेची दिशाभूल करणे, मुद्दाम वादंग निर्माण करणे, वातावरण कलूषित करणे, जातीय कॉमेंट करणे, sweeping statements करून, वैयक्तिक मते तथ्य म्हणून ठोकून देणे. ही ब्रिगेड ने तयार केलेली proven modus operandi आहे. ब्रिगेड एक मुद्दा plan करून कुजबूज मोहीम सुरु करते. मग वर्तुळात विरोध निर्माण करते. नंतर वाद उभा करते. याचा पुरावे देऊनही उपयोग होत नाही कारण मूळ समाज विघटन, दुहीचा हेतू साध्य झालेला असतो आणि त्यांना पुरावे सोयीचे आणि खोटे हवे असतात. राजकारणासाठी समाजातील शांतता आणि सौहार्द बिघडवणे हे केवळ मानसिक नीचपणाचे आहे. महाराष्ट्रात असे लोक आहेत हे भयानक दुर्दैवी आहे

मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आजचे बी ग्रेडी त्यावेळच्या खंडोजी खोपडे आनी सुर्याजी पिसाळांणा मागे टाकनार. काल आणखी कुठल्यातरी बी ग्रेडी ला देवगिरी च्या वैभवात आनखी काहितरी दिसल होत :)) अर पावन्या देवगिरी चे साम्राज्य कवा व्हुत... देवगिरी चा भुई कोट किल्ला कुठ हाय..खिलजी चे आक्रमन कवा झालते... दे ठोकुन काय बी कदिबी वाचलेल नसतांना. तुम्हि जे वाचता तेच तुमच्या लीखानात दिसते... तुम्हि वाचलेला ईतिहास पवारां पासुन सुरु होउन ...मुंबै च्या मोर्चात संपतो. मा.म. केकाटे

In reply to by थिटे मास्तर

मास्तर, मुद्दा तुमच्या नीट लक्षात आलेला नाहीये ! तुम्ही बहुतेक मनुस्मृतिचे मास्तर असाल बहुतेक.

पगला गजोधर, तुम्हाला टिळकांनी गणेशोत्सव वाढवला हे मान्य का होत नाहीये? जरी सार्वजनिक असला तरी असे कितीसे लोकं साजरा करंत होते? उत्सव वाढवणे हे काम टिळकांचंच ना? भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दल नीईईईईईईईईताद्र बाळगूनही एक प्रश्न करावासा वाटतो. तो म्हणजे रंगारी लोकनेते होते का? तुम्ही लावता त्या न्यायाने आधुनिक काळातला गणेशोत्सवाचे जनक रामदासस्वामी म्हणायला पाहिजेत. सुखकर्ता दु:खहर्ता आरती त्यांनीच लिहिलीये. तुमचा तर्क आजून एका ठिकाणी लावतो. लोकमान्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणायचे (इति व्हयालेंटाईन शिरोल). तर हा असंतोष काय टिळकांनी थोडाच उत्पन्न केला होता? तो तर इंग्रज सरकारच्या मनमानी कारभारामुळे उत्पन्न झाला होता. मग टिळकांना भा.अ.ज. म्हणावेच कशापायी? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

"इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. त्यामुळे टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक नसून, फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे" या मंडलाच्या दाव्याला तुमचा पाठिम्बा आहे, असे दिसते.

मास्तर, मुद्दा तुमच्या नीट लक्षात आलेला नाहीये ! अरे नहि रे पगलैट ;) मुद्दा काहि नाहिच आहे त्याच्यात. तुम्हि तोच केर काढताय जो गेले ३ वर्षे अनेक लेख पाडुन काढताय. Keep It Up. 2024 ला खुप टैम है अभी. तुम्ही बहुतेक मनुस्मृतिचे मास्तर असाल बहुतेक. नाय बा, हा मन्या कोन म्हनायचा. पन आमास्नि पगलैट तुम्हि मा.म.स्मृतिचे कर्मठ अभ्यासक दिसता. केकाटायन चा अभ्यास भी जबरीच म्हनायचा कि तुमचा.

पगला गजोधर, विकिवर टिळकांनी गणेशोत्सवाचं पुनरुज्जीवन केलं असंच लिहिलं आहे. हा उत्सव आधीपासूनच चालू होता. तर मग टिळकांचं नाव हटवून कोणाला नक्की काय हेतू साध्य करायचा आहे, असा प्रश्न पडतो.
याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले.
आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भाऊ रंगारीनीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचे अनेक दाखले आहेत. याशिवाय राज्यसरकारनेही ते मान्य करुन त्या विषयिचा अहवाल दिला आहे, असे असताना सार्वजनिक गणेशोत्सवाला मागील वर्षिच १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा १२५ वे वर्ष साजरे करण्याचे काहीच कारण नसताना, सध्याच्या महापौरानींच हा वाद उकरुन काढल्याचा आरोप रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी केला

अर्र आडनाव बोल्ड करण्यावरुनच लक्षात येतोय किती पराकोटिचा मत्सर आहे ते , लिहिता वाचणार्यांचा म्हणजेच शिकलेल्यांचा ब्रेनवॉश जर असा असेल तर ....... घ्या तुमच्या नावावर गणेशोत्सवाचि सुरुवात केल्याच श्रेय.

In reply to by थिटे मास्तर

बोल्ड करणं मंजे मत्सर कसा? दोन ब्राह्मणांतील विशुद्ध असा इतिहास संशोधनातील रस कशा स्वरुपाचा असतो हे मांडलं आहे.

अगोदर महात्मा फुले असं ऐकलं होतं. आता फुल्यांना बामनी देवाचा विटाळ झाल्याचं पुरोगाम्यांना चालणार नाही म्हणून रंगारी? उजव्या चळवळीला आज करोडो समर्थक आहेत, तरी यांची प्रत्येक चाल परिणामकारक ठरते. ज्यावेळी या चळवळीत जीवच नव्हता त्यावेळेस काय काय कारस्थाने झाली असतील?

In reply to by arunjoshi123

अगोदर महात्मा फुले असं ऐकलं होतं. तुम्हि जोशी, तुम्हिच सगळा चुकिचा ईतिहास लिवला बि अन भोळ्या भाबड्या जंतेस शीकवला बी. तुम्हि म्हंतायसा त्यावर बी सरां नी आपले नौईतिहासकारी ईचार मांडलेयत. http://www.misalpav.com/node/32487

In reply to by arunjoshi123

अगोदर महात्मा फुले असं ऐकलं होतं
महात्मा फुले यांनी सार्वजनिक शिवजयंती, तर या धाग्यात भाऊ रंगारीनीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला, अस लिहिलेले आहे. घाईत प्रतिक्रिया देण्याच्या नादात तुमची नजर चूक झाली असावी.

In reply to by पगला गजोधर

घाईत प्रतिक्रिया देण्याच्या नादात तुमची नजर चूक झाली असावी.
हूं. शिवजंयती नि गणेशोत्सव मधे गल्लत झाली खरी.

जसा राम गणेश गडकरींचा पुतळा काहि चिंधी चोरांनी रात्रीतुन फोडला मग ज्या भुरट्यांनी फोडला त्यांचे नवधर्म संस्थापक आले न्युज चँनल वर बाजु मांडायला, पहिलाच बॉंब अँकर ने टाकला कि गडकरी तुम्हि समजता तसे ब्राम्हण नव्हतेच. तेज्यायला आलेल्या गुंठामंत्र्याचा चेहरा असा काहि झाला होता बास.

In reply to by थिटे मास्तर

तुमच्या प्रतिक्रियेत सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात काहीच आढळत नाहीये ? कदाचित तुमची गल्ली चुकाली असावी ....

गल्ली बरुबर हाय मर्दा आज लय येळ हाय गड्या खर्चायल माह्याकड... नेहमि असल्या हागणदर्या टाळतो, आज म्हनल आज आपुन बि जरा सुवासीक साहित्याचा वास घ्यावा.

In reply to by थिटे मास्तर

नै मास्तर हम्हारा चुकयाच् ... तुमच्या सर्व प्रतिक्रिया या, धाग्या च्या विषयला धरुनच हैत, शिवाय कुठेही तुमची जातीयवादी मानसिकता दिसत नाही, उलट दिसते ते विशुद्ध प्रेम इतर समाजघटकाबद्दल ... फक्त आम्ही व्यक्त झालो, की आम्ही मनुग्रेडि, वै वै

In reply to by पगला गजोधर

मनु ने त्याच्या स्मृति ला घेवुन महाड च्या चवदार तळ्यात तुमचे ईतिहासकार स्वारी नवसंशोधक जन्मण्या अगोदरच आत्महत्या केली.

In reply to by थिटे मास्तर

आत्महत्या केली तरीही, त्याच्या आत्म्याला शांती लाभो, अशीच विश्वचरणी प्रार्थना. नै, उगाच परत 21 व्या शतकात काहीजनांच्या, आंगात परत त्याच्या आत्मयाने संचारुन, धुडगुस नको घालायला, म्हणून काळजी..

In reply to by पगला गजोधर

21 व्या शतकात काहीजनांच्या, आंगात परत त्याच्या आत्मयाने संचारुन, धुडगुस नको घालायला, म्हणून काळजी..
अत्यंत सयंत, सन्मानपूर्वक एक प्रश्न आहे. आणि वरच्या विधानाच्या अनुषंगानेच आहे - बंदिस्त करणे ही पुरेशी सजा आहे का? आणि अन्य सजांची प्रावधान करणारे हे पापी का?

In reply to by पगला गजोधर

एकट्या मनु ने नाहि तर त्याच्या स्मृति ने पण आत्महत्या केलिय त्यामुळे तुमचे वाक्य असे पायजेल. ""त्याच्या व तिच्या आत्म्याला शांती लाभो, अशीच विश्वचरणी प्रार्थना."" उगाच परत 21 व्या शतकात काहीजनांच्या, आंगात परत त्याच्या आत्मयाने संचारुन, धुडगुस नको घालायला, म्हणून काळजी. आता मनु त्याच्या स्मृति ला घेउन अजुनहि कित्येक लोकांच्या स्वप्नात येतो मग लोग आपापल्या उपद्रव शक्ति प्रमाणे धुडगुस घालतात, काहि पुतळे फोडतात, काहि भांडारकर सारख्या संस्थांवर हल्ले करतात, काहि पिवळि पुस्तके लिहिल्या प्रमाणे संशोधन करुन ईतिहास लिहितात...वग्रे वग्रे. आन नाहिच काहि जमल तर मिपा आहेच एक नविन हायजॅक धागा काढायला. गजोधर भौ हा तुमचा शिवजयंति हायजॅक वरिलधागा आणि त्यावरिल डॉ. खरे साहेंबाचि एक प्रतिक्रिया, आणि त्यावरील आपले उत्तर :) http://www.misalpav.com/comment/732386#comment-732386 खरे साहेब :- जाता जाता हे पण सांगून टाका कि गणेशोत्सव कुणी चालू केला आणी गणपती हा देव आहे हा शोध कुणी लावला? गजोधर भौ :- "शिवजयंती कोणी सुरु केली ?" असा प्रश्न होता सर. "सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला ?" असा नव्हता. मग नेक्ष्ट धागा हा का ? गणपती हा देव आहे हा शोध कुणी लावला? त्याच्या अंगात जान्हवे का घालतात ? चालु द्या. तेव्हढिच आमचि हि हि करमणुक.

टिळकांनी सार्वजनिक गणेशौत्सव सुरु केला याला कसलाही पुरावा नाही.ज्याच्यकडे आहे त्याने सादर करावा. सार्वजनिक शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी व सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केले आहेत. (लिहून ठेवतो ,कारण उद्या इतिहास बदलायची खुमखुमी असलेले नागपुरी बोरुबहाद्दर काहीही ठोकून देतील)

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

टिळकांनी या दोन्ही अनिष्ट प्रथांना जोरकस विरोध केला असं देखिल लिहा. आणी नागपूरचे सगळेच बोरू कापायचं कंत्राट नागपूर इंप्रूवमेंट ट्रस्टला काढायला सांगू.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

ओ नाई नाई. अर्धा भाग बरोबर आहे. भाऊसाहेब रंगारींची सुरुवात व्हायच्या आधी आजोबा गणपती होता. आमचे ग्याझेट पण तेच म्हणतेय आणि रंगारीचे म्हणाल तर त्यांना १२५ वर्षे झालीत, आजोबा गणपतीला १३५ वर्षे. Ganapati Festival is carried out with great pomp and gaiety. Ajoba Ganpati is 100 years old Ganpati. Even before Tilakji started the Ganesh festival, it is said that Tilakji got inspired by the Ajoba Ganpati celebrations from Solapur and later Ganesh festival now is national Festival.

In reply to by अभ्या..

आजोबा गणपति मंड़ळ / कार्यकर्ते, यानी काही, याबाबत दावा केला आहे का ? तुमच्या वरच्या प्रतिक्रियेचा संदर्भ देता का प्लीज ? आजोबा गणपतिने सार्वजनिक उत्सव सुरु करण्या मागे कशाची प्रेरणा होती ? कोण होते या गणपतिचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर करण्यात, पुढाकार घेणारे ? कोण होते या मंडळ मागचे प्रणेते, की ज्यांच्यापासून टिळकांनी ही प्रेरणा घेतली... संधर्भ दया वाचायला आवडेल .

नागपूर इंप्रूवमेंट ट्रस्ट हागवण थांबवण्यासाठी खास एरंडेल हि बनवते. पत्ता द्या पाठवतो.

धाग्यावर ब्राह्मण्यवाद चवताळला..!! चालू द्यात टॉयलेट एक प्रेम कथा स्पॉन्सरड बाय नागपूर ब्रिगेड..!!

In reply to by विशुमित

टॉयलेट नाय हागणदारी....बायकांच्या डोक्यावर तर ह्यांना पदर पाहिजे....पण त्या बिचार्‍या कश्या आपलि लाज झाकत हागणदारीत जातात ते ह्यांना नाहि दिसत. आणि ब्राह्मण्यवाद ह्याचा विषयच नाहिये. हे नागपूर ब्रिगेड काय आहे हे ही नाहि माहित पण तु मे रि खुजा मै तेरि खुजाता हु असय ते. इथे एक गोष्ट लक्षात आलिये कि हागणदरी वाल्यांना त्यांच्या भाषेतच बोलायच.

In reply to by थिटे मास्तर

...आणि स्वत:ला बिचारा बळीराजा असे संबोधून सहानुभुतीचा ओघ स्वतःकडे वळवून घेता येतोच.

In reply to by विशुमित

ह्या धाग्यावर वर जाल तर माझि आणखि एक प्रतिक्रिया दिसेल तुम्हाला. काल आणखी कुठल्यातरी बी ग्रेडी ला देवगिरी च्या वैभवात आनखी काहितरी दिसल होत :)) अर पावन्या देवगिरी चे साम्राज्य कवा व्हुत... देवगिरी चा भुई कोट किल्ला कुठ हाय..खिलजी चे आक्रमन कवा झालते... दे ठोकुन काय बी कदिबी वाचलेल नसतांना. तुम्हि जे वाचता तेच तुमच्या लीखानात दिसते... तुम्हि वाचलेला ईतिहास पवारां पासुन सुरु होउन ...मुंबै च्या मोर्चात संपतो. मा.म. केकाटे

आपण भारतीय नेहमीच भुतकाळातच रमतो त्यामुळेच आपल्याला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असत नाही !

In reply to by धर्मराजमुटके

बरोबर आहे । उदा. आता भूतकाळात रमणे, म्हणूनच मस्जित पाडुन मंदिर बांधने, बॉम्बे चे मुंबई नामकरण, वेदांचे दाखले देउन गोमांस राजकरण करुन, लोकांचा जीव घेणे। पद्मावती चित्रपटाचा सेट जाळणे .... अश्या सर्व गोष्टी आल्या

अभ्या. धन्यवाद. नवीन माहिती कळाली. मला शिकवलेल्या इतिहासानुसार सार्वजनिक गणेशोत्सवाचा वापर जनजागृतीसाठी लो. टिळकांनी केला.

ला जोरदार अनुमोदन तस पाहिल तर आमचा आजोबा गणपतीच प्रणेता म्हणायला हवा सार्वजनिक गणेशोत्सवाचा. भाऊ रंगारी फार नंतरची गोष्ट आहे. पण ईतकी वर्षे रंगारी मंडळाने काहीच हरकत घेतली नाही ते का बरे

In reply to by मनिमौ

आजोबा गणपति मंड़ल / कार्यकर्ते, यानी काही दावा केला का ? संदर्भ देता का प्लीज ? आजोबा गणपतिने सार्वजनिक उत्सव सुरु करण्या मागे कशाची प्रेरणा होती ? कोण होते पुढाकार घेणारे ? वाचायला आवडेल .

आम्हाला पूर्वीच्या आक्रमण कर्त्यांबद्दल तेवढा राग नाही आज चिन, पाकिस्तानचा राग नाही, आजच्या काळात "चोटीकटवा" वर आम्ही विश्वास ठेवू पन जातीपाती, राजकीय पक्ष म्हनलं की तिच्या... एकदम एकमेकांच्या ऊरावर बसायला तयार.


In reply to by पगला गजोधर

प.ग., त्याचं काये की जे मोठमोठे तत्त्वचिंतक होऊन गेलेत ना म्हणजे विवेकानंद, टिळक, जिद्दु कृष्णमूर्ती, इत्यादि; त्यांच्या लेखनातून एक गोष्ट ठळकपणे जाणवते. ती म्हणजे, आपण नवं काहीतरी सांगताहोत, अशी त्यांची स्वत:ची धारणा आजिबात नव्हती. ते जे काही बोलले ते अगोदर इतरांनी सांगितलेलंच होतं. फक्त ते ते प्रेषित जरा वेगळ्या आणि लोकांना पटेल अशा शब्दांत तीच तीच सत्ये परतपरत मांडत असंत. गणेशोत्सवात टिळकांचं योगदान काय आहे हे तुम्हाला कळले असेलशी आशा आहे. पटलं तर पहा, अन्यथा सोडून द्या. आ.न., -गा.पै.