(चंम्मतग)
पेरणा
हायवे वरच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक
"लोक काय म्हणतील कृत्रीम बंधन सत्वर तोडुनी टाक !"
बायको नामक भूत बाटलीस कायम भिववीत होते
त्या भीतीने तरल काहिसे ग्लासातून निसटत होते
गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको गाय छाप मळलेली
वाट खोकुनी माझी लावीते, वीडी कोंदटलेली,
जेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली
ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली
त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"कितीही प्या, पण ध्यानी ठेवा..चखण्याविण "गंमत" नाही !"
भूछत्री
ओल्ड माँक ती ग्लासामध्ये,
अप्रतिम !
तर्राट कविता.
मस्तं जमलंय.जेडी, शिवास,
जेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली:) हे इतकं मस्तं लिहिलंय तुम्ही की हा पुर्ण सीन animated रूपात डोळ्यासमोर उभा राहीला अगदी. एखाद्या डिज़ाइनर रम ग्लासच्या advertisement साठी छान आयडीया आहे. अवघडून बसलेली ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली आणि म्हणाली...''Ah! I am home....finally!+1, पूर्ण सहमत.
प्वाट फुटलं हासून हासून!
आरारारा!
मिपाचे विडंबन सम्राट.... _/\_