तात्या,
झकास लेखन!
बाकी, तुमचे मुखप्रुष्ठावरचे रसग्रहण (आणि नाठाळांच्या पार्श्वभूमीवरील लत्ताप्रहारही!) उत्तमच असते. पण दरवेळी प्रतिक्रिया देणे जमत नाही.
बाकी, सुगरण पक्ष्याचं मला नेहमीच अप्रूप वाटतं.
एवढं सुंदर घरटं तिथे नर बनवतो आणि मादीला आकर्षित करू पाहतो. मादी मग त्या घरट्याचं `इन्स्पेक्शन' करून त्यात राहायचं की नाही, हे ठरवते. राहिली, तर पटली. नाही, तर बसा बोंबलत!!
आणि आपण क्रेडिट मात्र सुगरणीला (मादीला) देतो.
कलीयुग आहे बाबा!!!
घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही!
क्या बात है ! सही तात्या.. सुंदर वाक्य !
हे आठवलं बघा.. लगेच.
निळा पारवा
वसुंधरेच्या माथ्यावरती
घुमतो आहे
आभाळाचा निळा पारवा.
डोळ्यावरती राखी ढापण,
लक्ष सदाचें धनिणीपाशी
अन धनिणीच्या पायामधल्या
रुणझुणणाऱ्या नादापाशी.
-अवचित काही घडलें
आणि दचकला निळा पारवा;
टपोरल्या डोळ्याच्या गुंजा.
जाती त्याच्या अगदी जवळून
किलबिलणारे कुणी मुशाफिर
रंगित पक्षी…
कुणी घासली चोच तयावर;
कुणी घातली शिळ तयाला;
ऐकवैली…पंखाची फडफड;
दाखविले चित्रांकित वैभव
पंखावरचे.
गिरकी घालुन त्याच्या भवती
निघुन गेले.. धुंद मुशाफिर;
झुलवित अपुले पंखे,
झुलवित त्याला.
पुन्हा दचकला निळा पारवा’
मनात भरले वारे–\
पिसा पिसातुन थरथरणारे;
फुगली पंखे;
उचलुन धरला पोटापाशी
पाउ एकुटा;
मान ताठली जरा खालती
झेंप भाराया…
तोच वरी ये वसुंधरेचा
तांबुस गोरा कोमलसा कर.
भरवई त्याच्या टोची मध्ये
एकच मोती
शुभ्र टपोरा,
एकच माणिक , झगमगणारे.
पुन्हा टेकले पाउल खाली;
नितळाई ये पुन्हा पिसांवर
-आणि लागला पुन्हा घुमाया
आभाळाचा……. निळा पारवा.
इंदिरा संत.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.सत्य वचन :D
पाखराची कारागिरी
देख रे मानसा ....
किती सोप्या शब्दात...केव्हढी मोठी गोष्ट सांगीतली आहे . मानवाला स्वतःच्या बुद्धीचा, कर्तुत्वाचा इतका अभिमान/गर्व आहे ...पण हे लहानसे पाखरु सुद्धा कमी नाही ..
कविता सुंदरच आहे आणि त्याचं रसग्रहण सुद्धा सुरेख ..
एकदा गावाला गेले होते तेंव्हा वाडीमध्ये एका झाडाखाली सुगरणीचा खोपा पडलेला मिळालेला.. रिकामा होता. तेंव्हा तो बाबांनी मध्ये कापून दाखवला होता. अतिशय सुंदर वीण होती. आत कप्पे होते. इवलासा जीव इतके सुंदर घरटे बांधतो हे खरच वाटत नाही. बहीणाबाईंनी थोडक्या शब्दात या पाखराचे आईपण दाखवले आहे.
एकदम मस्त! या गाण्याचे चित्रीकर्ण मला वाटते भक्ती बर्व्यांवर झाले होते. या पारंपारीक-अधुनीक मिश्रीत सुरेख चालीबरोबरच मला आठवतेकी बहुदा आशाच्या आवाजात पण एका वेगळ्याच चालीत हे गाणे आहे. ती चाल पण खूप छान आहे. कदाचीत सुधीर फडक्यांची असावी. मानिनी मधे होते का ते आठवत नाही...
सुंदर रसग्रहण तात्या, मजा आली ...
>>घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही!
वाह .. क्या बात है ...!!!
बाकी बहिणाबाईं विषयी काय बोलायचे, अगदी वेचक साध्यासोप्या शब्दात योग्य तो संदेश पोहचवण्यात त्यांचा हातखंड.
यानिमीत्ताने आपण टाकलेल्या मुखपॄष्ठावरील भाईकाकांचा किस्सा आठ्वला ...
मस्त आहे, चालु द्यात ..!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
बहिणाबाईंच्या सर्वच कविता खुप सोप्या पण आशयपुर्ण आहेत. प्रत्येक कविता त्यानी वेगळ्या उंचीवर नेवुन ठेवल्या आहेत. ह्या अगोदर तुम्ही अरे संसार संसार ह्या कवितेचे मुखपृष्ठ तयार केले होते ते देखिल खुप छान होते.
वेताळ
घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही!
तात्या... खूप छान !
आवडलं! :)
आपलं घर ... ते आपलं घर.... मग ते चंद्रमौळी झोपडी का असेना!
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
तात्या गुरूजींचा तास आवडला.
पण तास पाच मिनिटांतच संपला.
अजून असे रसग्रहण वाचायला नक्कीच आवडेल तात्या.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
जीव झाडाले टांगला.. ही ओळीला, त्याच्या चालीला, त्यातल्या गायकीला आपला सलाम..!
माझाही सलाम.
तात्या, सुंदर रसग्रहण.
पुढल्या कडव्यांबद्दलचं रसग्रहण/प्रवचन पुन्हा कधितरी!
हे "कधितरी" लौकर येवो ही विनंती.
तात्या खुपच छान लिखाण आहे तुमच.
खरच वाचताना जीवाची घालमेल झाली हो. आमच्या सारख्या नोकरदार आयांचा असाच रोज जीव टांगलेला असतो हो. माझी पण ३ वर्षाची मुलगी आहे. म्हणुन मला टांगलेल्या जीवाची स्तिथी चांगली माहीत आहे.
खूप सुंदर आणि सोप्या शब्दात कवितेचा गाभारा उलगडून दाखवला आहे तुम्ही तात्या!!
खूपच सुंदर!
अवांतरः बहुतेक सगळ्यांना ही अहिराणी भाषा आहे असे वाटते. पुण्या-मुंबईकडे बहिणाबाईंच्या कविता अहिराणी भाषेत आहेत असे सर्रास म्हटले जाते पण ते चूक आहे. बहिणाबाईंच्या या गोड कविता खान्देशी (अगदी खास जळगावच्या आणि जळगाव जिल्ह्यात बोलल्या जाणार्या) भाषेत आहेत. अहिराणी भाषा ही खूप वेगळी आहे आणि ती नाशिक जवळच्या सटाणा, कळवण, धुळ्याजवळच्या नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या भागात बोलली जाते. अहिराणी भाषा पटकन समजायला अवघड आहे. फार वर्षांपूर्वी किशोरी शहाणेला घेऊन 'सटीना टाक' नावाचा एक अहिराणी चित्रपट प्रदर्शित झाल्याचे स्मरते.
त्यात्या, येऊ द्या अजून फर्मास लेख!
--समीर
तात्या..........
अतिशय सुंदर व अप्रतिम रसग्रहण!!!!!!!!!!!१
कुठे तो सुगरणीचा खोपा आणि कुठे आपली दगड विटांनी बांधलेली घरे!
तिच्या त्या सुंदर खोप्याची उब माणसांनी बांधलेल्या आद्ययावत घरांमधे मिळते का आताशा?
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती!
त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती!
आपण घरे बांधुन मनात या कविता आणि गाणीच म्हणत बसतो.
तो जिव्हाळा ती उब आताशा खरच इतिहासजमाच झाली आहे या स्वार्थी जगात.
त्या सुगरणीच्या खोप्यात मनुष्यप्राणी शरीरानेच काय मनाने देखिल मावु शकणार नाही कधीच?
"अनामिका"
वरती सर्वांनी सगळे शब्द वापरलेत.
तुझ्या लिखाणात अवचित हळवेपणाचा असा काही स्पर्श असतो ना की जणू बेसावधपणे भैरवी ऐकताना काळजात खोलवर घुसणारा एखादाच स्वर, का ते कळत नाही पण जाणवत मात्र रहातं!
एवढं तुटपुंजं मात्र नका लिहू बॉ! आम्हा वाचणार्यांची घालमेल होत रहाते. :(
चतुरंग
प्रतिक्रिया
तात्या, झका
झकासच...
+१
+२
+३
+४
सुंदर
मस्त.
क्या बात है...
सुरेख रसग्रहण
चांगले रसग्रहण
जीव झाडाले टांगला..
आण़खी
+१
छान लिहीलय तात्या..
फार छान
अरे वा!
खुप सुंदर . .
उत्तम
मस्त!
आपुलकीने
सुंदर रसग्रहण!
मस्त ..!!!
उत्तम
उत्तम
खुपच भावपुर्ण लेखन केले तात्या तुम्ही
घरट्याची
+१
+२
तात्या
मस्तच !!
अप्रतिम..
जीव झाडाले
तात्या... खूप छान !
जीव झाडाले टांगला
माझी पण ३
+१ वाह....
वाचनीय!
तात्या..........
झुलता
तात्या...
तात्या, छान
तात्या, काय बोलू?