Skip to main content

'मिपाभूषण'

लेखक लक्ष्मणसुत यांनी शुक्रवार, 27/02/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.

येथे नित्य नविन ते लिहावे | 'विरंगुळीत' प्रत्येका करावे ||
काथ्या कुटावा वा घालावा वाद | पण रोजच टंकावे ||
त्यातून निवडावा (तात्यांनी) एक 'मिपाभूषण'| त्यासी देऊन पुरस्कार (शालजोडीतून) करावा सन्मान ||
विचार व्हावा म्हणे लक्ष्मणसुत | असे आमुचे विनम्र आवाहन ||

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2966
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मिपाविभूषण व मिपारत्न ही होऊन जाऊद्या.... :)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.


लक्ष्मणसुतराव,

आम्ही पहिला मिपाभूषण पुरस्कार आपल्यालाच जाहीर करत आहोत..! :)

तात्या.


In reply to by विसोबा खेचर

>>आम्ही पहिला मिपाभूषण पुरस्कार आपल्यालाच जाहीर करत आहोत..!
खल्लास ऽऽऽ
अगदी "चतुर" का काय म्हणातात तशी व एकदम छप्परफाड प्रतिक्रीया.
एकदम योग्य निवड, विजेत्याचे अभिनंदन ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)


In reply to by छोटा डॉन

नोवेम्बर मध्ये धोन्डोपन्तांनी घेतलेल्या "देवद्वार-छंद- काव्य-स्पर्धेचा" निकाल काय लागला?
त्यात, जो प्रथम येइल.. त्याला "मिपाकाव्यरत्न" ने पुरस्कृत करावे... अशी नम्र विनंती!

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||


In reply to by विसोबा खेचर

ज ह ब र्‍या सत्कार एकदम तात्या __/\__
=)) =))

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य


तात्यासाहेब, ह्ये जे काही लक्शुमणसूत आहे नां, ह्ये जरा मला वेगळंच वाट्तय बघा. हे आसं का हो लिहतंय ? आपल्यात सगळंच मिपाकर 'मिपाभूषण' आसतंय कि. तुम्ही त्यालाच मिपाभूषण दिलंय, त्ये बरं केलत. फुड कुटतरी उपयोगी पडंल त्याला हि डिग्री.
आन् माला तर भूषण म्हटल्यावर " आव झालेल्या चेहर्‍याचं "भारतभूषणं" च आटवतं बघा.


In reply to by नाना बेरके

आन् माला तर भूषण म्हटल्यावर " आव झालेल्या चेहर्‍याचं "भारतभूषणं" च आटवतं बघा.

हम्म! प्रत्येकाची मतं! भारतभूषण हा माझा मात्र आवडता नट आहे. परंतु आपल्या मताचाही मी आदर करतो.. :)

तात्या.


In reply to by नाना बेरके

लक्ष्मणसुत उवाच्

तात्या,
ते 'रावसाहेबानं' (नानानं) आपल्या 'मराठी' भाषेला नविन अलंकार प्रदान केला.
'फुगीरी' अलंकार.