बाबाचं मन!
एवढस पिल्लू... My bundle of joy
हसून म्हणालीस... त्यात तुझे efforts काय?
आईने वाढवलं... जन्माला घातलं!
तुझं नाव लावून
हातात तुझ्या दिलं...
आहेस तू... असणारच आहेस!
माझं सगळं तर आईच बघते आहे..
घर तू चालवतोस?... तुला चालवायचंच आहे!
आपापलं जगणं आपण जगतोच आहे!
खरंय पिल्ला... वेळ नाही दिला..
माझं नाव आणि फक्त पैसा दिला!
आई सांगत होती तुझं लडिवाळ वागणं
तिच्या डोळ्यात दिसत होतं तुझं मोठं होणं!
वाटलं होतं तुझ्याशी दोस्ती करीन
मन सारं कधीतरी मोकळं करीन
पिल्लू जसजसं मोठं झालं
आकाश त्याला बोलावू लागलं
बेटा आता मीपण थोडा मोठा झालोय
दमलो... थोडा बसिन म्हणतोय..
जमलंच तर कधी मागे बघ!
बाबा असेलच
त्याला किमान 'हाय-हॅलो' म्हण;
खरच केली कायम धावपळ..
आसुसलो तुझ्या प्रेमाला मी पण..
काय करू पण 'बाबा' झालो
तुझ्या जन्माने जवाबदार झालो
शापित असतं हे बाबा असणं..
पिल्लाचं मन आईतच असतं!
व्वा, मनातलं बोललात !
धन्यवाद
थोडे निगेटिव्ह वाटत आहे,
दशानन जी,
खुप छान लिहिलंय.
छान...
छान मांडलीय व्यथा बापाची
मनापासून धन्यवाद
छान कविता
धन्यवाद सौंदर्य