पण ह्या निकालाचा पुढे कसा वापर गेला जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे सध्या तरी एखाद्याबद्दल लिहिताना नीट विचार करून लिहावे लागेल. कोणीही उठून तक्रार केल्यास काय घ्या? Smile
देवदत्त जी सुंदर लेख.
बरेचसे निकाल हे न्यायमुर्तींच्या अन्वयार्थावर अवलंबुन असतात. निकाल म्हणजे न्याय नव्हे. ती केवळ लोकशाही पद्धतीच्या न्यायव्यवस्थेची तांत्रिक बाब आहे. न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे "कायदा आणि माणुस" हे पुस्तक वाचनीय आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अविष्कार/ अधिकार हा लोकशाहीला मारक कि तारक? असा स्वतंत्र विषय होउ शकतो. एकाच स्वातंत्र्य दुसर्याची कोंडी करु शकते हे मान्य आहे. अशावेळी "तारतम्य" हा व्यक्तीसापेक्ष घटकावरच अवलंबुन राहवे लागते.
अर्थात या निकालाचा वापर इष्टापत्ती म्हणुन देखील करता येईल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
माहितीपुर्ण