सह्याद्रीतल्या अपघातांची शेल्फी
सध्या जे आपल्या सह्याद्री मध्ये अपघातांच सत्र सुरू आहे, त्यावर काही तरी बोलावं आणि त्या संदर्भात काही चर्चा करावी या हेतूने हा लिहायचा एक प्रयत्न.
लिखाण माझा पिंड पण नाही. पण सध्या जे काही विचित्र अपघात घडतायत त्या मध्ये विनाकारण माझ्या सह्याद्री बद्दल ज्या काही शंका,भीती पसरवली जात आहे तो दूर करण्याच्या साठी हा सगळा लेखनाचा प्रपंच. हो जाणीवपूर्वक मी 'माझा सह्याद्री' म्हणतोय कारण त्यानेच मला घडवलं आहे असा माझा ठाम विश्वास आहे. मला तो गुरुस्थानीच आहे. मी त्याला माझाच समजतो आणि त्याने देखील कधी मला परकं समजलेलं नाही. सह्याद्री च्या अंगाखांद्यावर खूप बागडलो,हुंदडलो,त्याचं पाणी पिऊन नकळत त्याचे संस्कार देखील आत कधी गेले ते कळलेच नाही.
खरं तर मी स्वतःला 'ट्रेकर' वगैरे मानत नाही.आम्ही सगळे या सह्याद्रीची पोरं. ट्रेकर म्हणलं की जरा परकं असल्या सारखं वाटतं. पण सध्या आजूबाजूचं वातावरण पाहता एवढी फिलॉसॉफी एखाद्याला झाडली तर ते म्हनलं काय येडं आहे हे. येडं म्हणून घ्यायला पण माझी हरकत नाही पण कुठं,कशाला एखाद्याला सगळं सांगत बसा. पण आता हे सगळं सांगायची आणि चांगलं विस्कटून सांगायची वेळ आलीय असं वाटलं. म्हणून बाह्या सरसावूनच लिहायला बसलो.
तसं म्हनलं तर अल्लड वयातच या सह्याद्रीचा नाद लागला. सध्याच्या भाषेत सांगायच तर ते addicted का काय ते म्हणतात ते. आणि या सह्याद्रीने पण खुल्या मनाने आम्हाला त्याच्या कवेत घेतलं. त्याच्या अंगाखांद्यावर खेळू दिलंं. माया लावली. थंडी-पावसाचं राहायला गुहा दिल्या,बिसलेरी झक मारल असं प्यायला पाणी दिलं. एवढं सगळं का तर आम्ही त्याला आमचं मानलय. त्याने पण कधीच आम्हाला हाडतुड केली नाय. एखादी माहेरवाशीन माहेरी गेल्यावर तिला जो आनंद मिळतो तोच आनंद या सह्याद्रीत आम्हाला मिळतो. आमच्या सारख्याचं माहेर च आहे हे. एखादा ट्रेक हुकला की तोंडं बारीक व्हायची आमची. लै काळजी आणि जीव लावला यानी आम्हा पोररांना. इतक्या वर्षात आमचा साधा पाय देखील या सह्याद्री ने कधी मुरगळू दिला नाही आणि आता अचानक इतक्या लोककांच्या जीवावर का रे उठला बाबा तू? जिकडे बघावं तिकडं कोणतरी मरतंय, जखमी होतंय. काय झालं नक्की याला? का कोपला एवढा रे तू? आम्हाला प्यायला बिसलेरी पेक्षा भारी पाणी देतोय आणि बाकी लोक्काना त्याच पाण्यात ढकलतो? असा फरक का रे बाबा?
म्हनलं बघावं जरा याच उत्तर मिळतयं का.
जरा शोधाशोध केल्यावर याचं उत्तर या बाकी मंडळी कडूनच मिळालं.
याचं साधं आणि सरळ उत्तर असं सापडलं की ही जी लोकं मरतायत, जखमी होतायत यातल्या बहुतांशी लोककांनी या सह्याद्रीला कधी आपलं मानलंच नाही.
हे इथं येतायत फक्त हुल्लडबाजी करायला, दारू प्यायला, बाकी किडे करायला.यांना या सह्याद्रीचे पण काही नियम आहेत ते देखील माहित नाहीयेत मग ते पाळायचं लांबच राहिलं. काही दुर्दैवी अपघात होतही असतील ज्यात कुणाची चूक नसेल.शेवटी अपवाद प्रत्येक गोष्टीला आहे. अशा घटनांचं वाईट त्या सह्याद्रीला पण वाटत असणार. असे काही अपवाद वगळता तो कशाला कुणाला मारतोय तुम्ही मरताय तुमच्याच चुकीमुळं. दिसला धबधबा की काढ कपडे, हान उडी, घे सेल्फी ,
दिसला एखादा कडा की चढ वर हान कनाकना 5/10 फोटो, फोटो पण साधा नाय काढणार, यांचं म्हणणं काय तर "मी वर चढतो, आणि उडी मारतो मग त्याचा फोटो काढ". आता ही उडी नीट बसली तर ठीक, एकतर ते पाय मोडून तरी येतं नायतर तसंच खाली जातंय, त्या सेल्फी ला तर लै उत आलाय. कुठं ते सेल्फी काढावं ते पण कळत नाही, पार टोकाला जाऊन ती सेल्फी घ्यायची.आणि ती सेल्फी मग येती दुसऱ्या दिवशी पेपरला. पेपरला बातमी तर अशी येती 'एका ट्रेकर चा गडाच्या कड्या वरून पडून मृत्यू' . ट्रेकर आणि हा? अशा लोक्काना ट्रेकर म्हणणं म्हणजे जे खरे ट्रेकर आहेत, ज्यांचं प्रेम आहे या सह्याद्रीवर त्यांचा तो अपमान आहे.
सुरक्षेच्या द्रुष्टीने कसलीही माहिती घेत नाही. कुठंही घुसा, कुठंही उड्या मारा. मग दुसरं काय होणार.अति तिथं माती होणारच. या मंडळी चा अतिउत्साह तर एवढा असतो की घराची वेस ओलांडली की यांना काय फेफरं भरतं,यांच्या अंगात काय संचारत तेच कळत नाय.काय करू काय नको याच्या नादात पार जीव गमावून बसतात. कुठं गाडीच्या टपावरच बस,बोनेट वरच बस, खिडकीतून बाहेर येऊन बोंबल. अरे बाबा मान्य आहे की तुला लै आनंद झालाय पण हे चाळे कशासाठी?
आणि ही सगळी सर्कस बघायची असेल तर शनिवार-रविवार लोणावळा , ताम्हिणी, खडकवासला कुठेही जा. जेवढे प्राणी एखाद्या प्राणी संग्रालय मध्ये नसतील तेवढे तर हिकडं बोंबलत फिरत असतात. पावसाळा म्हटलं की सगळ्यांनाच भिजावं वाटतं, त्याचा आनंद घ्यावा वाटतं. मस्त पावसात मित्र, फॅमिली सोबत भिजावं,कुठं एखादं गरम कणीस खावं. सगळ्यांनाच वाटतं असं. अहो पण आनंद व्यक्त करायची ही कसली अघोरी पद्धत.
हे सर्व पाहता,आणि लोक ज्या प्रकारे जीवाशी खेळ करून वर्षाविहार करतायत ते
पाहता जे काही अपघात होतायत ते जेवढे होऊ शकतात त्यापेक्षा कमीच होतायत,असं दिसतंय. कळस म्हणजे यांत फक्त तरुणाई नसून काही फॅमिली पण आहेत. भर घाटाच्या वळणावर, कडे कपारीत, रिस्की एज वर यांचं फोटो सेशन सुरु असतं.
हे सगळं सांगायचं कारण की अशा घटनांची झळ सगळ्यांनाच लागू लागलीय. ज्यांना या सह्याद्री च्या कवेत यायचंय त्यांना याची भीती वाटू लागलीय, पोरगं कुठं ट्रेक ला गेल्यावर घरी आई-वडील तो घरी येसतोवर त्याची काळजी करत बसलेले असतात, ज्यांना निसर्ग खुणावतोय ते त्यालाच घाबरू लागलेत, त्याच्यावर शंका घेऊ लागलेत.
अशी अजूनही भरपूर उदाहरण देता येतील,कारण आपल्या आजूबाजूला विकृतीच तेवढी वाढत चाललीय.होय ही विकृतीच आहे.एखादा अपघात झाला तर त्याला मदत करायची सोडून त्याची शूटिंग,फोटो काढणारी जमात आपण,तोंडं वाकडी करून करून आपण माकडा पासूनच जन्म घेतलाय हे वारंवार सांगणारी किती तरी लोकं आपल्या आसपास आहेत. फोटो किंवा शूटिंग काढण्याला माझा आक्षेप नाहीय आणि तो घ्यायचा माझा काही अधिकार पण नाहीय.तो प्रत्येकाचा खाजगी विषय आहे पण तो खाजगी विषय जेव्हा सार्वजनिक ठिकाणी विचित्र प्रकारे मांडला जातो खास करून आमच्या सह्याद्रीच्या गड किल्ल्यांवर तेव्हा त्याचा फटका त्या मंडळींना जागच्या जागेवर बसत असतो. मग आमच्या गड किल्ल्यांवर शंका घ्यायचं कारण नाही की अमुक गड असाय अमुक किल्ला बेकार आहे.
यांना पाहिलं त्याच्याशी गट्टी जमवावी लागेल मग त्याच्या अंगाखांद्यावर खेळू देईन तो.तुम्हाला पण माया लावल तो. तुम्ही डायरेकट् ओळख ना पाळख त्याच्या डोक्यावर बसून त्याला त्रास देऊ लागलात तर तो काय आपण तरी ते सहन करू का?
या सह्याद्रीशी इतक्या वर्षांची घष्ठन असून देखील आजही जेव्हा एखाद्या गड किल्ल्यावर जातो तिथं त्याची आदरयुक्त भीती ठेऊनच. त्याच्या धाकातच आम्ही वावरत असतो. त्याच्या कुशीत असताना वाऱ्याची झुळूक बनून तो आमचे लाड ही करतो तर कधी ढगांचा गडगडाट करून आम्हाला घाबरवतो पण.
हा सह्याद्री म्हणजे भोळा शंकर आहे. एखाद्यावर माया लावली की त्याची पुरेपूर काळजी घेणार, त्याला सर्वतोपरी जपणार पण त्याच्या मर्यादा ओलांडून जर कोणी त्याला आव्हान देत असेल तर सह्याद्रीचा तांडव झेलायची ताकत अजूनतरी कोणामध्ये आली असेल असं मला वाटत नाही.
हे सर्व लिहून माझीपण जवाबदारी संपत नाही आणि वाचून तुमचीपण संपणार नाही. एखाद्या गड किल्ल्यावरच नाही आपल्या सह्याद्रीत कुठेही, अशी पिऊन हुल्लडबाजी,धिंगाणा चालू असेल तिथं फक्त.. It's so cheap na..... असं म्हणून नाही भागणार आता.काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेन.
आपल्या राजांनी हे सगळे गड-किल्ले लढवले जगवले वाढवले, आपण निदान त्याचं पावित्र्य तरी राखूया की, काय म्हणता....!
याद्या
8150
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
सहमत.
खरयं तुमचं....
In reply to सहमत. by टर्मीनेटर
छान वाटली भाषा ... अगदि मनाला
In reply to खरयं तुमचं.... by विखि
भावना पोहचल्या..!!
In reply to खरयं तुमचं.... by विखि
"""अरे बाबा मान्य आहे की तुला
In reply to भावना पोहचल्या..!! by विशुमित
हा सह्याद्री म्हणजे भोळा शंकर
हा सह्याद्री म्हणजे भोळा शंकर आहे. एखाद्यावर माया लावली की त्याची पुरेपूर काळजी घेणार, त्याला सर्वतोपरी जपणार पण त्याच्या मर्यादा ओलांडून जर कोणी त्याला आव्हान देत असेल तर सह्याद्रीचा तांडव झेलायची ताकत अजूनतरी कोणामध्ये आली असेल असं मला वाटत नाही.प्रचंड सहमत.खुप मनापासून आणि शंभर टक्के खर लिहिलय.
सेल्फीछाप मंडळीचा निराळाच
In reply to खुप मनापासून आणि शंभर टक्के खर लिहिलय. by दुर्गविहारी
वाईट
तसं म्हनलं तर अल्लड वयातच या सह्याद्रीचा नाद लागला. सध्याच्या भाषेत सांगायच तर ते addicted का काय ते म्हणतात ते. आणि या सह्याद्रीने पण खुल्या मनाने आम्हाला त्याच्या कवेत घेतलं. त्याच्या अंगाखांद्यावर खेळू दिलंं. माया लावली. थंडी-पावसाचं राहायला गुहा दिल्या,बिसलेरी झक मारल असं प्यायला पाणी दिलं. एवढं सगळं का तर आम्ही त्याला आमचं मानलय. त्याने पण कधीच आम्हाला हाडतुड केली नाय. एखादी माहेरवाशीन माहेरी गेल्यावर तिला जो आनंद मिळतो तोच आनंद या सह्याद्रीत आम्हाला मिळतो. आमच्या सारख्याचं माहेर च आहे हे. एखादा ट्रेक हुकला की तोंडं बारीक व्हायची आमची. लै काळजी आणि जीव लावला यानी आम्हा पोररांना. इतक्या वर्षात आमचा साधा पाय देखील या सह्याद्री ने कधी मुरगळू दिला नाही आणि आता अचानक इतक्या लोककांच्या जीवावर का रे उठला बाबा तू? जिकडे बघावं तिकडं कोणतरी मरतंय, जखमी होतंय. काय झालं नक्की याला? का कोपला एवढा रे तू? आम्हाला प्यायला बिसलेरी पेक्षा भारी पाणी देतोय आणि बाकी लोक्काना त्याच पाण्यात ढकलतो? असा फरक का रे बाबा?पोटं-तिडकींनं लिहिलंय ! आवडलं ! वाईट परिस्थिती आहे. आज काल शनिवार-रविवार साप्ताहांत कुठं जायचं म्हंजे अंगावर काटा येतो. सेल्फिचा रोग झपाट्यानं पसरलाय, आणखी आणखी पसरत चाललाय. धोकादायक जागेतल्या सेल्फि साठी रू. एक लाख डिपॉझिट घेतले पाहिजेत, व रू. एक हजार प्रति-सेल्फि आकार लावला पाहिजे.कळकळीने लिहीलंय तुम्ही.
सहमत,
मनापासून लिहिलंय तुम्ही. पण
उपाय अवघड आहे पण अशक्य नाही...
In reply to मनापासून लिहिलंय तुम्ही. पण by अभिजीत अवलिया
अवस्था भयाण आहे सगळीकडेच.
अवस्था भयाण आहे सगळीकडेच.
सेल्फी आणि दारु ने लै घोटाळा केलाय
लेख लिहिण्यामागची आपली कळकळ पोहचेली.
In reply to सेल्फी आणि दारु ने लै घोटाळा केलाय by विखि
कळकळ जाणवली.
कृपया अशी एखाद दोन ठिकाणं
In reply to कळकळ जाणवली. by सौन्दर्य
ठिकाणावरचे धोके काय आहेत ते लिहा
In reply to कळकळ जाणवली. by सौन्दर्य
"येथे थुंकू नका " अशी पाटी
In reply to ठिकाणावरचे धोके काय आहेत ते लिहा by धर्मराजमुटके
येथे थुंकू नका लिहिले कि तिथेच थुंकणार
In reply to "येथे थुंकू नका " अशी पाटी by विशुमित
मग अजून पुढे जाऊन सेल्फी
In reply to येथे थुंकू नका लिहिले कि तिथेच थुंकणार by नितिन५८८
म्हंजी
In reply to येथे थुंकू नका लिहिले कि तिथेच थुंकणार by नितिन५८८
लेख आवडला. टुरिस्ट मनोवृत्ती
सह्याद्रीतली दरी कशी खोलखोल
अतिशय कळकळीने लिहिलेला लेख,
यामागे सर्वात जास्त कारणीभूत
एस साहेब ..
In reply to यामागे सर्वात जास्त कारणीभूत by एस
" मानव हा सुशिक्षित प्राणी
अत्यंत कळकळीने लिहिलंय
धोके सांगणारे काका कुणालाही
प्रचंड
असे नसणारे, आणि असे लोक
समोरची घटना
आंबोली मध्ये मौज(?) मस्तीमुळे