Skip to main content

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

लेखक कोंबडी प्रेमी यांनी शुक्रवार, 21/07/2017 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..

वाचने 144225
प्रतिक्रिया 445

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला आजपर्यत वाटत होतं की सासुच फक्त बोलते. मुळात काय आहे टाळी एका हाताने वाजत नसते. घरात नवीन आलेल्या मुलीला मेरी सुनो पद्धतीने वागवलं की नंतर तीही सुनावेलच. नाती सांभाळणे ही काय फक्त सुनेची मक्तेदारी नाही य. मान दिला तर मान मिळतो. म्हणून प्रत्येकानेच मर्यादेत रहावं.

आईच घर आणि नवरा ज्यांच्च आवडत क्षेत्र किंबहुना अपेक्षित क्षेत्र असेल त्या लेडी अण्णा हजारे पासुण (ल.लसुण) काय अपेक्षा करू शकतो नाय ? बैल बिचारा काय सहन करत असनार.

आईच घर आणि नवरा ज्यांच्च आवडत क्षेत्र किंबहुना अपेक्षित क्षेत्र असेल त्या लेडी अण्णा हजारे पासुण (ल.लसुण) काय अपेक्षा करू शकतो नाय ? बैल बिचारा काय सहन करत असनार.

प्ररश्या आणी आर्ची च्या सिनेमात सुधा आर्ची वेळ पडेल तेव्हा पुढे होऊन परशाची जागा भरून काढतेय.शुन्यातून सुरूवात करून नायक नायिका पुढे नीटनेटका संसार करताना दाखवलेत. ह्यालाच सहजीवन म्हणतात ना? प्रियकराला मार खाण्यापासून वाचवणारी आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणारी पण त्याच वेळी परिस्थिती सुधारण्यासाठी बरोबरीने राबणारी आरची दिसली नाही वाट्टे

In reply to by पुंबा

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट ...माझे म्हणणे धाग्या पेक्षा पिरा तैं च्या प्रतिसादात जास्त नेमके उतरलेत हे पुन्हा एकदा म्हणते

स्त्रियांवरच अन्याय, पुरुषांवरचा अन्याय हा अपर्णाताईंचा मुद्दा नाहीये, नसावा. (खरे तर त्यांचा मुख्य मुद्दा ' मला परत परत बोलवा' हा आहे, असे वाटले ती क्लिप बघून. पण ते असो.) त्यांचे म्हणणे असे असावे की बायकांची मुख्य आणि अनिवार्य जबाबदारी हि घर सांभाळणे हीच आहे. इथंपर्यंत सग्गळे बरोबरच आहे. पण हि लग्न करणाऱ्या प्रत्येकाची मुख्य आणि अनिवार्य जबादारी आहेच, स्त्री किंवा पुरुष दोघांची. फक्त बायकांची नव्हे. आणि घर सांभाळणे म्हणजे भाकऱ्या करणे, नवरा चिडला कि पाणी पिणे , कायम दुय्यम भूमिका घेणे , हा जो अर्थ आहे , त्याबद्दल कोपरापासून नमस्कार. याच न्यायाने गुलामगिरी ची पद्दत सुद्धा पुनरुज्जीवीत करायला हवी. हे सगळे गुलाम आपल्या हक्काबद्दल जागृत झाले आणि हामेरिका आणि मित्रमंडळी यांच्या कडील मधली शेकडो वर्षांची दैदिप्यमान संस्कृती लयाला गेली. थोर्थोर कुटुंबव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जी फक्त बायकांची, आणि टू बी स्पेसिफिक, सुनांची , आहे, हे मत कुणाला वादग्रस्त आणि चुकिचे वाटत नाही का? बायकांचा कोंडमारा आणि घुसमट करणारी , तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी हि कुटुंबव्यवस्था कशासाठी टिकवावी? ( हेच वाक्य 'बायका' या ठिकाणी ' पुरुष' असे लिहूनही वाचा.) नवरा बायको दोघांनीही सामंजस्याने जबाबदारी वाटून घेऊन संसार करावा, हे बरोबर नाही का? नवऱ्याच्या आई वडिलांचा आदर करावा, जरूर करावा. पण एक माणूस म्हणून त्यांचे वागणे वावगे असेल, तरीही निव्वळ वय झाले म्हणून त्यांच्या वागण्यापुढे मान तुकवावी? ते सुनेला किमान एक माणूस म्हणून आदर देणार नसतील, तर तिने ही तो देण्याची आज्जीबातच गरज नाही. दोघांच्याही आवडीप्रमाणे, कपॅसिटी प्रमाणे आणि इच्छे प्रमाणे कामे वाटून घ्यावीत आणि असल्या सेल्फ प्रोक्लेम्ड बै आणि बुवा ना इग्नोरावे.

In reply to by सामान्य वाचक

आणि घर सांभाळणे म्हणजे भाकऱ्या करणे, नवरा चिडला कि पाणी पिणे , कायम दुय्यम भूमिका घेणे , हा जो अर्थ आहे , त्याबद्दल कोपरापासून नमस्कार.
घर सांभाळणे म्हणजे अन्न न बनवणे, नवरा चिडला कि त्याच्या डोक्यावर पाण्याचा माठ फोडणे आणि कायम आढ्यतापूर्ण भूमिका घेणे असे आहे का?
न्यायाने गुलामगिरी ची पद्दत सुद्धा पुनरुज्जीवीत करायला हवी.
गुलामगिरची पद्धत बदलली आहे, पण गुलामगिरी प्रचंड फोफावली आहे. हो, पण ते असो.
थोर्थोर कुटुंबव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जी फक्त बायकांची, आणि टू बी स्पेसिफिक, सुनांची , आहे, हे मत कुणाला वादग्रस्त आणि चुकिचे वाटत नाही का?
त्या ती बुडवत आहेत अग्रणीपणे, म्हणून त्यांना उद्देशून विधान आहे. त्या फक्तचा तसा अर्थ नाही कि पुरुषांनी बुडवत राहावी आणि बायकांनि वाचवत राहावी.
बायकांचा कोंडमारा आणि घुसमट करणारी , तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी हि कुटुंबव्यवस्था कशासाठी टिकवावी?
वरच्या विधानाप्रमाणे ती सर्वानी टिकवावी. इथे ती नकोच. काही तरी एक स्टँड घ्या. आणि कोणत्या कोंडमारा आणि घुमसट व्हायची म्हणे? माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी? कुठुन उचलल्या ह्या फ्रेजेस? माणूस म्हणून जगायचा अधिकार नाकारणारी व्यवस्था असती एवढ्या ६५ कोटी बायका दिसल्या असत्या का आज? कधि १९७० किंवा १९८० चे सिनेमे पाहिलेत? ते आईचं प्रस्थ (प्रेयसी पेक्षा जास्त) आठवतं? साड्यांचे किती प्रकार आहेत? कांजीवरम, पैठणी, पटोला, कायनू , बायनू.... धोतरांचे किती प्रकार आहेत? लुंग्यांचे किति प्रकार आहेत? म्हणे जगण्याचा अधिकार नाकारणारी ...
नवरा बायको दोघांनीही सामंजस्याने जबाबदारी वाटून घेऊन संसार करावा, हे बरोबर नाही का?
मग ताई काय म्हणत आहेत? सामंजस्य नसावं? जब्बाबदारी फक्त बायकांनी घ्यावी? त्या ज्या केसमधे सामंजस्य नाही तिथे "त्यांचे उपाय" सांगत आहेत. आणि ते किमान ५०% बरोबर आहेत.
पण एक माणूस म्हणून त्यांचे वागणे वावगे असेल, तरीही निव्वळ वय झाले म्हणून त्यांच्या वागण्यापुढे मान तुकवावी? ते सुनेला किमान एक माणूस म्हणून आदर देणार नसतील, तर तिने ही तो देण्याची आज्जीबातच गरज नाही.
पण हे वर्तन योग्य आहे असे आपल्या माय बापाशी भावनिक गुंतवणूक असणार्‍या मूर्ख सेंटिमेंटल नवर्‍याला कसे पटवणार यावरही मार्गदर्शन करा.
दोघांच्याही आवडीप्रमाणे, कपॅसिटी प्रमाणे आणि इच्छे प्रमाणे कामे वाटून घ्यावीत आणि असल्या सेल्फ प्रोक्लेम्ड बै आणि बुवा ना इग्नोरावे.
भावा (ऑर...) ती बाई ट्रबल्ड केसेस बद्दल बोलतेय. जे अलरडी सुखी आहेत त्यांना तिची गरज पडली नाही तर तिला आनंदच आहे. ती एक अत्यंत निस्वार्थ समाजसेविका आहे हे विसरत आहात.

In reply to by arunjoshi123

घर सांभाळणे म्हणजे अन्न न बनवणे, नवरा चिडला कि त्याच्या डोक्यावर पाण्याचा माठ फोडणे आणि कायम आढ्यतापूर्ण भूमिका घेणे असे आहे का? ----------------------------------------------------------------------------------------- असे कुठे दिसले माझ्या प्रतिसादात? एखादी गोष्ट काळी नाही, असे म्हटले याचा अर्थ ती पांढरी आहे असा होतो का? उगीच वडाची साल पिंपळाला लावू नका. गुलामगिरची पद्धत बदलली आहे, पण गुलामगिरी प्रचंड फोफावली आहे. हो, पण ते असो. ----------------------------- इररेलेव्हन्ट आहे. त्या ती बुडवत आहेत अग्रणीपणे, म्हणून त्यांना उद्देशून विधान आहे. त्या फक्तचा तसा अर्थ नाही कि पुरुषांनी बुडवत राहावी आणि बायकांनि वाचवत राहावी. --------------------------------------------------------------------------------------------------------------------- अर्रर्रर्र, परत तेच. स्त्रियांनी काय संस्कृती बुडवली? आणि संस्कृती म्हणजे नक्की कधीची? ५० वर्षे पूर्वीची, का १००? का २०० कारण या सगळ्या काळात वेगवेगळ्या चालीरीती ( ज्याला लोक संस्कृती म्हणतात) अस्तित्वात होत्या. माणूस म्हणून काही इच्छा आकांक्षा असणे आणि त्या धीटपणे मांडणे, याने संस्कृती बुडत असेल, तर बुडो बापडी. साडी, कुंकू, बांगड्या हि संस्कृती का? नक्की संस्कृती म्हणजे काय अभिप्रेत आहे ते आणि स्त्रिया ती कशी अग्रणीपणे बुडवत आहेत तेही, स्पष्ट लिहा. वरच्या विधानाप्रमाणे ती सर्वानी टिकवावी. इथे ती नकोच. काही तरी एक स्टँड घ्या ती टिकवायची असेल तर दोघांनी , सगळ्यांनी टिकवा. फक्त स्त्री ला चचचच टिकवण्याची गरज, समज आणि इच्छा नसावी. आणि कोणत्या कोंडमारा आणि घुमसट व्हायची म्हणे? माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी? कुठुन उचलल्या ह्या फ्रेजेस? माणूस म्हणून जगायचा अधिकार नाकारणारी व्यवस्था असती एवढ्या ६५ कोटी बायका दिसल्या असत्या का आज? ----------------------------------------------------------------------- उपरोधिक बोलायचे तर बोला. फार मागचा काळ नाही आहे जेंव्हा तुमच्या संस्कृतीमध्ये बायकांना शिकायचा, बाहेर पडायचा , नवऱ्याच्या माघारी धडके कपडे घालण्याचा, धडके खाण्याचा , केस ठेवण्याचा हक्क नव्हता. अजूनही परिस्थिती नॉर्मल ला आली आहे का हो? या वरती काउंटर अटॅक म्हणून ४ केसेस फेकू नका बायकांनी अन्याय केल्याच्या. त्या केसेस मान्य आहेतच, पण याचा अर्थ बाकीच्या ९६ केसेस मध्ये पण दम नाही , असे म्हणू नका. कधि १९७० किंवा १९८० चे सिनेमे पाहिलेत? ते आईचं प्रस्थ (प्रेयसी पेक्षा जास्त) आठवतं? साड्यांचे किती प्रकार आहेत? कांजीवरम, पैठणी, पटोला, कायनू , बायनू.... धोतरांचे किती प्रकार आहेत? लुंग्यांचे किति प्रकार आहेत? म्हणे जगण्याचा अधिकार नाकारणारी ... ------------------------------------------------------------ या वर तर हसण्याशिवाय दुसरे काय करणार? नवरा बायको दोघांनीही सामंजस्याने जबाबदारी वाटून घेऊन संसार करावा, हे बरोबर नाही का? मग ताई काय म्हणत आहेत? सामंजस्य नसावं? जब्बाबदारी फक्त बायकांनी घ्यावी? त्या ज्या केसमधे सामंजस्य नाही तिथे "त्यांचे उपाय" सांगत आहेत. आणि ते किमान ५०% बरोबर आहेत. ------------------------------------------------------------------------------------------------------------------ असे दिसले नाही. पुरुषांनी सुद्धा जबाबदारी घ्यावी, असे मला एकही क्लिप मध्ये दिसले नाही. तुम्हाला कुठे सापडले, ते शेअर करा कृपया पण हे वर्तन योग्य आहे असे आपल्या माय बापाशी भावनिक गुंतवणूक असणार्‍या मूर्ख सेंटिमेंटल नवर्‍याला कसे पटवणार यावरही मार्गदर्शन करा. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- एखादी योग्य गोष्ट करायला जमत नाही, किंवा धाडस नाही,किंवा सध्या मार्ग दिसत नाही, याचा अर्थ अयोग्य गोष्ट सुरु ठेवणे हे योग्य आहे असा होतो का ? आणि या बाईनी पण मूर्ख सेंटिमेंटल नवर्‍यासाठी चार मौक्तिके सांगितली तर बरे. माझा तेव्हडा अधिकार असता, तर मी पण भाषणे दिली असती कि, भावा (ऑर...) ती बाई ट्रबल्ड केसेस बद्दल बोलतेय. जे अलरडी सुखी आहेत त्यांना तिची गरज पडली नाही तर तिला आनंदच आहे. ती एक अत्यंत निस्वार्थ समाजसेविका आहे हे विसरत आहात. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- निस्वार्थी असू शकेल हि. पण ट्रबल्ड केसेस सोडवण्याचा हा मार्ग नाही. सगळी निस्वार्थी माणसे पूजनीय नसतात. स्वतःचा स्वार्थ नसतानाही लोकांना नकळतपणे त्रासात टाकणारी माणसे असतात. एका गालावर थोबाडीत दिली, तर दुसरा गाल पुढे करा. म्हणजे क्लॅशेस होणार नाहीत. असे सोल्युशन आहे हे.

b वरील आणि जालावरील रामतीर्थकर म्याडमच्या क्लिप एकूणच त्यातील अतार्किकता, अट्टाहास, अतिरेकीपणा , 'मी म्हणते...' इ. गोष्टींमुळे पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ पाहवेना हो ! आता क्लिप ऐकलीच नाही, तर त्यावर टिप्पणी करण्याचा नैतिक अधिकार नाही, म्हणून पाssस !

मी काय म्हणतो. "टाका केस तिज्यायला". एक पिढीच नव्हे तर पिढ्यानपिढ्या होलसेलमदे बिघडवयाची नुक्सानभरपाई मागावी रग्गड. हुवुंदे धुरळा.

In reply to by अत्रे

बहुतेक जुन्या संगीत नाटकांसारखं पॉर्नमध्येही पुरुषपार्टीने स्त्रीभूमिका कराव्यात अशी त्यांची मागणी असावी.

In reply to by अत्रे

हे डोक्यावरून पाणी गेलंय LOL ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांची सनी लिओनच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंद अश्लीलतेच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे सर्वत्रच्या महिला प्रमुखांनी अनुकरण करावे ! सोलापूर, १८ मे ( वार्ता.) - येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अधिवक्त्या सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी अश्लील चित्रपटांतील अभिनेत्री सनी लिओन हिच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक श्री. साळुंखे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सायंकाळपर्यंत यावर निर्णय घेतो, असे आश्वाासन दिले. या वेळी माजी आमदार श्री. शिवशरण (आण्णा) पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी, हिरालाल तिवारी, बापू ढगे, यशपाल चितापुरे, रमेश आवार, सत्यनारायण कनकी, श्याम निमकंटी यासंह २५ जण उपस्थित होते.

मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले.
हे विधान खालिल गोष्टींची समरी आहे: १ . पारंपारिक भारतीय समाजाबद्दलचे अज्ञान २. आधुनिक पुरोगामी स्त्रीवादी विचारांची हौस ३. जेनेरिक मोघम विधाने चिकित्सा न करता स्वीकारण्याची प्रवॄत्ती. ४. लिंग हा अन्याय करण्याचा आधार असू शकतो ही विचित्र धारणा ५. समाजरिती आणि गुन्हेगारिता आणि विकृती यांच्यातला भेद, त्यांची समाजातली प्रमाणं न पाहण्याची प्रवृत्ती. ६. काय बोलायची फॅशन आहे त्याचा अनंत सोस ७. पुरुषप्रधानता म्हणजे समतेच्या विरोधार्थी शब्द अशी धारणा ८. काम म्हणजे अन्याय नाही हे न कळणे ९. मूलतःच पुरुष जात पिढ्या न पिढ्या विकृत असताना, अचानक कोणत्या गुणसूत्रीय बदलामुळे सुधारली त्याबद्दलचे अज्ञान १०. बायकांनी आत्तापर्यंतच्या पिढ्यांत केलेली जी ऐश आहे तिला एकदम राईट ऑफ करून टाकायचे इतिहासाचे अज्ञान ११. भाषेचे दौर्बल्य वापरुन ९०% वंचना इतर स्त्रीयांनी केली असल्याचे लपवणे, आणि ऑटोमॅटिक डोळ्यासमोर फक्त पुरुष येणे. १२. आपल्या हजारो पिढ्यांच्या आज्ज्या महामूर्ख होत्या असा भ्रम १३. मनुष्यात इतकी बुद्धिमत्ता विकसित झाली नाही कि त्याला आपल्यावर अन्याय होतो आहे हे हजारो वर्षे न कळावे. १४. नक्की कशापासून वंचित ठेवले? लोकांकडे असं काय काय होतं जे त्यांनी लेकिंना आणि बायकांना दिलं नाही? आणि एवढं वंचित ठेऊन जगल्या वाचल्या कशा? अगदी मानवांत ज्या वंशांना वंचित ठेवले गेले ते सगळे नष्ट झाले, मग बायकाच बर्‍या उरल्या? असे संभ्रम सामान्यांत निर्माण करणे. १५. बायकांना वंचित ठेवणे ही पुरुषांची जनुकीय प्रेरणा होती कि अनीश्वरीय द्रव्यवाद होता याची अस्पष्टता. १६. बायकांना वंचित ठेवण्याचे नक्की फायदे पुरुषांना काय काय होतात याची माहीती नसणे. १७. समाज म्हणजे चार बामनाच्या आणि आठ मराठ्याच्या बायका अशी लघुदृष्टी बाकीच्या विधानांबद्दल काय बोलावं! म्हणे तर्काधिष्ठित मांडणि हवी. =========================================== या विधांनाचा टोन माझी प्रेझेंटेशनची स्टाईल आहे. आपल्या व्यक्तित्वाचा आणि संवादातील सहभागाचा आदर आहेच.

In reply to by arunjoshi123

दोनदा वाचली तरी डोक्यावरून गेलं.

In reply to by विशुमित

८. काम म्हणजे अन्याय नाही हे न कळणे
हा मुद्दा घ्या. (सगळेच सांगणं असंभव आहे.) ================= स्त्रीयांना पिढ्यान पिढ्या खूप काम करावे लागत असे (संक्षेप= चूल आणि मूल) आणि हा अन्याय होता असं म्हणलं जातं. पण अन्याय नाही. हे फक्त काम आहे. तुमच्या कडून काम करून घेऊन तुम्हाला पैसेच नाही दिले तर काम देखिल अन्याय ठरतं. पण पुरुषप्रधान एकत्र कुटुंब पद्धतीत ६०-७० पैकी प्रत्येकालाच काम करावे लागे आणि एक कर्ता सोडून कोणालाच पैसे मिळत नसत. म्हणून यात स्त्रीयांचा वेगळा उल्लेख करायची करायची नाही. स्त्रीयांना जशी ही कामे करावीलागतं, तशी पुरुषांना काही कामे करावी लागतच. शेती करणे, पोती उचलणे, बाजारात जाणे, पूजा करणे, इ इ. काम ही वाटून घेतली होती आणि सर्वसाधारणपणे ती सगळ्यांना समान होती. मध्यंतरीच्या काळात लोकांनी शेती सोडून दिली (बर्‍याच) आणि आधुनिक जीवन अवलंबलं (मुलांना शाळेत घालणे, घरात खूप मशिन्स असणे, होम डेलिवरी). म्हणून पुरुषांची कामं संपली आणि बायकांची डबल झाली. ================ पण ह्याचा आणि पिढ्यान पिढ्यांचा काय संबंध? ज्या बाईचा नवरा मे महिन्यात उन्हातान्हात नांगर हानतो, हळदिचे पोतेच्या पोते दिवसभर उचलून पिवळाजर्द पडतो किंवा पावसात चिखलात पेरणी इ इ करतो तिच्या तोंडून "स्त्रीयांवर पिढ्यां पिढ्या अन्याय झाला." हे विधान आणून पहा (काम आणि अन्याय या संदर्भात फक्त).

In reply to by कोंबडी प्रेमी

चर्चा अर्थातच मी प्रचंड भरकटावली आहे. तुमच्या लेखातली जी "पिढ्यान पिढ्यांच्या अन्यायाची" जी गणेशवंदना आहे, केवळ तिच्याबद्दल तो प्रतिसाद आहे. विषयावर नाही.

काय खर नाही राव हे. व्हिडो पाहिला. बाजारात कायपण विकता येतं, विकणारा पाहिजे. इकडं काही कमेंटा वाचल्यावर मंग अपर्णामॅडमना काय म्हणुन टाळ्या पडतात हे कळंत. खर म्हणजे पुरुषाला पायजे तितक्या बायका करायची पर्वानगी द्यावी - एक चंद्रावर जायला, एक भाकरी थापायला अशा. रागवल्यावर पाणी प्यायला बी येक वेगळी असू दे लागली तर. पण मंग असच बाईने म्हणलं तर पुरषाने रागेजू नये म्हंजे झालं. जमणारे का ते बघाव ज्याच-त्यान.

In reply to by यशवंत पाटील

पण मंग असच बाईने म्हणलं तर पुरषाने रागेजू नये म्हंजे झालं. जमणारे का ते बघाव ज्याच-त्यान.
का म्हणे पुरुष रागवतील? असं तुमच्या मनात का आलं?

वेल, तुम्हाला वेळ नाही, रस नाही हा भाग वेगळा, पण याच विषयावर तिची मूल्य (असह्य) वेगळी आहेत म्हणून त्या क्लिप्स पाहूच शकत असणार्‍या बायका पाहून मनोरंजन झालं. डोळ्यासमोर एक क्लिप तरळलि. ======================= आपल्या आजूबाजूचे लोक हे एका विशिष्ट प्रमाणाच्या पुढे तार्कीक, बुद्धिमान, सुशिक्षित, रॅशनल, अनालीटिकल, नैतिक, मॅनर्ड, शिष्ट, इ इ असावे हा काय दुराग्रह आहे? इतकं सगळं असलं तरच आम्ही तुम्हाला एंटरटेन करणार, नाहितर नाही. अरे काय प्रयोगशाळेत बसला आहात का जीवन जगत आहात? तुमची लेकरं पण तुम्हाला एखादं इल्लॉजिकल विधानं म्हणाली तर त्याला कल्प्नाविश्वात रमू न देता लगोलग करेक्ट करता कि काय? चिल्ड्रेन आरे सपोज्ड टू बी अबसर्ड टू सम एक्सटेंट. People are supposed to be illogical, irrational, absurd, idiosyncratic, clumsy, ill-mannered, illiterate, unethical, immoral, negative, etc. We should allow people to have these qualities and should still entertain them till a threshold. हि थ्रेशोल्ड अगदी खूप खाली आणणं चूक असावं. ================ व्यक्तिची तर्कशक्ती, बुद्धिमत्ता इ इ हे त्याला किती एंटरटेन करायचं याचे कसे निकष होऊ शकतात? माझ्या मते हे रेसिझम, जातियवाद यांच्यासारखंचं क्रूर आहे. कारण तर्कबुद्धी इ इ ईश्वरदत्त असतात ( किंवा नैसर्गिक, जे काय सोयिचं), हातात नसतात माणसाच्या. त्यामुळे या निकषांवर लोकांना कमी लेखणं, कमि सन्मान देणं, आदर न करणं, इ इ क्रूर असावं. त्यामुळे विचार न स्वीकारणं इ इ योग्यच आहे, पण नुसतं ऐकायचं म्हटलं तर शिसारी? ================ या प्रतिसादाशी कंसिस्टंट राहाण्यासाठी, तुमच्या अव्हर्जनची पण थोडीशीस्विकती.

एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
सुरुवातीलाच बजावतात, एके ठीकाणी नाही. ========================================= स्त्रीवाद्यांना मंचावर गोंधळ घालू नये, किंवा अगदी सभ्य प्रगल्भ वाद ही घालू नये अशी त्यांची इच्छा दिसते. ज्यांना पटेल त्यांना परंपरावादाचे, धर्माचे महत्त्व सांगायचा त्यांचा हेतू दिसतो. स्त्रीवाद्यांसोबत वादाचे, संवादाचे, विवादाचे अनुभव कटू असावेत, कदाचित अयशस्वीही असावते.

In reply to by arunjoshi123

एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात हे त्यांच्या अनेक क्लिप्स किंवा क्लिप्सचे जे तुकडे फिरत आहेत त्यांच्या पैकी एका तुकड्याच्या सुरुवातीला आहे.

पिराताई,
हे कोण टिकोजीराव लागुन गेलेत लोक जे सांगणार की कुणाच्या भुमिका काय? मी माझं पाहिन की.
माझं मी पाहीन की! यू सेड इट!!! नेमकं हेच हल्लीच्या अनेक जोडप्यांना पाहता येत नाहीये. म्हणूनंच तर ते अपर्णाबाईंकडे जाताहेत. अशा वेळेस बाईंना शून्यातून सुरुवात करावी लागते. एकदम मोठी आकडेमोड करता येत नाही. छोटेछोटे पाढे अगोदर घोटवून घ्यावे लागतात. पाढे म्हणतांना का हा प्रश्न विचारायचा नसतो. ते फक्त पाठ करायचे असतात. ते मन लावून केल्यास हळूहळू एकेक आकडा ओळखीचा होऊ लागतो. मग एकशेएकसष्ट म्हणजे तेवीसची सातपट हे आपोआप उमजू लागतं. क्यालक्युलेट्राची बटनं दाबंत बसायची वेळ येत नाही. अपर्णाबाईंचा सल्ला स्वत:चं स्वत: पाहता येणाऱ्यांसाठी नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पाढे म्हणतांना का हा प्रश्न विचारायचा नसतो.
चूक. पाढे शिकताना 'का' हा प्रश्न विचारायचाच असतो.

In reply to by आदूबाळ

अहो आबा ते पाढे ' म्हणताना ' म्हणतायत .. तुम्ही ' शिकताना ' म्हणताय ... मला तर दोन्ही बरोबर वाटतय ..

काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे.
फार भारी वाक्य वाटतं वाचायला, पण एकदम खोखलं आहे. म्हणजे, उद्या दलितांनी ब्राह्मणांना मारायला सुरुवात केली तर ती सामाजिक प्रतिक्रिया? अशी अतिरेकी प्रतिक्रीया दिसते का आजूबाजूला? स्त्रीयांपेक्षा दलितांवर जास्त तीव्र अन्याय झाले ना? मग ती प्रतिक्रिया तर अजून ठळक दिसायला पाहिजे! पण असं काही होताना दिसत नाही. समाज मंजे काय न्यूटनच्या प्रयोगातली रिजीड वॉल आहे का मॅथेमॅटिकल रिअ‍ॅक्शन द्यायला? रिअ‍ॅक्शन द्यायला हजारो वर्षे का म्हणे लागली? आत्ता काय झालं म्हणे ज्यामुले एकदम रिअ‍ॅक्शन वैगेरे देणं चालू झालं? कशाचा नाईलाज, पापं झाकायला कुठलेही दाखले द्यायचे!

In reply to by arunjoshi123

ह्या व्यमिश्रतेच्या उत्कलन बिंदू वर आहेत त्यामुळे आपण स्वत: किंवा इतर कुणी जरा इस्कटून सांगितल तर पुढे बोलता येईल ...

In reply to by कोंबडी प्रेमी

व्यामिश्रतेच्या उत्कलनबिंदूवरून उतरून सरलतेच्या बाष्पीभवनबिंदूला येऊन सांगतो - ऐतिहासिक सामाजिक अन्यायाची प्रतिक्रिया म्हणून लोक आता वाईट वागत नाहीत. वाईट वागायला आत्ता जिवंत असलेलं कारण असलं पाहिजे. म्हणून त्या प्रकारच्या इतिहासात अन्याय झालेल्या लोकांनी आत्ताची पापं झाकायला इतिहासातल्या अन्यायाचे दाखले देऊ नयेत. उदा. १. आरक्षण आपण "आज" दलितांची स्थिती सुधारावी म्हणून ठेवतो, मागच्या अन्यायाचा बदला म्हणून सवर्णांना नोकर्‍यांवरून काढत नाही. २. मुसलमान राजांनी मागे अन्याय केले म्हणून मुसलमानांना आत्ता बघून घेतले पाहिजे असे आपण म्हणत नाही. "आज" त्यांचं वागणं १९४७ च्या पेक्षा रिस्कि आहे का इतकं पाहतो.

ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
ज्यांनी क्लिप पाहिलि नाही ते मिसगाईड होतील. मुलाला शब्दही बोलल्या नाहीत असं यांनी का लिहिलं देवं जाणो!! पण समजा नाहीतही तरी फरक पडत नाही. मुलगी म्हणते गरोदरपणात माझी किती पगार बुडते आणि अपर्णाताई म्हणतात असल्या मशिनला मी मूल देणार नाही. या उदाहरणात तुम्ही त्या मशिनच्या विरोधात काहीच न बोलता अपर्णाताईच्या विरोधात बोलता हे देखिल एक नवल आहे.

In reply to by arunjoshi123

ज्यांनी क्लिप पाहिलि नाही ते मिसगाईड होतील. --त्यांनी क्लिप आधी बघावी मुलाला शब्दही बोलल्या नाहीत असं यांनी का लिहिलं देवं जाणो!! --त्यांनी क्लिप आधी बघावी पण समजा नाहीतही तरी फरक पडत नाही. मुलगी म्हणते गरोदरपणात माझी किती पगार बुडते आणि अपर्णाताई म्हणतात असल्या मशिनला मी मूल देणार नाही. या उदाहरणात तुम्ही त्या मशिनच्या विरोधात काहीच न बोलता अपर्णाताईच्या विरोधात बोलता हे देखिल एक नवल आहे. --म्हणजे ह्यात मशीन ती मुलगी आहे का जोडपे ? माझ्या मते ते जोडपे! ..पण अपर्णाताई अक्कल शिकवतात ती त्या मुलीला ..मातृत्व हे वरदान आहे दिव्य आहे (किंवा ह्याच धर्तीवर चे काहीतरी)

In reply to by कोंबडी प्रेमी

मुलगी का जोडपे? जोडपे? जोडपे का कुटुंब? कुटुंब! माझ्यामते त्यांनी जोडप्यांच्या आईबापाला, भाऊ बहिणांना देखिल बोलायला पाहिजे. का नाही? कुटुंब कि समाज? समाज! शेवटची मटेरियालिझम तिने समाजातूनच उचलला. अपर्णाताई, इतक्या लोकांना तिला एकटिला कशा बोलू शकतात! नै का? ===================== काये, तिचं उत्पन्न मुल झाल्यानं बुडणार. असं व्हावं का नाही हा निर्णय नवर्‍याने घेतला असता तरी "निर्णय लादणारा नवरा" म्हणून बडवला गेला असताच. आता बाजूला उभा राहिला म्हणून बडवला जावा अशी अपेक्षा दिसतेय. अपर्णाताईंचं स्पष्ट मत दिसतं कि जग खड्ड्यात जाओ, स्त्रीचं आई होणं सगळ्यात महान आहे. सबब मुलीच्या आई बनण्याच्या इच्छेला विरोध केला असता तरच अपर्णाताई त्याला "बोलल्या" असत्या. पण असं काही नाही ना? ===================== बाय द वे, त्याला काय बोलायला हवं होतं? अरे कशाला मरायला दत्तक घेत आहेस "बायकोच्या गरोदरपणाच्या काळातले पैसे वाचवायला?" हेच ना? नै, म्हणजे यानं हे सिद्ध होईल कि आपण बायकांनी करियर सोडून मुल बघायला पाहिजे असं आपलं मत आहे. असं आहे का?

यांची काही मते पटत नसली तरी एंटरटेनमेंट बघून बघू शकतो. दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय पहिली बाजू समजावून सांगता येत नाही.

In reply to by अत्रे

दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय पहिली बाजू समजावून सांगता येत नाही.
प्रतिक्रियांचे इतके बेसिक नियम माहित नसून हेच लोक त्या तथाकथित हजारो बर्षांच्या पिढ्यान पिढ्यांच्या अन्यायाबद्दल बोलतात.

पहिला भयंकर बोअर आहे. दुसरा ओके. तिसरा ते सातवा किमान एकदा तरी ऐकावेत. डायरेक्ट तिसरा चौथा चालू केला तरी फरक पडत नाही. मी अगोदर ४ ते ७ पाहिले, मग १ ते ३. ======================== बायकांनी अवश्य ऐकावेत. दोन स्त्रीयांमधे काय काय नाती असू शकतात आणि त्या प्रेत्यक नात्यात काय वर्तन असायला पाहिजेत हे असलं कंटेंट एकमेव इथे आहे. ऐकायला लई भारी आहे. तुम्ही या सगळ्या पलिकडचे असाल इ इ तर त्यांचे विनोदमूल्य देखिल चूकवू नये. शिवाय त्या "पुरुषांना अक्कल नसते. ते प्रत्येक गोस्ष्ट बायकांना विचारू करतात." इ इ सांगत होत्या तेव्हा मला तो "मातृ मोड" कामाचा वाटला. त्यांनी सांगितलेलं साला ते पर्स्सनल लाइफ मधे फिट्ट बसतं.

साला मिसळपाव म्हणजे ब्लॅकहोल आहे. एकदा प्रतिसाद आत गेला मंजे कायमचा गेला. त्यातला आकार उकार देखिल दुरुस्त करता येत नाही. लोकांना कळायचे वांदे.

या सगळ्यात कामाचा एकच शब्द दिसला 'भाकरी', विषय निघालाच आहे तर कृपया कुणीतरी छान पापुद्रा सुटलेली पातळ भाकरी कशी करायची याचीही कृती द्या. आणि भाकरी बडवण्याची नको, करण्याची कृति हवी हां प्लीज, धन्यवाद. ती भाकरीच एक (बडवायला) जमत नाही, तीही बाकी कुणासाठी जाऊदे, स्वतःला आवडते म्हणून करायचीय,

In reply to by नीलमोहर

मलाही खूप आवडते भाकरी. मी रोजच बदडते भाकरी. तर पापुद्रा सुटलेल्या भाकरीची कृती- पीठ कोमट पाण्यात भिजवावं आणि हाताच्या तळव्यांनी खूप रगडाव म्हणजे छान होते भाकरी आणि पापुद्राही सुटतो तिचा. सॉरी ह कोंबडी धागा वर अवांतर गप्पा सुरु झाल्या.

In reply to by आदूबाळ

नाही हो हॉब ची कल्पना नाय आम्हा गरिबांना, साधी शेगडी आहे आमच्याकडे आणि ओव्हन मध्ये पापड भाजण्यासारख्या कठीण रेसिपी करते मी फक्त.

In reply to by त्रिवेणी

नाय हो - हॉब (म्हणजे शेगडी) नैये. हॉट प्लेट आहे. भाकरी भाजायला ज्वाळा लागतील. त्या कुठून आणायच्या याच्या विचारात आहे.

In reply to by आदूबाळ

आदूबाळ, तुम्ही हे वापरुन बघू शकता. फुलके करण्यासाठीही फार उपयुक्त आहे. सा.वा.नी लिहिलंय तसं पोळीसारखी तव्यावरही भाजू शकता. पातळ करायची गरज नाही. जी बाजू शेगडीवर धरायची असते, ती तव्यावर टाकून सुती कापडाने एकेका भागावर थोडासा दाब देऊन देऊन भाजायची, छान पापुद्रा निघतो भाकरीचा. शिवाय भाकरीचे पीठ दुकानातून आणलेले कधीकधी फार जुने असते, त्याच्या चांगल्या भाकरी होत नाहीत. त्यात थोडेसे गव्हाचे पीठ मिसळायचे आणि भिजवायला गरम पाणी वापरायचे.

In reply to by पिलीयन रायडर

भाकरी कशी बनवावी ही चर्चा मराठी लोकांच्या संकेतस्थळावर व्हावी ही गोष्ट लज्जास्पद आहे. माझ्या कोअर अशा मराठी असण्याच्या ओळखींशि भाकरी हा शब्द अगदी केंद्रात येत असावा. ==================== सबब प्रतिसाद नियमित (९५%+) पोळी खाणार्‍या माझ्यासारख्या लोकांना डिवचण्यासाठी दिलेला आहे.

In reply to by arunjoshi123

तुमचा चष्मा ज्या रंगाचा आहे तसं जग दिसतं, अजो. वरची सगळी चर्चा 'भाकरी बनवणे थापणे 101' या प्रकारचं गाईड नाही. वरच्या सगळ्या माऊल्यांना भाकरी थापता येते याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. चर्चा आहे 'विशिष्ट constraints मध्ये भाकरी कशी थापावी' यावर.

एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ?
उगंच आपलं काय बी. अपर्णाताईंनी सगळेच पर्न्यूटेशन्स काँबिनेशन्स सांगीतले नाहीत. एकुलता एक मुलगा हि केस कवर केली आहे. एकुलती एक मुलगी हि केस कवरच केली नाही. पण मंजे त्या केस मधे त्या काही "टेरिबल" करत आहेत असा उगंच काय म्हणायचं? तुम्ही असं इंप्रेशन देताय की एकुलत्या एक मुलीच्या केसमधे त्या काहीतरी विचित्र सांगताहेत, जे काही खरं नाही. त्या फक्त त्यांची स्वतःचीच केस सांगत असतात असं लार्जली दिसतं.

ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
इथे पण तुम्ही अर्धवट माहीती देऊन वाचकांना मिसलिड करत आहात. मुळात खोटे बोलणे हा उद्देश नाही, पण सासू मला फोन करते, खास माझ्याकरिता सवता फोन करते असे इंप्रेशन सुनांना द्यावे, असे त्या म्हणत आहेत. हे इंप्रेशन तिथेच लांब बोल्लून मुलगा घालवेल म्हणून त्याला ऑफिसातून बोलायला सांगतात. हे खोटं बोलणं हार्मलेस आणि बेनेव्होलेंट आहे. घरातल्या सर्व बायकांचे परस्परसंबंध गोड असावेत याकरिता एक पायरी पुढे जावी असं त्या सांगताहेत.

In reply to by कोंबडी प्रेमी

हे खरे की खोटे यात पडण्यापेक्षा मुदलातली गोष्ट ही आहे की नव्या सुनांना (जावयांबद्दल वेगळ्या धाग्यावर बोलू) पूर्वीच्या सुनांसारखा त्या घरात रुळायला वर्षानुवर्षाचा वेळ उपलब्ध नसतो. नव्या घरात रुळण्यासाठी हाडाची काडं करायला व स्वत:ला सिद्ध करायलाही वेळ नसतो. दिवस बदललेत. त्यांना रुळण्याची जशी गरज आहे तशी सासरच्या लोकांनाही नव्या सदस्यास रुळवून घेण्याची गरज आहे. याला हात पुढे करणे म्हणतात. पूर्वी नव्या सुनेस महत्व देण्याची गरज भासत नव्हती. सत्रा पोरे व त्यांच्या सत्रा बायका असत. आता एक नाही तर दोन मुलगे आणि त्यांच्या तेवढ्याच बायका! माझ्या वहिन्या नव्या असताना मी फक्त त्यांच्यासाठी त्यांच्या सेलफोनवर बोलत असे. त्यावेळी संभाषणात फक्त त्यांना मह्त्व दिले होते. मी असे करणार हे भावांच्या लग्नाआधीच आईवडिलांना सांगितल्याने त्यांना चुकवून काहीतरी करतिये हा प्रकार नव्हता. खात्रीने सांगते की त्या फार्फार खूष झाल्या. माहेरी एकुलत्या मुली असतात, फारतर आणखी एक बहिण पण त्यांनाही मुलाइतकेच महत्व देऊन वाढवलेले असते. सासरी त्यांना कोणी असे विचारले की बरे वाटते. माझ्या भावावरील प्रेम मला व्यक्त करायचे असल्यास त्याच्या बायको मुलांवर मी ते करू शकते. तीच गिफ्ट, आणखी कोणतीही नाही. आपल्या मुलावरील, मुलीवरील प्रेम त्यांच्या लग्नानंतर व्यक्त करताना आधी त्यांच्या जोडीदाराची दखल घेतल्यास चांगल्या अर्थी फरक पडतो. रामतिर्थकरबाई त्याबद्दलच म्हणतायत. सगळे त्यांनी सांगितलेले फॉलो करायला नको. आपण आपल्याला पटेल असे वळवून घेऊ की! त्या बाईंनीही विचार करायला हवा की आज इतके लोक्स आपल्याला ऐकतायत तर प्रत्येक उदाहरण योग्य शब्दात द्यावे म्हणजे गैरसमज होऊ नये.