Skip to main content

ठिपक्यांची मनोली (मुनिया) आणि माळमुनिया

लेखक सानझरी यांनी शनिवार, 22/07/2017 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! मागच्या वर्षी मी मुनिया वर एक लेख टाकला होता. या वर्षी ठिपक्यांच्या मनोली सोबत माळमुनियाही येत आहेत. माळमुनिया (Silverbill) पक्षी मुनियाच्याच जातीचा पण रंगाने वेगळा. याच्या पोटावर मुनियासरखे ठिपके नसतात, तर याच्या शेपटीवर एक मोठा पांढरा ठिपका आसतो. ज्यामुळे व्हिडीओत याला पटकन ओळखायला सोप्पं जाईल. याचे २ फोटोही खाली देत अहे. मुनियांना त्यांच्या आवाजासाठी पाळल्या जायचे. मुनियांचा नाजूक घुंगरां सारखा मंजुळ आवाज बर्‍याच लोकांना ऐकायचा होता म्हणून यावर्षी (महत्प्रयासाने) मुनियाचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ इथे देत आहे. माळमुनियाचा आवाज मुनिया पेक्षा थोडा मोठा असतो. त्यामुळे आमच्याकडचा चिवचिवाटही वाढलाय. A light broke in upon my soul -- It was the carol of a bird, It ceased -- and then it came again, The sweetest song ear ever heard. -Lord Byron माळमुनिया .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7432
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

@ सानझरी तुम्ही खऱ्या भाग्यवान !

मस्त! पक्षी बघायला खूप आवडतात. माझ्या घराच्या अवतीभवती २०-२५ प्रकारचे पक्षी येतात. बरेचसे पक्षी आता ओळखायला शिकलो आहे. ठिपकेवाल्या मुनियांची जोडी एकदा खिडकीत येऊन बसली होती. फोटो काढायच्या आतच उडून गेली. माळमुनिया हा पक्षी अजून पाहण्यात नाही. कदाचित पाहिला असेल पण ओळखलेला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

फोटो काढायच्या आतच उडून गेली.
पक्षी दिसले कि मनभरून बघून घ्या, फोटोच्या मागे नका लागू. कॅमे-याच्या नादात तो क्षण निसटून जातो असा बरेचदा अनुभव आलाय.. माळमुनियाचे फोटोही टाकलेत पण ते दिसत नाहीयेत. सासंला व्यनि केलाय. ते देतील टाकून तेव्हा नक्की बघा..

+ १

त्या पक्षांसाठी तुम्ही घरी अशी छान सोय केली आहे त्याबद्दल तुझं आणि तुझ्या परिवाराचं कौतुक.

खुप सुरेख. त्या पक्षांसाठी तुम्ही घरी अशी छान सोय केली आहे त्याबद्दल तुझं आणि तुझ्या परिवाराचं कौतुक. +१

खरच खूप छान आलेत फोटोस आणि मनाला भावली हि इवलीशी मुनिया फॅमिली ..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पाहूणे नै, घरचेच आहेत ते आता. त्यांच्या अनेक पिढ्या बर्‍याच वर्षांपासून येत आहेत आमच्याकडे.. :)

लेख, व्हिडीओ आणि फोटो अतिशय सुंदर!! अजून एक आवर्जून उल्लेखनीय आहे ते म्हणजे नीटनेटकी बाल्कनी आणि पक्षांसाठी केलेली सोय. खूप आवडलं.

सान!! आज पाहतेय हे. किती मस्त खाऊ पिऊ ची सोय केलीत ग. आजच आमच्याकडे एका चिमणा चिमणीने घर बांधायला सुरवात केलीय. मी सुद्धा enjoy करेन आता चिवचिवाट!"