Skip to main content

सध्या काय वाचत आहात?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 10/06/2017 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आम्ही छंदी-फंदी पण दुर्दैवाने वाचनाचे व्यसन पण असेच.घरात तशी २०००च्या आसपास पुस्तके आहेत, पण आवडलेले पुस्तक दरवेळी विकत घेणे परवडत नाही. म्हणून २ वाचनालये लावली आहेत.सगळीच पुस्तके विकत घेणे एकाच वाचनालयाला पण परवडत नसतील, असे मला वाटते. तर महत्वाचा मुद्दा असा की. आज एक मस्त पुस्तक मिळाले. पुस्तकाचे नांव : आलेख (विश्वसंस्कृतीचा) लेखिका : आशा दामले प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन , बोरीवली, फोन नंबर ०२२-२८६४५२१२, ०२२-२८६३५२२१२ ह्या प्रूथ्वीवर अगणित पुस्तके असतील, आणि मिपावर पण असंख्य वाचनव्यसनी मिपाकर असतीलच. वाचनव्यसनी मिपाकरांमध्ये एकमेकांना आवडलेल्या पुस्त्कांच्या गाभ्या बद्दल आदान-प्रदान व्हावी ह्या हेतूने हा धागा काढला आहे.

वाचने 19743
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

मराठीतील एक ख्यातनाम लेखक लक्ष्मण लोंढे यांचे २०१५ मध्ये झाले. गेल्या वर्षी त्यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा झाला व त्यानिमित्ताने ‘ओंजळभर’ हा स्मृतीग्रंथ प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाशी माझा काही कारणाने संबंध आल्याने माझ्या या आवडत्या लेखकाच्या काही पुस्तकांची आठवण चाळवली गेली. त्यापैकी ‘लक्ष्मणझुला’ या पुस्तकाबद्दल काही लिहावेसे वाटते. हे पुस्तक हा ३० लेखांचा संग्रह आहे. मूळ लेख पूर्वी ‘अंतर्नाद’ मासिकात सदर रूपाने प्रसिद्ध झाले होते. हे पुस्तक म्हणजे ललितगद्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. त्यातील लेख हे निसर्ग, विज्ञान आणि सौंदर्य या त्रिमूर्ती भोवती गुंफलेले आहेत. ‘प्रकृती कडून संस्कृतीकडे’ या लेखात हे स्पष्ट केले आहे की उपाशी पोटाने संस्कृतीच्या गप्पा मारता येत नाहीत पण, निदान पोट भरल्यावर तरी माणसाने संस्कृतीकडे वळले पाहिजे आणि तिचा मूलाधार आहे ती प्रेमभावना. माणसाने पर्यावरणाची जी नासधूस चालवली आहे त्यावरील मार्मिक टिपणी एका लेखात केली आहे. निसर्गाने माणसाला हवा, सूर्यप्रकाश, पाणी, जमीन यासारख्या गोष्टी अगदी फुकट दिल्या आहेत पण आपण त्यांची हवी तेवढी कदर केलेली नाही याची जाणीव त्यातून होते. स्थापत्यशास्त्रातल्या प्रगतीचा माणसाला केवढा गर्व असतो. पण जेव्हा आपण सफेद मुंग्यांनी तयार केलेल्या ५-६ मीटर्सच्या उंचीची वारूळे बघतो तेव्हा या नैसर्गिक चमत्कारापुढे आपल्याला नतमस्तक व्हावे वाटते याचे भान आपल्याला एका लेखातून येते. ‘कांचनमृगाच्या शोधात’ हा आपल्याला आत्मपरिक्षण करायला लावणारा लेख. ‘प्रगती’ कशाला म्हणायचे या मुद्द्याभोवती गुंफलेला हा लेख. प्रगतीचा आपण लावलेला ‘सतत वाढ’ हा निकष लेखकाच्या मते चुकीचा आहे. वाढ आणि विकास यातील फरक अगदी चांगल्या प्रकारे समजावून लेखक सुचवतो की प्रगतीची एकमेव फूटपट्टी पैसा हीच नसली पाहिजे. पुस्तकाच्या मध्यात असलेला ‘हृदया हृद्य येक जाले’ हा लेख तर खरोखरच कळसाध्याय म्हणावा लागेल. आता अतिप्रगत संगणक युगात माणूस माणसाशी ‘जोडला’ गेलेला आहे खरे पण तो केवळ मेंदूने. त्याबरोबर माणसे एकमेकांशी हृदयाने जोडली गेली आहेत का हा लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातो, नव्हे, सतावतो. ‘एक टक्क्याचा खेळ’ हाही एक विचारप्रवर्तक लेख. आपला समाज हा असंख्य गटातटात विभागला गेला आहे. अशा विविध गटांची टक्केवारी काढून मग अल्पसंख्य गटांना कमी लेखण्याचे वा हिणवण्याचे प्रकार सतत चालू असतात. या संदर्भात एका मूलभूत शास्त्रीय सत्याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. ते म्हणजे मानव आणि चिपांझी माकड या दोघांच्या ‘डीएनए’ मध्ये फक्त १ टक्क्याचा फरक आहे. म्हणजे, अखिल मानवी संस्कृतीच फक्त १ टक्क्याची संस्कृती आहे. तेव्हा अजून माणसामाणसांत भेद वाढवणारी टक्केवारी आपण गाडून टाकायला हवी आहे की नाही? .. तर असे एकाहून एक सरस लेख असणारे हे पुस्तक. प्रत्येक लेख सरासरी ४ पानांचा. हेही एक आकर्षण. निसर्ग –विज्ञान- तत्त्वज्ञान यावरचे सोप्या भाषेतील सुरेख चिंतन. हे पुस्तक माझ्या संग्रही गेली १५ वर्षे आहे. साधारणपणे १०-१२ वर्षांनंतर आपल्या संग्रहातली काही पुस्तके ‘शिळी’ वाटू लागतात. पण हे पुस्तक त्याला नक्कीच अपवाद आहे. दर ३ महिन्यातून मी ते एकदा बाहेर काढतो, त्यातील एखाद्या लेखाचा मनापासून आस्वाद घेतो. आयुष्यभर जवळ बाळगावे असे हे पुस्तक आहे.

ओम शांती ओम चित्रपटात राम कपूर ला तीन तीन फिल्मफेअर नामांकन मिळालेली असतात. तिन्हीत तेचते बाहें फैलाने असतं, तीचती शिफॉन साडीतली हिरवीण केस उडवत पळत येते, तेचते आ आ आ आ आ संगीत.... मराठी आंजादेखील तसंच आहे. तीचती पापड लोणची करणारी, भाकर्या बडवणारी आई आजी पणजी चुलतसासु मावशी... किंवा तेचते रम्य बालपण... जर कोणाला यातली दुसरी गोष्ट ऐकूनऐकून बोर झालं असेल तर Let's pretend this never happened वाचा. टोटल लोटपोट आहे.

अॅमी,
मराठी आंजादेखील तसंच आहे. तीचती पापड लोणची करणारी, भाकर्या बडवणारी आई आजी पणजी चुलतसासु मावशी... किंवा तेचते रम्य बालपण...
या विधानाशी सहमत आहे. मराठी आंजा महिला क्रिकेटप्रमाणे आहे. एकतर खेळ पुरुषी क्रिकेटच्या मानाने मंद असल्याने कमी प्रेक्षणीय, शिवाय खेळाडूही विशेष प्रेक्षणीय नाहीत. महिला क्रिकेटचं काही खरं नाही बुवा! आ.न., -गा.पै. वि.सू. : स्त्री ही अनंतकाळाची माता आहे हे पटवण्यासाठी महिला क्रिकेटाचं उदाहरण दिलं आहे.

. हे वाचले.. २००४ ते २००८ इतका काळ संजय बारू यांनी मनमोहन सिंग यांचे मिडीया अ‍ॅडव्हायजर म्हणून काम पाहिले. एकंदर मनमोहन सरकारची कामगिरी आणि दोन दोन सत्ताकेंद्रे बिचारे मनमोहन कसे सांभाळत होते याचे यथार्थ वर्णन आहे. अपेक्षित असले तरी पुस्तक वाचताना धक्क्यावर धक्के बसत होते.

James Hadley Chase ची सगळी 90 पुस्तकं मिळाली.आता एकेक करून वाचणार ! सध्या A wrinkle in time वाचतेय. === साहित्य/संपादक हे पुस्तकां विषयीचे सगळे धागे नीट लावून 'वाचू आनंदे' सारखा वेगळा विभाग करता येईल का? त्यात साध्या काय वाचताय, कोणती पुस्तक खरेदी केली, कुठे प्रदर्शन चालुय, कुठे काही स्कीम चालुय, पुस्तकंच्या समीक्षा सगळे धागे टाकता येतील.

विरंगी मी विमुक्त मी लेखिका: अंजली जोशी प्रकाशनः शब्द पब्लिकेशन अंजली जोशी यांची ही कादंबरी, मुख्यतः स्त्रियांच्या कामेच्छा आणि त्या पुर्ण करण्यासाठी काय करावे ह्यावर बेटी डॉडसन केलेल्या प्रयत्नांचा मागोवा आहे. स्त्रियांनी तर ही कादंबरी नक्किच वाचायला हवी...सविस्तर लेख पुन्हा केव्हातरी..

Tana French चं In the Woods वाचायला चालू केलं आहे नुकतंच. रोचक वाटतय सध्यातरी.