बाल्यावस्था( वय १० ते १३)------
धर्म .....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.जगात म्हणे १०० पेक्षा जास्त धर्म आहेत. मला लहाणपणी सांगण्यात आले कि तू जन्माने हिंदू आहेस.हिंदू म्हणजे गणेशोत्सव काळात मोदक खाणारे असा माझा समज होता.पुढे दाढी वाढवणारे आणि टोपी घालणारे आपल्यापेक्षा वेगळे आहेत हे लक्षात यायला लागले.एकदा शाळेतून घरी येताना दोन तीन नग्न लोक काही गर्दीबरोबर चालत होते .ह्या लोकांचाही वेगळा धर्म आहे ही माहीती मित्राने पुरवली.
इयत्ता नववी---
इतिहासाच्या पुस्तकात आधुनिक मानवाचा जन्म माकडापासुन उत्क्रांत होऊन झाल्याचे कळले.होमो सेपियन्स हे आधुनिक मानव.आफ्रीकेत उत्क्रांत होऊन जगभर पसरले.
इयत्ता बारावी(विज्ञान शाखा)---
जग कुठल्या धर्म ग्रंथाचे आधारे चालत नाही.वेद,कुराण,बायबल हे कुठल्याही प्रकारे सत्य नाहीत हे वाचनावरुन कळाले.
वेदांमध्ये विज्ञान आहे,कुराणचा आदेश शेवटचा मानावा ,बायबलनुसार जग देवाने आठ दिवसात बनवले वगैरे गोष्टी लिहीणारे व सांगणारे बालबुद्धीचे आहेत हे लक्षात यायला लागले.
वाचन वाढत होते ,धर्म ही अफुची गोळी आहे हे कार्ल मार्क्सचे विधान मनोमन पटायला लागले .
२००१ --- ९/११ हल्ला--
ओसामा बिन लादेन या मुस्लिम दहशतवाद्याने अमेरीकेत हल्ला केला.हजारो लोक निष्प्राण.मुस्लिम दहशतवादाशी पहीली ओळख.कारण काय ,तर कुराणमध्ये काफीर संपवा असा संदेश आहे.हजारो वर्षापुर्वी लिहलेली बाडं, मग ते वेद असोत वा कुराण बायबल आजहि प्रचंड स्फोटक असल्याची जाणीव.
२००२गुजरात दंगल----
हिंदूनी भरलेली एक ट्रेन गोध्राजवळ मुस्लिम मॉबने जाळली.कारण काय तर ट्रेनमधले ते अयोध्येत राममंदिर बनवायला गेलेले कारसेवक होते.याची रिॲक्शन उमटली...हजारो मुसलमान घराबाहेर काढून मारण्यात आले.जाळण्यात आले.मुस्लिमबहुल भागात हिंदूंना मारण्यात आले.
आमचा केमिस्ट्रीचा पेपर पुढे ढकलण्यात आला व अभ्यासाला वेळ मिळाला.
हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला.आपण निधर्मी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव.
कॉलेज २००४--
फर्राट चर्चा घडवून आणायला लागलो.कॉलेज्च्या कट्ट्यावर नास्तिक निधर्मी अशी ओळख तयार झाली.चर्चांमध्ये तावतावाने भांडणाऱ्या मित्रांवरुन धर्म हा कॅन्सर कीती खोलवर रुजला आहे व माणसाची मती तो कशी हायजॅक करतो याचा अनुभव येत गेला.जग धर्ममुक्त झाले पाहीजे हा विचार बळावला.
२०१७ ,वय ३१----
Richard Dawkins foundation for reason and science शी संलग्न.धर्म या गोष्टीकड परतायची शक्यता शून्य.
टाईमलाईन समाप्त.
जग धर्ममुक्त झाले पाहीजे हा माझा विचार कसा बळावत गेला याची ही टाईमलाईन.
आपल्याला काय वाटते??
१. धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
२.मुस्लिम दहशतवादाने जगभर मांडलेला हैदोस ,उगवता हिंदू दहशतवाद यावर जग धर्ममुक्त होणे हाच उपाय आहे काय?
३.तुमचा पाल्य निधर्मी विचारांचा व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?
प्रस्तुत लेख संस्थळाच्या नियमात बसत नसल्यास डिलिट करावा.
वाचने
13649
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
धर्म ही संकल्पना कालसुसंगत
जग धर्ममुक्त झाले पाहीजे
धर्म हटवा म्हणता?
>>धर्म हटवा म्हणता, तर मग शिवाजीमहाराज कशासाठी लढले म्हणायचे?
In reply to धर्म हटवा म्हणता? by गामा पैलवान
हो! शिवाजी महाराज हिंदू
In reply to >>धर्म हटवा म्हणता, तर मग शिवाजीमहाराज कशासाठी लढले म्हणायचे? by चिर्कुट
धर्मा विषयी अज्ञान व अज्ञानामुळे धर्मच नको.
लेख आवडला. फक्त निधर्मी होणे
१. सार्वजनीक जीवनात धर्माचे
In reply to लेख आवडला. फक्त निधर्मी होणे by पुंबा
सौरा, प्रतिसाद आवडला। धर्माचे
In reply to १. सार्वजनीक जीवनात धर्माचे by पुंबा
धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
रुमाल टाकून ठेवतो
टफि साहेब
टफीसाहेब, मी तुमचा भाऊ झफी..
सहमत
In reply to टफीसाहेब, मी तुमचा भाऊ झफी.. by सिद्धेश्वर विल…
हिंदू हे कधीच दहशतवादी नव्हते आणि नाहीत
"नुसतं एखादं भगवं वस्त्र
In reply to हिंदू हे कधीच दहशतवादी नव्हते आणि नाहीत by ट्रेड मार्क
काही मारामाऱ्या केल्या
In reply to "नुसतं एखादं भगवं वस्त्र by शब्दबम्बाळ
_/\_
In reply to "नुसतं एखादं भगवं वस्त्र by शब्दबम्बाळ
काय बोलणार
In reply to "नुसतं एखादं भगवं वस्त्र by शब्दबम्बाळ
चांगला प्रतिसाद.
In reply to काय बोलणार by ट्रेड मार्क
नक्कीच असतो
In reply to चांगला प्रतिसाद. by प्रतापराव
दलितांवरील अत्याचाराच्या घटना
In reply to नक्कीच असतो by ट्रेड मार्क
दहशतवाद हा समाजाच्या सर्वच
In reply to दलितांवरील अत्याचाराच्या घटना by प्रतापराव
वर्णद्वेष किंवा वंशद्वेषामुळे
In reply to दहशतवाद हा समाजाच्या सर्वच by सुबोध खरे
माझ्या प्रतिसादात "मुस्लिम
In reply to काय बोलणार by ट्रेड मार्क
तुम्हाला मुद्दा समजलाच नाही
In reply to माझ्या प्रतिसादात "मुस्लिम by शब्दबम्बाळ
हे वाक्य तुमचं आहे, तुमच्या मते "दहशत"वाद म्हणजे फक्त बॉम्ब फेकणंच का हो? म्हणजे एखाद्या समूहाने जाणीवपूर्वक समोरच्याचा मुडदा पडला तर तो फक्त "सहनशक्तीचा कडेलोट" झाला म्हणून? आणि अशी प्रकरण कुठल्या वृत्तपत्राने छापली तर ते वृत्तपत्र वाचायचं सोडणे हा त्यावरचा उपाय का?मी या धाग्यात वर एक प्रतिसाद दिला आहे तो काही प्रमाणात याला लागू होतो. मी मुडदा पाडण्याचे समर्थन करत नसून वेगळा मुद्दा मांडतोय. संपूर्ण प्रतिसाद नीट वाचलात तर कदाचित तुमच्या लक्षात येईल. स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ सत्ता हातात असलेल्या लोकांना सत्तेपासून एवढं दूर राहणं अवघड वाटत नसेल का? अगदी सत्तेत असतानासुद्धा त्यांनी संबंध नसताना "हिंदू दहशतवाद" ही संज्ञा जन्माला घातलीच. तर आता सत्ता परत मिळवण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग वापरणं या लोकांना सहज शक्य आहे. कोणत्याही जातीधर्माशी संबंधित नसणारे समाजकंटक हाताशी धरून पैसे देऊन हिंदू लोकांसारखी वेशभूषा आणि घोषणा देत मारामारी किंवा "मुडदे" पाडा हे पण सांगणं ही पण शक्यता आहेच. वर आरडाओरडा करायला वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या हाताशी आहेतच.अशी प्रकरण कुठल्या वृत्तपत्राने छापली तर ते वृत्तपत्र वाचायचं सोडणे हा त्यावरचा उपाय का?तुम्हीच बघा बातम्या कश्या वनसायडेड येत असतात. जुनैदचे घरचे सांगत होते बीफचा काही संबंध नाही तर भांडण सीटवरून झालं. तरी पण २ दिवस बीफवरून हत्या झाल्याच्या बातम्या येतच होत्या. बंगालमध्ये एका १२ वीतल्या मुलाने चेपूवर केवळ एक पोस्ट टाकली म्हणून पीसफुल लोकांनी दंगल सुरु केली, घरं जाळली. पण याला जुनैद किंवा तत्सम दोन गटात होणाऱ्या मारामाऱ्यांपेक्षा कमी कव्हरेज मिळालं. अगदी जेव्हा अश्याच घटनेचा हिंदू मनुष्य बळी असतो तेव्हा बातमी होत नाही. उदा. अखलाकची हत्या वि प्रशांत पुजारीची हत्या. वृत्तपत्र वाचायचं सोडू नका पण नक्की काय झालं याची शक्य तेवढ्या स्रोतातून माहिती घेऊन मत बनवणे योग्य.जेव्हा मुस्लिम दहशतवादी कुठेतरी हल्ला करतात तेव्हा सामान्य आयुष्य जगणारा मुस्लिम त्यापासून आपल्याला वेगळं राहता यावं म्हणून "हल्ला करणार्यांनी फक्त कुराण किंवा घोषणा दिल्या म्हणून ते खरे मुस्लिम होत नाहीत" असे म्हणून गप्प राहतो.शिया मुस्लिम्स सुन्नी व इतर मुस्लिमांना खरे मुस्लिम मानत नाही आणि वाईस व्हर्सा. त्यात हे वाक्य सध्या ऐकू यायला लागलंय. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे सामान्य मुस्लिमसुद्धा धर्माच्या बाबतीत तेवढाच कट्टर आहे. बाकी तुमचा दहशत दाखवणे आणि दहशतवाद यात गोंधळ झालेला दिसतोय.बर समजा चुकून हि लोक हाताबाहेर गेली आणि उद्या कत्तली होऊ लागल्या तर हे बालंट हिंदू धर्माच्या माथी मारायचं का? कारण केवळ काही डोकं फिरलेले आणि स्वतःला कट्टर हिंदू मानणारे लोक अमानुष गोष्टी करू लागले?याच विचाराने आपण वर्षानुवर्षे गप्प रहात आलोय आणि अजूनही गप्पच राहावे का? मुस्लिम धर्माच्या नावाखाली हिंदूंच्या कत्तली करत रहातात आणि हिंदू मात्र पॉलिटिकली करेक्ट रहाण्यासाठी गप्प रहातात. एखादा दहशतवादी हल्ला ज्यात अचानक एक किंवा अनेक लोक मृत्युमुखी पडतात याची आणि जुनैदसारख्या प्रकरणात, जिथे सीटवरून भांडण चालू होऊन त्याचे पर्यवसान एका मृत्यूमध्ये झाले याची तुलना होऊ शकते का? गुजराथमध्ये २००२ च्या आधी वर्षातून एकदा तरी दंगल उसळत असे. २००२ मध्ये एकदाच धडा शिकवल्यावर पुढची १२-१३ वर्ष एक तरी दंगल झाली का? झाली असेल तर उदाहरणाने दाखवून द्या. मुस्लिम देशांत इतर धर्मियांना मिळणाऱ्या वागणुकीला जरी बाजूला ठेवले तरी भारतासारख्या सेक्युलर देशात जर मुस्लिमांना वाटत असेल की इतर सर्व धर्मियांनी मुस्लिम धर्माप्रमाणे वागावे किंवा शरियाचा मान ठेवावा. तर मग मुस्लिमांनी सुद्धा इतर धर्मियांच्या भावनांचा आदर ठेवणे आवश्यक आहे. कॅनडासारख्या देशात तिथे स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांनी केवळ त्यांना चालत नाही म्हणून सर्व शाळांमध्ये डुकराचे मास विकू नये अशी मागणी केली. तिथे अजून जरा मुस्लिमांची संख्या वाढू दे, मग बघा काय होतंय.बाकी अभ्यास वाढवा सारखे सल्ले कृपया स्वतःला पण कधीतरी देत जा, कदाचित फायदा होईल!सल्ले आपले आपल्याला देत नसतात. सल्ले नेहमी दुसऱ्याला द्यायची गोष्ट आहे. तसा माझा अभ्यास चालूच असतो. पण तुमच्या प्रतिसादात तुम्ही माझं एक वाक्य उचलून प्रतिवाद करताय आणि तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी एकही उदाहरण देत नाही. म्हणून म्हणलं... भावना दुखावल्या असतील तर स्वारी बर्का.@ट्रेड मार्क: तुमची मते ऐकून वाईट वाटले...
In reply to माझ्या प्रतिसादात "मुस्लिम by शब्दबम्बाळ
परत गडबड केलीत
In reply to @ट्रेड मार्क: तुमची मते ऐकून वाईट वाटले... by शब्दबम्बाळ
इतर धर्म
निधर्मी होण्याचं किंवा
निधर्मी होण्याचं किंवा
In reply to निधर्मी होण्याचं किंवा by सुबोध खरे
लेख आवडला. धर्ममुक्त जग ही
१. धर्म कालबाह्य झाले आहेत
नेहमिप्रमाणे अत्यंत
हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ
In reply to नेहमिप्रमाणे अत्यंत by सचु कुळकर्णी
जग धर्ममुक्त व्हावे म्हणजे ....
हा हा ........
In reply to जग धर्ममुक्त व्हावे म्हणजे .... by गामा पैलवान
धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
धर्म कालबाह्य झाले आहेत काय?नाही. बऱ्याच लोकांची नैतिक दृष्टी त्यांच्या-त्यांच्या धर्मातून येते.टाईमलाईन समाप्त झालेली नाहीये
तुमच्या जन्मदाखल्यावर होमो
In reply to टाईमलाईन समाप्त झालेली नाहीये by धर्मराजमुटके
तुमच्या जन्मदाखल्यावर होमो सेपियन्स असा उल्लेख् आहे का?
In reply to तुमच्या जन्मदाखल्यावर होमो by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ऑस्ट्रेलोपिथेकस, झिंझानथ्रोपस
In reply to तुमच्या जन्मदाखल्यावर होमो by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अज्ञान हेच कारण!!!
उगवता हिंदु दहशतवाद म्हणजे
उगवता हिंदु दहशतवाद म्हणजे
श्री सुशीलकुमार शिंदे यांनी
In reply to उगवता हिंदु दहशतवाद म्हणजे by प्रतापराव
सुशीलकुमार शिंदे नाहीत बहुदा
In reply to श्री सुशीलकुमार शिंदे यांनी by सुबोध खरे
त्यावेळेपर्यंत अत्यंत सज्जन