टाईमलाईन---- हिंदू ते निधर्मी होण्याची!
जग धर्ममुक्त झाले पाहीजेहे एक दिवास्वप्न ठरेल. मध्यंतरी झाकिर नाईक चे काही विडिओज पाहिले होते त्यात त्याने एका मूर्ख स्वघोषित नास्तिकाला जवळजवळ मुस्लिम बनवले होते. त्याचे तर्कट तसे अजबच होते. म्हणजे मुस्लिमांची जी काही प्रार्थना आहे त्यानुसार जगात दुसरा कुठला देवच असू शकत नाही एक त्या सर्वशक्तिमान अल्लाशिवाय. त्यानुसार नास्तिक हे अर्धे मुसल्मान अगोदरच आहेत कारण त्यांच्यामते देव नाहीच आहे मग त्याचा आग्रह असा होता कि पूर्ण मुसलमान तरी बना ना. हिंदूनी निधर्मी होणे ह्याचा साईड इफेक्ट फार धोकादायक होऊ शकतो. हिंदू म्हणुन नास्तिक राहणे हा निधर्मी राहण्याला चांगला पर्याय आहे. इथे तुम्ही जिवंत राहण्याची अपेक्षा ठेवु शकता. माझा एक शेजारी क्ट्टर मुस्लिम आहे व त्याला माझ्या मुलीच्याच वयाची मुलगी आहे आणि शैशव पातळीवरच्या संगोपनात धर्माची किती इन्वॉल्वमेंट आहे हे रोज पाहतो आहे. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
In reply to धर्म हटवा म्हणता? by गामा पैलवान
In reply to >>धर्म हटवा म्हणता, तर मग शिवाजीमहाराज कशासाठी लढले म्हणायचे? by चिर्कुट
१. धर्म कालबाह्य झाले आहेत काय?होय. जगाला कोणत्याही रिलिजनची गरज नाही.(धर्माने दिलेले तत्वज्ञान आणि सांस्कृतीक वारश्याची मात्र आहे.)
२.मुस्लिम दहशतवादाने जगभर मांडलेला हैदोस ,उगवता हिंदू दहशतवाद यावर जग धर्ममुक्त होणे हाच उपाय आहे काय?माणसाच्या इहवादी गरजा धर्मापासून वेगळ्या आहेत याची जाणिव व्हायला हवी. धर्माचा प्रभाव कमी होणे हा उपाय आहे. तिसर्या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ अजून आली नाही.
In reply to लेख आवडला. फक्त निधर्मी होणे by पुंबा
In reply to १. सार्वजनीक जीवनात धर्माचे by पुंबा
In reply to टफीसाहेब, मी तुमचा भाऊ झफी.. by सिद्धेश्वर विल…
In reply to हिंदू हे कधीच दहशतवादी नव्हते आणि नाहीत by ट्रेड मार्क
"नुसतं एखादं भगवं वस्त्र घातलं किंवा हिंदू धर्माशी संबंधित घोषणा देत काही मारामाऱ्या केल्या की ते हिंदू दहशतवादी होतात का?"नुसतं कुराण हातात घेतलं किंवा अल्ला हू अकबर च्या घोषणा देत काही जणांचे मुडदे पाडले की ते मुस्लिम दहशतवादी होतात का? दोन वाक्यात काही साम्य आढळतंय का हो?? असो चालूदे चर्चा...
In reply to "नुसतं एखादं भगवं वस्त्र by शब्दबम्बाळ
In reply to "नुसतं एखादं भगवं वस्त्र by शब्दबम्बाळ
In reply to "नुसतं एखादं भगवं वस्त्र by शब्दबम्बाळ
In reply to काय बोलणार by ट्रेड मार्क
In reply to चांगला प्रतिसाद. by प्रतापराव
In reply to नक्कीच असतो by ट्रेड मार्क
In reply to दलितांवरील अत्याचाराच्या घटना by प्रतापराव
In reply to दहशतवाद हा समाजाच्या सर्वच by सुबोध खरे
In reply to काय बोलणार by ट्रेड मार्क
यात तुमचा निर्देश गायींवरून होणाऱ्या मारहाण व खुनाकडे असेल तर तुम्ही फक्त ठराविक वृत्तपत्रे/ वाहिन्या बघता असं वाटतं. सध्या अश्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसतेय याचं कारण आता सहनशक्तीचा कडेलोट होतोयहे वाक्य तुमचं आहे, तुमच्या मते "दहशत"वाद म्हणजे फक्त बॉम्ब फेकणंच का हो? म्हणजे एखाद्या समूहाने जाणीवपूर्वक समोरच्याचा मुडदा पडला तर तो फक्त "सहनशक्तीचा कडेलोट" झाला म्हणून? आणि अशी प्रकरण कुठल्या वृत्तपत्राने छापली तर ते वृत्तपत्र वाचायचं सोडणे हा त्यावरचा उपाय का? तुमच्या त्या वाक्यावर इथल्या "सगळं काही माहित असणाऱ्या" आयडींना काहीच आपत्ती नाही यातच सगळं काही आलं! जेव्हा मुस्लिम दहशतवादी कुठेतरी हल्ला करतात तेव्हा सामान्य आयुष्य जगणारा मुस्लिम त्यापासून आपल्याला वेगळं राहता यावं म्हणून "हल्ला करणार्यांनी फक्त कुराण किंवा घोषणा दिल्या म्हणून ते खरे मुस्लिम होत नाहीत" असे म्हणून गप्प राहतो. आता वरच्या प्रतिसादात तुमचा पवित्राही तोच दिसतोय, गोरक्षक "मारामाऱ्या"(दहशत नाही हा) करत आहेत पण म्हणून ते काय हिंदू दहशतवादी झाले का लगेच? बर समजा चुकून हि लोक हाताबाहेर गेली आणि उद्या कत्तली होऊ लागल्या तर हे बालंट हिंदू धर्माच्या माथी मारायचं का? कारण केवळ काही डोकं फिरलेले आणि स्वतःला कट्टर हिंदू मानणारे लोक अमानुष गोष्टी करू लागले? कट्टरता कुठल्याही धर्माची वाईटच! बाकी अभ्यास वाढवा सारखे सल्ले कृपया स्वतःला पण कधीतरी देत जा, कदाचित फायदा होईल!
In reply to माझ्या प्रतिसादात "मुस्लिम by शब्दबम्बाळ
हे वाक्य तुमचं आहे, तुमच्या मते "दहशत"वाद म्हणजे फक्त बॉम्ब फेकणंच का हो? म्हणजे एखाद्या समूहाने जाणीवपूर्वक समोरच्याचा मुडदा पडला तर तो फक्त "सहनशक्तीचा कडेलोट" झाला म्हणून? आणि अशी प्रकरण कुठल्या वृत्तपत्राने छापली तर ते वृत्तपत्र वाचायचं सोडणे हा त्यावरचा उपाय का?
मी या धाग्यात वर एक प्रतिसाद दिला आहे तो काही प्रमाणात याला लागू होतो. मी मुडदा पाडण्याचे समर्थन करत नसून वेगळा मुद्दा मांडतोय.
संपूर्ण प्रतिसाद नीट वाचलात तर कदाचित तुमच्या लक्षात येईल. स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ सत्ता हातात असलेल्या लोकांना सत्तेपासून एवढं दूर राहणं अवघड वाटत नसेल का? अगदी सत्तेत असतानासुद्धा त्यांनी संबंध नसताना "हिंदू दहशतवाद" ही संज्ञा जन्माला घातलीच. तर आता सत्ता परत मिळवण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग वापरणं या लोकांना सहज शक्य आहे. कोणत्याही जातीधर्माशी संबंधित नसणारे समाजकंटक हाताशी धरून पैसे देऊन हिंदू लोकांसारखी वेशभूषा आणि घोषणा देत मारामारी किंवा "मुडदे" पाडा हे पण सांगणं ही पण शक्यता आहेच. वर आरडाओरडा करायला वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या हाताशी आहेतच.
अशी प्रकरण कुठल्या वृत्तपत्राने छापली तर ते वृत्तपत्र वाचायचं सोडणे हा त्यावरचा उपाय का?
तुम्हीच बघा बातम्या कश्या वनसायडेड येत असतात. जुनैदचे घरचे सांगत होते बीफचा काही संबंध नाही तर भांडण सीटवरून झालं. तरी पण २ दिवस बीफवरून हत्या झाल्याच्या बातम्या येतच होत्या. बंगालमध्ये एका १२ वीतल्या मुलाने चेपूवर केवळ एक पोस्ट टाकली म्हणून पीसफुल लोकांनी दंगल सुरु केली, घरं जाळली. पण याला जुनैद किंवा तत्सम दोन गटात होणाऱ्या मारामाऱ्यांपेक्षा कमी कव्हरेज मिळालं. अगदी जेव्हा अश्याच घटनेचा हिंदू मनुष्य बळी असतो तेव्हा बातमी होत नाही. उदा. अखलाकची हत्या वि प्रशांत पुजारीची हत्या. वृत्तपत्र वाचायचं सोडू नका पण नक्की काय झालं याची शक्य तेवढ्या स्रोतातून माहिती घेऊन मत बनवणे योग्य.
जेव्हा मुस्लिम दहशतवादी कुठेतरी हल्ला करतात तेव्हा सामान्य आयुष्य जगणारा मुस्लिम त्यापासून आपल्याला वेगळं राहता यावं म्हणून "हल्ला करणार्यांनी फक्त कुराण किंवा घोषणा दिल्या म्हणून ते खरे मुस्लिम होत नाहीत" असे म्हणून गप्प राहतो.
शिया मुस्लिम्स सुन्नी व इतर मुस्लिमांना खरे मुस्लिम मानत नाही आणि वाईस व्हर्सा. त्यात हे वाक्य सध्या ऐकू यायला लागलंय. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे सामान्य मुस्लिमसुद्धा धर्माच्या बाबतीत तेवढाच कट्टर आहे. बाकी तुमचा दहशत दाखवणे आणि दहशतवाद यात गोंधळ झालेला दिसतोय.
बर समजा चुकून हि लोक हाताबाहेर गेली आणि उद्या कत्तली होऊ लागल्या तर हे बालंट हिंदू धर्माच्या माथी मारायचं का? कारण केवळ काही डोकं फिरलेले आणि स्वतःला कट्टर हिंदू मानणारे लोक अमानुष गोष्टी करू लागले?
याच विचाराने आपण वर्षानुवर्षे गप्प रहात आलोय आणि अजूनही गप्पच राहावे का? मुस्लिम धर्माच्या नावाखाली हिंदूंच्या कत्तली करत रहातात आणि हिंदू मात्र पॉलिटिकली करेक्ट रहाण्यासाठी गप्प रहातात. एखादा दहशतवादी हल्ला ज्यात अचानक एक किंवा अनेक लोक मृत्युमुखी पडतात याची आणि जुनैदसारख्या प्रकरणात, जिथे सीटवरून भांडण चालू होऊन त्याचे पर्यवसान एका मृत्यूमध्ये झाले याची तुलना होऊ शकते का? गुजराथमध्ये २००२ च्या आधी वर्षातून एकदा तरी दंगल उसळत असे. २००२ मध्ये एकदाच धडा शिकवल्यावर पुढची १२-१३ वर्ष एक तरी दंगल झाली का? झाली असेल तर उदाहरणाने दाखवून द्या.
मुस्लिम देशांत इतर धर्मियांना मिळणाऱ्या वागणुकीला जरी बाजूला ठेवले तरी भारतासारख्या सेक्युलर देशात जर मुस्लिमांना वाटत असेल की इतर सर्व धर्मियांनी मुस्लिम धर्माप्रमाणे वागावे किंवा शरियाचा मान ठेवावा. तर मग मुस्लिमांनी सुद्धा इतर धर्मियांच्या भावनांचा आदर ठेवणे आवश्यक आहे. कॅनडासारख्या देशात तिथे स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांनी केवळ त्यांना चालत नाही म्हणून सर्व शाळांमध्ये डुकराचे मास विकू नये अशी मागणी केली. तिथे अजून जरा मुस्लिमांची संख्या वाढू दे, मग बघा काय होतंय.
बाकी अभ्यास वाढवा सारखे सल्ले कृपया स्वतःला पण कधीतरी देत जा, कदाचित फायदा होईल!
सल्ले आपले आपल्याला देत नसतात. सल्ले नेहमी दुसऱ्याला द्यायची गोष्ट आहे. तसा माझा अभ्यास चालूच असतो. पण तुमच्या प्रतिसादात तुम्ही माझं एक वाक्य उचलून प्रतिवाद करताय आणि तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी एकही उदाहरण देत नाही. म्हणून म्हणलं... भावना दुखावल्या असतील तर स्वारी बर्का.
In reply to माझ्या प्रतिसादात "मुस्लिम by शब्दबम्बाळ
कोणत्याही जातीधर्माशी संबंधित नसणारे समाजकंटक हाताशी धरून पैसे देऊन हिंदू लोकांसारखी वेशभूषा आणि घोषणा देत मारामारी किंवा "मुडदे" पाडा हे पण सांगणं ही पण शक्यता आहेच. वर आरडाओरडा करायला वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या हाताशी आहेतच.हि तुमची अशी वाक्ये माझ्या पहिल्या प्रतिसादाशी सुसंगतच आहेत! आणि हेच मला दाखवायचं होत बाकी काही नाही... आता हे तुमचे वाक्य इसिस किंवा अजून कुठल्या गटाला लावा मुस्लिमांच्या नजरेतून... ते पण हेच म्हणू लागतील कि, ते हल्ला करणारे अमेरिका रशिया यांच्याशी लागेबांधे असलेले आणि धर्माशी संबंधित नसलेले लोक आहेत त्यांना पैसे पुरवला जातो आणि मुस्लिमांसारखे दाखवले जाते... मीडियापण अमेरिकेच्याच हातात आहे! याला समस्येकडे दुर्लक्ष्य करणे असे म्हणता येईल जेणे करून आपल्या धर्माला बोल नको लागायला.
२००२ मध्ये एकदाच धडा शिकवल्यावर पुढची १२-१३ वर्ष एक तरी दंगल झाली का?तुमचा दंगल करणार्यांना पाठिंबा आहे का? दंगली मध्ये जे लोक मेले ते मारायलाच हवे होते हे तुमचे म्हणणे आहे का? याला तुम्ही धडा शिकवणे म्हणता? आपल्या देशात कायदा सुव्यवस्था आहे गुन्हेगारांना कडक शिक्षा करायला.. तुमचा त्याच्यावर भरवसा नाही का? खेद वाटला असे वाक्य ऐकून... असेही अमेरिकेत राहून कोणी कसा धडा शिकवायचा ते सांगायला काय जातंय नाही का? संपादक मंडळ यांच्या प्रतिसादाकडे लक्ष देईल का? शिकल्या सवरलेल्याना धर्माच्या नावावर इतक्या सहजपणे हिंसेच्या समर्थनार्थ वळवणे शक्य असेल तर अशिक्षित/गरजू लोकांना आपल्या बाजूने करायला कितीसा वेळ लागत असेल? आणि हो माझ्या भावनांची इतकी काळजी नसावी कारण... जाऊदे
In reply to @ट्रेड मार्क: तुमची मते ऐकून वाईट वाटले... by शब्दबम्बाळ
In reply to निधर्मी होण्याचं किंवा by सुबोध खरे
निधर्मी होण्याचं किंवा जाहीरपणे सांगण्याचं स्वातंत्र्य( लाड म्हणा हवं तर) अख्ख्या आशिया खंडात फक्त भारतात किंवा इस्रायल मध्ये आहे. मध्ये बाकी सर्व देशांत दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा दिली जाते.काहीही! किती आशियायी देशांचा अभ्यास आहे तुमचा?
In reply to नेहमिप्रमाणे अत्यंत by सचु कुळकर्णी
हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला. आपण निधर्मी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव.हे वाक्य असे हवे होते का? हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला. आपण स्वार्थी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव.
In reply to जग धर्ममुक्त व्हावे म्हणजे .... by गामा पैलवान
धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
नाही. बऱ्याच लोकांची नैतिक दृष्टी त्यांच्या-त्यांच्या धर्मातून येते. In reply to टाईमलाईन समाप्त झालेली नाहीये by धर्मराजमुटके
In reply to तुमच्या जन्मदाखल्यावर होमो by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to तुमच्या जन्मदाखल्यावर होमो by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to उगवता हिंदु दहशतवाद म्हणजे by प्रतापराव
In reply to श्री सुशीलकुमार शिंदे यांनी by सुबोध खरे
धर्म ही संकल्पना कालसुसंगत