आमचे मोठे चिरंजीव कागदोपत्री इंजिनियर झाले (कागदोपत्री बरेच काही होता येते पण .....कागदोपत्री बरेच काही होणे, ह ह्या धाग्याचा विषय नाही....) म्हणून आमच्या बाबांकडे गेलो.शनिवार असल्याने बाबांच्या मठात बरीच गर्दी होती,त्यात चिलिमवाले बाबा, कटोरीवाले बाबा, खापरवाले बाबा आणि जपमाळ वाले बाबा पण होतेच.
आज बाबांच्या मठांत इतकी गर्दी पाहून मी जरा हबकलोच.पण मी पाय पळता पाय काढण्यापूर्वीच बाबांची नजर आमच्याकडे वळाली आणि बाबा म्हणाले.....
बाबा : या मुवि.काय काम काढलेत? तसे तुम्ही आजकाल कामाशिवाय आमच्याकडे पण येत नाही.आज मूद्दाम का आलात?
आम्ही : तसे काही विशेष नाही.आपल्या कृपेने मुलगा इंजिनियर झाला. म्हणून आलो होतो.
बाबा : आमची कसली कृपा? त्याने अभ्यास केला, तो पास झाला.
आम्ही : तुम्ही असे म्हणता.पण आम्हाला अनुभव तर वेगळाच येतो. कुणी जर आम्हाला योग्य त्या ठिकाणी मदत केली तर दोघांवर खापर फुटते.
बाबा : आले आमच्या लक्षांत. मुळात ही लढाई आस्तिक आणि नास्तिक ह्यांच्या विरोधातली आहे.
आम्ही : म्हणजे?
बाबा : तुमच्या भाषेत पुणेकर आणि अपुणेकर.....
आम्ही : नीट समजावून सांगाल तर उत्तम...
बाबा : ह्या जगांत ज्या अनेक जाती आहेत त्यात, पुणेकर आणि अपुणेकर, ह्या पण येतात.आमच्या भाषेत त्यांना आस्तिक आणि नास्तिक असे म्हणतात.
प्रत्येक व्यक्ती जन्माला येतांना न्युट्रल असते पण पुढे ती ती व्यक्ती तिच्या तिच्या जाणीवे नुसार अस्तिक किंवा नास्तिक होते.
एखाद्या व्यक्तीची स्तुती, तिची वर्तमान योग्यता न पाहता करणे, म्हणजे आस्तिकता.
आणि कालाप्रमाणे मत बदलणारा आणि योग्य काय? अयोग्य काय? हे मत स्वतःचे स्वतः ठरवणारा म्हणजे नास्तिक.
आस्तिकांना, काळाचे, स्थानाचे भान नसते. मग त्यात पुणे असो किंवा मुंबई.(पुर्वी मुंबई ही फक्त तटबंदी पुरतीच होती मग पुढे त्यात कुर्ला, बांदरा आले आणि सध्या कागदोपत्री मुलुंड-दहिसर-बोरीवली पर्यंत.....पण जिथपर्यंत लोकल जाते तिथपर्यंत मुंबै, हे सर्वसामान्यांचे मत, त्यामुळे सध्या मुंबई = डहाणू, कर्जत, कसारा आणि पनवेल.)
आस्तिकांच्या मते मुंबै = बोरीवली,मुलुंड आणि पुणे = काही पेठा.
पण आज खरोखरच तसे आहे का?
चिलिमवाले बाबा : सॉरी हां. मी मध्येच बोलतोय. असो, सगळे आयुष्य मी कपड्याविना काढले. वेळेवर २ घास कधीतरी मिळायचे, पण मी देवाघरी जाताच, आमच्या नावाने दक्षिणा मागायला सुरुवात.आमचे तरी ठीक आहे पण ह्या कटोरीवाल्या आणि जपमाळ वाल्या बाबांच्या बाबतीत काही विचारू नका.
कटोरीवाले बाबा : खरी गोष्ट....
जपमाळवाले बाबा ; अहो, आयुष्यभर मी "एकांतवासात जपमाळ ओढा" म्हणूम सांगीतले तर, आमची लोकं, मोठमोठ्याने वेळ-काळ-स्थान न बघता. जोरजोरात नामे घेत असतात.
खापरवाले बाबा : अहो, आम्ही पण भजने केली.पण त्यातला मतितार्थ कोणाच्याच लक्षांत आला नाही.
बाबा : कारण एकच, लोकांना आस्तिकता आवडते.शिवाय आस्तिकांचा कंपू फार लवकर तयार होतो. कुणी २-४ जणांनी दगड उचलले की, भले-भले धोंडे उचलतातच. ही मानवी स्वाभाविकता आहे.
आम्ही ; मग आमच्या सारख्या नास्तिकांनी काय करावे?
बाबा : नंबर एक, नास्तिक हा एकटाच असतो.त्याला कंपू नसतो पण, कुठलाही नास्तिक दुसर्या नास्तिकाला दोष देत नाही.आपल्या मिपावरच बरेच नास्तिक आहेत,मग त्यात चौरा काका, नाखू, वल्ली, अतृप्त आत्मा, डॉ.म्हात्रे, अजया, सगा, सूड, अभिजित अवलिया, सुखी, कलंत्री, कपिल मुनी, औरंगजेब, पिरा ताई, पैजार बुवा, त्रिवेणी आणि मितान हे त्या पैकीच.हे जोपर्यंत विरोध करत नाहीत तोपर्यंत आस्तिकांनी कितीही गरळ ओकली तरी बिंधास्त रहा.
आणि.
नम्बर २ : आस्तिक फक्त बोंबलतात...पण पुरावे दिले किंवा मागीतले की, मग शेपूट घालतात. (बादवे, "शेपूट घालणे' हा वाक्प्रचार आहे.) मग ती तिकीटे असोत किंवा लिंका. ते तिकीटे किंवा लिंका मागतील पण स्वतः कष्ट करून शोधणार नाहीत. साधे पुणे स्टेशन ते कोथरूड बस स्टँड इथपर्यंत जायची तिकिटे द्यायची असतील तरी डोंबोली ते कोथरूड बस प्रवास परत करावा अशी अव्यावहारीक अपेक्षा पण धरतील.म्हण्जे १५ रुपये आणि साधारण २ तासाच्या (बसची वाट बघण्याच्या वेळेसकट) प्रवासासाठी २०० रु. आणि २ दिवस खर्च डोंबोलीकरांनी करावा. आस्तिकांच्या अपेक्षा ह्या अशा असतात.
तस्मात तुम्ही ज्यांना पुणेकर म्हणता, त्यांना आम्ही आस्तिक असे म्हणतो.आस्तिक फक्त एकांगीच विचार करतात.त्यांना फाट्यावर मारणेच उत्तम......
--------------
ह्यापुढे आस्तिकांच्या प्रतिसादांना उत्तरे न देण्यात आम्ही आमचा वेळ जास्त खर्च करणार नाही.
वाचने
13444
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिल्या धारेची वाट्ट आज,
(No subject)
In reply to पहिल्या धारेची वाट्ट आज, by स्पा
काय काका
नवपुणेकर
मत
गेल्या काही महिन्यात
In reply to मत by गॅरी ट्रुमन
गेल्या काही महिन्यात मुविकाकांचे लेखन पूर्वीपेक्षा बरेच जास्त खालावले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे.सहमत. खास धागा टाकून मात्र कुणाचेही नांव न घेता स्कोअर सेटल करण्याची कसरत करण्याची नक्की का गरज भासली ते कळाले नाही. (इतर कोणत्या धाग्यावर धुळवड झाली असल्यास कोणीतरी प्लीज लिंक व्यनी केली तरी चालेल - नक्की काय मुद्दे होते / मुद्दे होते का - हे तरी कळेल.) असो, आपण एखाद्या विषयावर जाहीरपणे विशिष्ट भूमीका घेतली की त्या भूमीकेचे विरोधक असू शकतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे - हा एक सल्ला. (वैयक्तिक मत आहे - चुकीचे असल्यास जरूर प्रतिसादावे)तुमच्या मताशी सहमत! सेटलिंग
In reply to गेल्या काही महिन्यात by मोदक
सहमत ग्यारी जी तुमच्याशी.
In reply to मत by गॅरी ट्रुमन
ग्यारी ट्रुमन म्हणजे गिरीष
हो
In reply to ग्यारी ट्रुमन म्हणजे गिरीष by भीमराव
आपल्या मिपावरच बरेच नास्तिक
आपल्या मिपावरच बरेच नास्तिक आहेत,मग त्यात चौरा काका, नाखू, वल्ली, अतृप्त आत्मा, डॉ.म्हात्रे,...नाही, नाही. आम्ही नास्तिक नाही, आम्ही अज्ञेयवादी :) ;)तुम्ही किमान लिस्ट मध्येतरी
In reply to आपल्या मिपावरच बरेच नास्तिक by डॉ सुहास म्हात्रे
राहू द्या हो म्हात्रेकाका,
In reply to आपल्या मिपावरच बरेच नास्तिक by डॉ सुहास म्हात्रे
:D :D
In reply to राहू द्या हो म्हात्रेकाका, by अभ्या..
हे नक्की काय आहे? संदर्भ
गेल्या काही महिन्यात
<<<गेल्या काही महिन्यात
In reply to गेल्या काही महिन्यात by रुपी
तुम्हाला नक्की काय म्हणायचे
In reply to <<<गेल्या काही महिन्यात by विशुमित
काही महिन्यापासून काकांनी
In reply to तुम्हाला नक्की काय म्हणायचे by मोदक
तुमच्या अफाट लॉजिकमुळे
In reply to काही महिन्यापासून काकांनी by विशुमित
आदर तसाच ब्रकरार ठेवा.
In reply to तुमच्या अफाट लॉजिकमुळे by मोदक
आता आपणच एकंदरीत मिपावरचा
मुवि,
मुवि काका
तुमचा झेंडा कुठला?
In reply to मुवि काका by कपिलमुनी
फाट्यावर मारा ओ सगळ्यांना !
In reply to मुवि काका by कपिलमुनी
फाट्यावर मारा ओ सगळ्यांना ! कुठलेसे झेंडे फिरवत हागणदारी पसरवण्यापेक्षा बरेच चांगले लिहिता , बाकी विशिष्ट कंपूच्या रडारवर आलात म्हणून शुभेच्छा !!लोकं झेंडे फिरवत असतील तर तुम्ही (पांढर्या) टोप्या घालता ते सोयीस्कर विसरलात का..? इथे मिपाकरांच्या लेखनाला सरसकट हागणदारी म्हणताना तुम्ही काय मोगर्याच्या बागा फुलवल्या ते बोला. मूर्खशिरोमणी नेत्याचे अनुयायी तसेच असतात हे सिद्ध करण्याचा चंग बांधला असेल तर चालूद्या. तुमचे केजरीवाल सध्या कुठे तोंड लपवून बसले आहेत..?आमचे मोदीजी मनरेगा वर भारी
मुनी आणि जेम्स वांड
मी त्याच भाषेत उत्तर दिले
विनंती दोघांना ( आणि सर्वानाच
इतकं करुन नक्की झालंय काय हे
मला वाटतं आशु जोग ह्यांच्या
In reply to इतकं करुन नक्की झालंय काय हे by पिलीयन रायडर
पुणेकर अन नॉन पुणेकर
In reply to मला वाटतं आशु जोग ह्यांच्या by जेम्स वांड
यू, सर, ह्याव हिट द हेड ऑन अ
In reply to पुणेकर अन नॉन पुणेकर by अभ्या..
+११ बेशर्त सहमत.
In reply to यू, सर, ह्याव हिट द हेड ऑन अ by आदूबाळ
खतरा!
In reply to यू, सर, ह्याव हिट द हेड ऑन अ by आदूबाळ
+१
In reply to पुणेकर अन नॉन पुणेकर by अभ्या..
प्रतिसादाला आपले +111
In reply to पुणेकर अन नॉन पुणेकर by अभ्या..
अभ्यामोरे शी लै वेळा सहमत
In reply to पुणेकर अन नॉन पुणेकर by अभ्या..
मुविकाका,
अवांतरः पुण्यात तसे काहीही