Skip to main content

कोल्हापूरकर बिनडोकच !

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 24/06/2017 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
दर दोन चार वर्षांनी कुणीतरी करवीरकर उपटतो आणि त्या अंबाबाईवरून वादंग निर्माण करतो. ती अंबाबाई आहे, सोनिया गांधी नाही ! हे आम कोल्हापूरकराना कळत नाही का ? वादंग निर्माण करणारी टाळकी दोन किंवा अडीच आणि श्रद्धाळू करवीरकर किती ?? काय राजकारण करायचे ते करा, एकमेकाचे कपडे काढा पण श्रद्धास्थानांच्या ठिकाणचे पावित्र्य चव्हाट्यावर आणाल तर कुणीही असला तरी जोड्याने मारू - एव्हढी साधी भूमिका घेण्याची हिम्मत आम कोल्हापूरकरांकडे नाही आणि म्हणे मटण खाणारे ! कसले बोडक्याचे झणझणीत !!

वाचने 9999
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

बरोबर बोललात, यांच्याकडून सर्व अधिकार कडून, सरकार किंवा इतर शहरातील लोकांच्याकडे द्यायला पाहिजे. नक्की काय प्रकार आहे हे, कोणी मिपा कोल्हापुरातील असतील तर कृपया सांगा.

अंबाबाई हे निमित्त आहे. मराठा मोर्चा, छत्रपती/पेशवे ही काडी, अफजलखान/जोशी/कुलकर्णी ही काडी, अंबाबाईच्या देवळात या वादाचे निमित्त करून बहुजन समाजातील पुजारी नेमावेत ही मागणी असे अनेक बिंदू जोडले तर खरे चित्र स्पष्ट होईल.

In reply to by श्रीगुरुजी

पुजार्याला मारणार्या जिजाउ ब्रिगेड वाल्या होत्या. खर खोट अम्बाबाईच जाणे

लोकहो, कोल्हापुराचे महालक्ष्मी मंदिर खाजगी आहे की सार्वजनिक? माझ्या मते ते खाजगी असून त्याची मालकी कोल्हापुराच्या छत्रपतींकडे आहे. कोणी जाणकार कृपया प्रकाश टाकेल काय? आ.न., -गा.पै.

अंबाबाई हे निमित्त आहे. मराठा मोर्चा, छत्रपती/पेशवे ही काडी, अफजलखान/जोशी/कुलकर्णी ही काडी, अंबाबाईच्या देवळात या वादाचे निमित्त करून बहुजन समाजातील पुजारी नेमावेत ही मागणी असे अनेक बिंदू जोडले तर खरे चित्र स्पष्ट होईल Strongly Agree..!!

नाण्या ची एकच बाजू बघण्यात क़ाय अर्थ ? पुजारी ने केलेल्या चुकी बद्दल सर्वकश चर्चा व्हावी , एकूण हा विषय कुणी मनावर घेतला नाही तेच बेस झाले

नाण्या ची एकच बाजू बघण्यात क़ाय अर्थ ? पुजारी ने केलेल्या चुकी बद्दल सर्वकश चर्चा व्हावी , एकूण हा विषय कुणी मनावर घेतला नाही तेच बेस झाले

In reply to by श्रीगुरुजी

गुजरात,राजस्थान मध्ये देवीला मराठी पद्धतीची साडी नेसवतील का? मला खरच माहीत नाही की नेसवतात का कधी. नेसवत असतील तर चांगलेच आहे, पण मराठी पद्धतीची साडी जर इतर राज्यात नेसवली जात नसेल तर आपणच का एवढा मनाचा मोठेपणा दाखवावा?

श्रीमान गुरुजी जी , गेले कित्तेक वर्ष गणपती बसविताना भक्त मंडळी कसले ही प्रयोग करतात , येत्या गणेशोत्सव मध्ये बाहुबली च्या रुपात सुधा गणेशा ला पहावे लागेल. उद्या इतर पुजारी लोकांनी श्रीकृष्ण ,श्री राम , गजानन महाराज ,अक्कलकोट स्वामी ,साईबाबा, या देवतानां पैण्ट शर्ट घातली तर चालेल का ? अगोदर च हिंदू भक्त नां कुठल्या देवा ची पूजा करू ? हा प्रश्न पडलेला असतो त्यात या घागरा चे प्रकरण .

In reply to by सोमनाथ खांदवे

घागरा हा पारंपरिक भारतीय वेष आहे. लोकांना क्रिकेट खेळणारा, अण्णा हजारेंचा पोषाख केलेला गणपती चालतो, गणेशोत्सवात वाटेल ते प्रकार केलेले चालतात, देवी समोर जिवंत कोंबडी-बकरी मारलेली चालते . . . पण घागरा हा पारंपरिक भारतीय वेष चालत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

+ हा प्रकार तर अर्वाचीन भारतीय स्त्रियांचा प्राचीन वस्त्र यात देखील येतो ना?

आणि हो चार टाळके काही करतात म्हणून तुम्ही पूर्ण कोल्हापूर (खरं तर करवीरकर) यांना बिनडोक कसे म्हणू शकता? याच कोल्हापूर ने देशाला, राष्ट्राला एक एक हिरे दिले आहेत, अगदी व्यवसाय असो की सैनिक असोत! कोल्हापूरकर नेहमी पुढेच दिसले आहेत व असणारच! मराठा बटालियन फक्त सर्च करा, मग बोलू!

चार टाळके काही करतात म्हणून तुम्ही पूर्ण कोल्हापूर (खरं तर करवीरकर) यांना बिनडोक कसे म्हणू शकता? राजेशी सहमत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa