लेखककेडीयांनी बुधवार, 14/06/2017 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य
१/२ किलो मटण, धुवून, कोरडे करून
३ मोठे कांदे बारीक चिरून
१ लसूणाचा गड्डा, सोलून, बारीक चिरून
१ इंच आलं, बारीक चिरून
१ बडी इलायची
५ ते ६ हिरवे वेलदोडे
३ ते ४ लवंग
१ चमचा जिरे
२ चमचे धने
१ चमचा बडीशेप
१ चमचा मेथ्या
१ तुकडा दालचिनी
३ तमालपत्र
१ चमचा लाल तिखट
२ चमचे हळद
१ चमचा कसुरी मेथी
५ ते ६ चमचे आमचूर पावडर (हे आवडीनुसार कमी जास्त)
२ ते ३ मोठे चमचे तेल
मीठ चवीनुसार
अर्ध्या लिंबाचा रस
कृती
मटणाला लिंबाचा रस, १ चमचा हळद आणि मीठ लावून ते किमान २ तास मुरत ठेवावे. रात्रभर ठेवलं तर उत्तम. (अर्थातच फ्रिज मध्ये). सगळे गरम मसाले कोरडे भाजून, मग गार करून त्याची जाडसर भरड काढावी.
एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कुकर मध्ये तेल तापवून, त्यात बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. कांदा थोडा लालसर झाला कि त्यात मुरलेलं मटण घालून ते परतून घ्या. हे सगळं आपल्याला एकदम मंद आचेवर करायचे आहे. (मटण कोवळे असेल तर लवकर शिजेल, साधारण १ तासात आपल्याला मटण मऊसूद वाफेवर शिजवून घायचे आहे. हे सुरु असतांनाच इतर मसाले व जिन्नस टाकत राहायचे आहेत).
झाकण ठेवून साधारण २० ते २५ मिनिटे मटण शिजू द्या. अधून मधून परतून घेत राहा. [मटणाला पाणी सुटेल, त्यामुळे पाणी घालायची गरज लागणार नाही]. आता भांड्यात बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालून परतून घ्या. अजून १० ते १५ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. मटणाला सुटलेले पाणी आटत आले, कि त्यात लाल तिखट आणि उरलेली हळद घालून पुन्हा ढवळून घ्या. झाकण ठेऊन अजून १० मिनिटे शिजू द्या. झाकण उघडून, एकदा परतून त्यात आता मसाल्याची भरड घाला. थोडे परतून मग आमचूर पावडर घालून मटण पुन्हा परतून अजून १० मिनिटे झाकण ठेवून शिजवा.
साधारण २ कप पाणी गरम करून, आपल्याला रस्सा हवा त्या प्रमाणात गरम पाणी घालून, अजून ५ मिनिटे वाफ काढून घ्या. चवीनुसार मीठ घालून गरम गरम भात बरोबर हे खट्टा मटन खायला घ्या! वाढण्यापूर्वी, कसुरी मेथी हाथाने चुरून वरून भुरभुरावी.
[साध्या तेला ऐवजी सरसू/मोहोरी चे तेल असेल तर ते वापरा, अजून लज्जत वाढेल. आमचूर मुळे एक वेगळीच चव आणि रंग येतो. पाणी न घालता देखील सुक्क म्हणून छान लागेल. कांदा, लसूण आणि आले हे मिक्सर मधून न काढता सुरीनेच बारीक चिरून घ्या, म्हणजे ते जळणार नाही. मटण शिजले नाही, किंवा इतका वेळ वाट पाहायची नसेल तर, कुकर मध्ये ३ ते ५ शिट्ट्या मारून शिजवू शकता (पाणी घालून).]
लिखाण , प्रेझेन्टेशन , फोटोंची रचना व कोलाज ... हे पण टिपून ठेवलंय .
जे जे चांगले ते शिकावं माणसाने .. या तत्वावर ...
बाकी लाजवाब ... कधी खाऊ घालता ?
(जाता जाता - आपण दोन केडी नी मिळून एक फिरतं हॉटेल काढूया का ? )
असे फोटो आणि प्रेझेन्टेशन असेल तर दोन गोष्टी नक्की होतील
- बरीच व्हेज जनता नाँन-व्हेज होईल आणि
- तुमच्या पा.क्रू. त येण्यासाठी कोंबड्या/ बकर-यांची लाईन लागेल.☺
प्रतिक्रिया
खतरनाक!
(मटण न घालता ही पाकृ...
In reply to खतरनाक! by आदूबाळ
किंवा सोया चंक्स पण जवळपास जातात मटण कन्सिस्टन्सी ला
In reply to (मटण न घालता ही पाकृ... by केडी
येस! सोया पण उत्तम लागेल...
In reply to किंवा सोया चंक्स पण जवळपास जातात मटण कन्सिस्टन्सी ला by ज्याक ऑफ ऑल
क्या बात !!!!
पाहून त्या मटणाला
फोटो मस्त....
भारी दिसतय. करुन बघेन लवकरच.
हैला लै भारी
प्रकाशचित्रण आणि मांडणी
तरी ५-६ चमचे आमचूर वाचून अन
In reply to प्रकाशचित्रण आणि मांडणी by जेम्स वांड
केदार
धन्स ग ...बटाटे वापरून करून
रेसिपी तर मस्तच पण ...
धन्यवाद!
In reply to रेसिपी तर मस्तच पण ... by ज्याक ऑफ ऑल
कातिल
टोमॅटो, दही,लिंबू घालून मटण
हो, म्हणूनच, जरा वेगळी वाटली,
In reply to टोमॅटो, दही,लिंबू घालून मटण by नूतन सावंत
मांसाहारी नसूनसुद्धा तुमचे
धन्यवाद....
In reply to मांसाहारी नसूनसुद्धा तुमचे by पुंबा