✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुम्हाला किती मार्क पडले होते दहावीला ?

स
सतिश पाटील यांनी
गुरुवार, 06/15/2017 - 15:39  ·  लेख
लेख
आपल्याही घरी, शेजारी किंवा नात्यागोत्यात कोणाचातरी 'निकाल' लागलाच असेल. अपेक्षेप्रमाने काही जणांनी पेढे वाटले असतील , काही जणांना अपेक्षेपेक्षा जरा कमी गुण आले असतील. निकालाच्या निमित्ताने मी देखील १७ वर्ष पूर्वीच्या आठवणीत हरवलो. गणितात नापास झालो होतो मी. धाग्याचा उद्देश हाच की इथल्या सदस्यांनी देखील त्यांचे १० वीचे खरे मार्क सांगावेत. त्याच सोबत आज ते व्यवसायिक आयुष्यात कुठपर्यंत पोहोचलेत हे ही सांगावे. इतरांचे निकाल पाहताना बर्याच चर्चा केल्या असतील आता जरा स्वतःच्या निकालाची चर्चा सुद्धा होऊ दे की.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39880 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

इथल्या सदस्यांनी देखील

अभ्या..
गुरुवार, 06/15/2017 - 16:08 नवीन
इथल्या सदस्यांनी देखील त्यांचे १० वीचे खरे मार्क सांगावेत.
अडोतीस.
त्याच सोबत आज ते व्यवसायिक आयुष्यात कुठपर्यंत पोहोचलेत
हितंच हाव.
  • Log in or register to post comments

का हो जुन्या जखमा ओल्या करताय?

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 06/15/2017 - 16:44 नवीन
का हो जुन्या जखमा ओल्या करताय? आषाढी-कार्तिकी करत कसाबसा काठावर पास झालो होतो दहावी. खरे तर दहावी कसा पास झालो याचे अजूनपर्यंत आश्चर्य वाटत आहे मला.
  • Log in or register to post comments

थोडं मिटर मध्ये

महासंग्राम
Mon, 06/10/2019 - 09:23 नवीन
उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या येऊ कशा निघोनी पाऊल अडखळे विरहात वेचिताना घटना सुखातल्या उठता तरंग देही हळुवार भावनांचे स्मरतात त्या अजुनी भेटी वनातल्या हासोनिया खुणावी ती रात रंगलेली तू मोजिल्यास होत्या तारा नभातल्या गायिका : शोभा गुर्टू गाणं खाली लिंक मध्ये जखम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

५१४/७०० इतके गूण मिळाले....टक्केवारी काढता येत नाही....

मुक्त विहारि
गुरुवार, 06/15/2017 - 16:47 नवीन
आता ६ महिने शेती आणि ६ महिने मिपा-मिपा.
  • Log in or register to post comments

86.20% आणि आता second year ला

कऊ
गुरुवार, 06/15/2017 - 16:53 नवीन
86.20% आणि आता second year ला आहे... शिकतेय अजून
  • Log in or register to post comments

बीजगणिताच्या पेपरला ७५ पैकी

मोदक
गुरुवार, 06/15/2017 - 17:37 नवीन
बीजगणिताच्या पेपरला ७५ पैकी ३० मार्कांचे (क आणि ड गट) आणि भुमितीला असेच १५ / २० मार्कांचे प्रश्न सोडले होते. संस्कृतने तारले आणि कसेबसे ७०% मिळाले. (मराठी मिडीयम) सध्या माहिती विश्लेशक आहे. ;)
  • Log in or register to post comments

अक्षर ओळख बस

वरुण मोहिते
गुरुवार, 06/15/2017 - 17:40 नवीन
त्यामुळे १० वि अजूनपर्यंत पास नाही झालो .
  • Log in or register to post comments

आम्ही चक्क नापास झालोत.

अमोल काम्बले
गुरुवार, 06/15/2017 - 18:34 नवीन
आम्ही चक्क नापास झालोत. कसेबसे बि.ए. करुन आत्ता ब्यन्के काम करतो.
  • Log in or register to post comments

दहावीला ८८% (मराठी माध्यम)

अमर विश्वास
गुरुवार, 06/15/2017 - 18:52 नवीन
दहावीला ८८% (मराठी माध्यम) सध्या Customer Account Executive आहे
  • Log in or register to post comments

७३%

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 06/15/2017 - 19:10 नवीन
अर्थातच त्यामुळे काही फरक पडला नाही . . . . !
  • Log in or register to post comments

१००% कसे पडतात ?

सप्तरंगी
गुरुवार, 06/15/2017 - 19:55 नवीन
सगळेच काही मार्कांवर अवलंबून नाहीच पण आजकाल मुलांना १००% कसे पडतात हे कळेल का? भाषा विषयात पण पैकीच्या पैकी? हे काहीच्या काही वाटते.
  • Log in or register to post comments

आमच्या वेळी भाषा विषयात ८०

सूड
गुरुवार, 06/15/2017 - 20:37 नवीन
आमच्या वेळी भाषा विषयात ८० म्हणजे लई झालं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

ठीक गुण होते दहावीत

गामा पैलवान
गुरुवार, 06/15/2017 - 20:16 नवीन
दहावी अस्मादिक ठीकठाक गुण मिळवून पास झाले. हुशार म्हणून शाळेत ख्याती असली तरी परीक्षेत (लोकांच्या) अपेक्षेहून कमीच गुण पडले. मात्र दयानंद बांदोडकर उपाख्य ठाणा कॉलेज येथे विज्ञान शाखेत देणगीशिवाय प्रवेश मिळाला. दहावीनंतर शैक्षणिक कारकीर्द बहरली. बारावीला जीवशास्त्रात दांडी उडायची शक्यता उत्पन्न झाली होती. तेव्हा कसून अभ्यास करून वनस्पतीशास्त्रात (=बॉटनीत) चाळीसपैकी पस्तीसेक मिळवले. प्राणीशास्त्राचा पेपर फक्त जोड्या जुळवा, गाळलेल्या जागा भरा आणि बेडकाच्या मेंदूची पानभर (फुलस्केप) आकृती काढून सोडून दिला होता. -गा.पै.
  • Log in or register to post comments

तुम्ही पण बांदोडकरचे काय?

मुक्त विहारि
गुरुवार, 06/15/2017 - 20:29 नवीन
माझे काही मित्र-मैत्रीण पण त्याच कॉलेज मध्ये शिकत होते. बारावी १९८३ बॅच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

८९% सध्या मजेतच आहे..

योगेश लक्ष्मण बोरोले
Fri, 06/16/2017 - 15:21 नवीन
१९९० मध्ये, दहाव्वीत ८९% मिळवले. मात्र बाराव्वीनंतर, एका गुणाने वैद्यकिय अभ्यासक्रमात प्रवेश हुकला व खाजगी महाविद्यालयात जायची तयारी नसल्याने, जळगावहुन मुंबईला येउन रसायनशास्त्रात डाॅक्टर झालो. त्यानंतर १२ वर्षे आदित्य बिर्लामध्ये शास्त्रज्ञ वगैरे म्हणुन काम केल्यानंतर आता स्वतःचा व्यवसाय सुरु केलाय. सध्या कमाई नसली तरी मजेत चालुय ! परत संघर्ष करतोय, शिकतोय, सुधारतोय व पुढे जातोय.
  • Log in or register to post comments

परत संघर्ष करतोय, शिकतोय, सुधारतोय व पुढे जातोय.

मुक्त विहारि
Fri, 06/16/2017 - 15:38 नवीन
+ १ एका गुणाने वैद्यकिय अभ्यासक्रमात प्रवेश हुकला व खाजगी महाविद्यालयात जायची तयारी नसल्याने, =====> हे आर्थिक गणित प्रत्येकालाच परवडेल असे नाही. आमच्या पिताश्रींकडे पैसा होता म्हणून मला शिकवण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. पण तुमच्या बाबतीत हे नशीबाचे फास उलटे पडले. त्यामुळे नाराज होवू नका. बादवे, "तुम्ही ही तर श्रींची इच्छा" हे पुस्तक वाचले आहे का? वाचले नसल्यास जरूर वाचा असा सल्ला कम विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश लक्ष्मण बोरोले

हु तर श्रींची ईच्छा!

योगेश लक्ष्मण बोरोले
Fri, 06/16/2017 - 16:55 नवीन
धन्यवाद. ऐकलेय या पुस्तकाबद्दल. जरुर वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

https://shrithanedar.com/wp

मोदक
Fri, 06/16/2017 - 19:09 नवीन
https://shrithanedar.com/wp-content/uploads/2017/03/HSI_ST_final.pdf इथे विनामुल्य मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश लक्ष्मण बोरोले

हे गुपित कुणाला सा॑गू कसे?

अनन्त्_यात्री
Fri, 06/16/2017 - 15:32 नवीन
माझ्यावेळी ११वी एस.एस.सी. होत॑. त्यामुळे १०वी ला किती मार्क पडले होते हा प्रश्न फाऊल आहे :)
  • Log in or register to post comments

१९८९ ला दहावीला ८९.१४% होते.

arunjoshi123
Fri, 06/16/2017 - 18:20 नवीन
१९८९ ला दहावीला ८९.१४% होते. हा आकडा दशांशाच्या दुसर्‍या स्थळापर्यंत आठवण असण्याचं कारण मला ८९% मार्क पडले हे सांगितल्यानंतर शेजार्‍यांना मी पास झालो आहे का नाही हे सवते सांगावे लागायचे. असो. =============== उदगीरमधेच बारावीला अ‍ॅडमिशनला एवढे मार्क लागायचे नाहित. बारावीचे मार्क्स मात्र कामाला आले. सर्वसाधारणपणे दहावीत चांगले मार्क्स घेणारे बारावितही घेतात असा बोलबाला होता. शिक्षणामुळे बालपण कमी एंजॉय केले का आता शिक्षणामुळेच ओके ओके जगायला मिळतेय याबद्दल संभ्रम आहे. मला अजूनही दहावी बारावीच्या परीक्षांची दु:स्वप्ने पडतात. शिकलो नसतो तर एक मस्तपैकि गावगुंड झालो असतो ही भावना कधी कधी सुखावून जाते.
  • Log in or register to post comments

६६.१५%

औरंगजेब
Fri, 06/16/2017 - 19:10 नवीन
६६.१५% सर्वात जास्त मार्क गणितात १२५/१५० गंमत म्हणजे गणित म्हणजे सर्वात नावडता विषय :-)
  • Log in or register to post comments

६३% होते दहावीला. त्यानंतर B.

ज्योति अळवणी
Sat, 06/17/2017 - 00:15 नवीन
६३% होते दहावीला. त्यानंतर B. Com. C.S. अस काहीस शिक्षण केल. पण सध्या त्या शिक्षणाचा आणि मी करत असलेल्या कामाचा काहीच संबंध नाही. सामाजिक कामात आहे इतकच सांगता येईल. मात्र काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करते. मिपा वरच वाचन आणि लिहिण ही एक नशा आहे.... ती enjoy करते आहे. अधून मधून थोडी busy होते त्यामुळे गायब असते. अर्थात एकूण बर चालल आहे. खुश आहे आयुष्यात मी.
  • Log in or register to post comments

75% -1995

प्रभू-प्रसाद
Sat, 06/17/2017 - 23:10 नवीन
बीजगणित out of out ; साहेबांची भाषा आवडीची-78/100 ; B A spe. English पण सध्या कारकुनी करतो.
  • Log in or register to post comments

७६.५७ %

दा विन्ची
Sat, 06/17/2017 - 23:49 नवीन
१९८७ साली दहावीला ७६.५७ % होते. सध्या अजून उच्च शिक्षण घेतोय, मास्तर आहे.
  • Log in or register to post comments

६१%

शब्दवेडी
Sun, 06/18/2017 - 18:17 नवीन
दहावीला जेमतेम ६१% मार्क मिळवून बेसबॉलच्या कृपेने स्पोर्ट्स कोट्यातून ११ वी वाणिज्य शाखेत प्रवेश मिळाला. कॉमर्स आवडले आणि जमले नाही म्हणून डिग्री नंतर मास्टर्स इन एन्टरटेन्मेन्ट केलं आणि ३ वर्ष वेगवेगळ्या मासिकांकमधून, संकेतस्थळांसाठी लिखाणाचे काम केल्यानंतर आता पूर्ण वेळ भाषांतरकार आणि मजकूर लेखक (अर्थात फ्रीलांस कन्टेन्ट रायटर आणि ट्रान्सलेटर) म्हणून काम करते आहे.
  • Log in or register to post comments

68%

kulpras
Mon, 06/19/2017 - 18:57 नवीन
आत्ता हैदराबाद येथे संगणक अभियंता, दहावी पर्यन्त सगळे शिक्षण मराठी मध्ये
  • Log in or register to post comments

कम्पनी?

हस्तर
Mon, 06/10/2019 - 13:15 नवीन
कम्पनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kulpras

85%, गोवा बोर्ड. पण मी फार

पिशी अबोली
Mon, 06/19/2017 - 19:29 नवीन
85%, गोवा बोर्ड. पण मी फार हल्लीची(2006 ची बॅच) आहे. त्यानंतर आर्ट्सला ऍडमिशन घेतली. सध्या भाषाशास्त्रात पीएचडी करतेय.
  • Log in or register to post comments

85%, गोवा बोर्ड. पण मी फार

पिशी अबोली
Mon, 06/19/2017 - 19:29 नवीन
85%, गोवा बोर्ड. पण मी फार हल्लीची(2006 ची बॅच) आहे. त्यानंतर आर्ट्सला ऍडमिशन घेतली. सध्या भाषाशास्त्रात पीएचडी करतेय.
  • Log in or register to post comments

त्या वेळी किती मार्क पडले होते

संजय क्षीरसागर
Tue, 06/20/2017 - 01:34 नवीन
ते आता आठवत नाही :) पण आर्टसला जाण्यात अर्थ नाही आणि सायन्स करुन मेडीकलला जाण्याची संधी असूनही, रोगराई आणि पेशंटशी आयुष्यभर संपर्क नको, म्हणून कॉमर्सला आलो ! बिकॉमला त्यावेळी फर्स्ट क्लास म्हणजे अपूर्वाई होती पण बँकेत नोकरी मिळण्याशिवाय त्याचा काही उपयोग नव्हता. अशाप्रकारे ग्रॅज्युएशन पश्चात एमबीए किंवा सीए हे दोनच पर्याय उरले. एमबीए हा फारच पांचट आणि वरवरचा प्रकार वाटला म्हणून सीएला आलो. मग लक्षात आलं की आता परतीचे सर्व दोर तुटले आहेत. एकतर सीए किंवा मग अगदी सामान्य आयुष्य जगणं. आता जीव गेला तरी बेहत्तर म्हणून सगळे प्रयत्न पणाला लावले. उमेदीचे दिवस आभ्यासात घालवून सीए झालो ! पोस्ट क्वालिफिकेशननंतर सीएचं एकूण काम बघितल्यावर झक मारली आणि मुंबई पाहिली असं वाटायला लागलं ! मग सायकॉलॉजी आणि अध्यात्माचा तुफान अभ्यास केल्यावर लक्षात आलं मजा कामात नसते, सर्व काम व्यक्तिनिरपेक्ष असतं. मजा आपण कुठलंही काम कसं करतो यावर असते. एका झटक्यात सगळे नको वाटणारे क्लायंटस मित्रांना देऊन टाकले आणि केवळ समविचारी क्लायंटसची काम ठेवून स्वतःच्या मर्जीनं आणि हवं त्या वेळी काम करायला लागलो. (उदा. आता रात्रीचे १.३५ झालेत आणि हा प्रतिसाद लिहीतोयं !) तदनंतर आयुष्यात आनंदी आनंद झाला !
  • Log in or register to post comments

उमेदीचे दिवस आभ्यासात घालवून

आदूबाळ
Tue, 06/20/2017 - 02:17 नवीन
उमेदीचे दिवस आभ्यासात घालवून सीए झालो !
I feel you bro...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

येस ! यू ओन्ली कॅन !

संजय क्षीरसागर
Tue, 06/20/2017 - 10:37 नवीन
`एका झटक्यात सगळे नको वाटणारे क्लायंटस मित्रांना देऊन टाकले' हे थोडं मॉडिफाय करतो. काम कमी करतोयं असं सांगून क्लायंटसच्या फाईल्स त्यांना परत केल्या. फक्त एका क्लायंटसाठी मित्राला रिक्वेस्ट केली कारण तो क्लायंट जायला तयार नव्हता आणि तुम्हीच दुसरा सीए बघून द्या म्हणून अडून बसला होता. पण सध्या मनात येईल तेव्हा काम आणि पूर्ण स्वच्छंदी आयुष्य हे सीएचं क्वालिफिकेशन वापरुन जमवलंय हे मात्र नक्की. म्हणजे तो एक शिक्षणाचा फायदा झालायं. अर्थात, सगळे सीए असं जगत नाहीत हे ही तितकंच खरं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

दहावी मध्ये ८२ % पडले होते.

जॅक डनियल्स
Tue, 06/20/2017 - 04:56 नवीन
दहावी मध्ये ८२ % पडले होते. आभ्यासाची मजा घेत दहावी दिली होती. मराठी आणि इतिहास-भूगोल आवडते विषय. मराठी मध्ये शाळेत पहिला आलो होतो - ७७ मार्क पाडून. पुण्यातली पहिली शाळा असल्यामुळे (न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड ) इतक्या वर्षात लोकांनी मराठीला खूप बक्षिसे ठेवली आहेत त्यामुळे बोर्डात आलेल्या मुलानंतर सगळ्यात जास्त बक्षिसे मलाच मिळाली होती. काही बक्षिसे तर चार -पाच रुपयांची पण होती. साप पकडता पकडता - सिंहगड मधून केमिकल इंजिनीरिंग मध्ये पदवी घेतल्यानंतर 1 वर्ष तोरांगल्लू (JSW steel) आणि दुर्गापूर (dsp स्टील) च्या Praxair च्या प्लांट मध्ये नोकरी केली. त्यानंतर टेनसी येऊन केमिकल मध्ये मास्टर आणि phd केले. सिमेंट -काँक्रीट (मध्ये टाकली जाणारी) केमिकलवरती संशोधन केल्यामुळे आता Quikrite नावाच्या सिमेंट -काँक्रीट कंपनी मध्ये संशोधक आहे.
  • Log in or register to post comments

दहावी ९०% , बारावी ८४% (एकूण

मराठी कथालेखक
Tue, 06/20/2017 - 20:20 नवीन
दहावी ९०% , बारावी ८४% (एकूण - ग्रुपला ९२%) आणि इजिनिअरिंग संपुर्ण डिस्टिंक्शन, नंतर काही वर्षांनी अर्धवेळ एम बी ए डिस्टिंक्शनमध्ये... पण म्हणून आयुष्यात खूप मोठे दिवे लावलेत असं नाही. सध्या हिंजवडीत आय टी कंपनीत आहे. .. झालंच तर कधी परदेशी गेलो नाही...किंबहूना टाळतच आलो... हिंमत झाली नाही असंच म्हणता येईल. रखडत म्हणजे अनेकदा एटीकेटि लागून वा अगदी इयर डाउन (अनुत्तीर्ण) इंजिनिअरिंग झालेले काही सहकारी /मित्र माझ्यापेक्षा जास्त पगार घेत आहेत. असो.
  • Log in or register to post comments

ओह्ह सिरियसली

वरुण मोहिते
Tue, 06/20/2017 - 20:37 नवीन
१० वि बॅच २००३ ८७ % .सेमी इंग्लिश .
  • Log in or register to post comments

तुमच्यापैकी कोणाला

जेम्स वांड
Wed, 06/21/2017 - 10:59 नवीन
१०वी वा १२वीत 'खराब संगतीमुळे' एखाद दोन टक्के, दहा पाच टक्क्यांची चाट बसली आहे का? असे असल्यास मीट मी, आय एम डॅट संगत....बाकी स्वतः उधळलेले गुण सांगण्यालायक नाहीत(च)
  • Log in or register to post comments

८३.६०%, SSC, २००१, संपूर्ण मराठी माध्यम

mayu4u
Wed, 06/21/2017 - 14:10 नवीन
नंतर १२वी विज्ञान (२००३ - HSC): ८६ पूर्णांक काही तरी, PCM ९२. पिताश्री सोडून घरच्या इतर सर्वांचा अभियांत्रिकी ला जावे असा आग्रह होता. मात्र अस्मादिकांना शुद्ध भौतिकशास्त्रात (pure physics) रस असल्याने सगळ्यांना फाट्यावर मारून विज्ञान अधिस्नातक (M Sc) मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. नंतर टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या (TIFR) खगोल भौतिक (astrophysics) विभागात काही काळ संशोधन केले. मात्र तेथील स्थायी सरकारी कर्मचाऱ्यांची संशोधनाविषयीची अनास्था आणि काम न करता वेतन घ्यायची वृत्ती याला विटून तिथून बाहेर पडलो. नंतर काही काळ भौतिकशास्त्रात आणि कॉर्पोरेट जगात इ-लर्निंग क्षेत्रात काम केले. मात्र माहिती तंत्रज्ञान आणि निगडित सेवा (IT & ITeS) मध्ये मन न रमल्याने कौशल्य विकास (स्किल डेव्हलोपमेंट) क्षेत्रात सध्या चाकरी. अभियांत्रिकी ला गेलेले अनेक मित्र अधिक वेतन आणि/किंवा परदेश वारी कमावत असल्याने आधी असूया वाटायची, मात्र आता प्रयत्नपूर्वक तुलना टाळून आनंदी राहतो. दहावीचे गुण किंवा एकूणच आपल्याकडच्या शिक्षणाचा पुढे आयुष्यात काही उपयोग होतो असे मला अजिबात वाटत नाही.
  • Log in or register to post comments

आता प्रयत्नपूर्वक तुलना टाळून

सुबोध खरे
Wed, 06/21/2017 - 19:53 नवीन
आता प्रयत्नपूर्वक तुलना टाळून आनंदी राहतो. १९८० मध्ये दहावीला ८२. ३ % गुण पडले. तेंव्हा ८० % च्या वर गुण असले कि मुंबईत कोणत्याही कॉलेजात प्रवेश मिळत असे. ठाणे (बी एन बांदोडकर) कॉलेज मध्ये १२ केले. तेथे वैद्यकीय प्रवेशास २ गुण कमी पडले. सेंट जॉर्ज मध्ये दंत वैद्यकीस प्रवेश मिळाला होता पण एम बी बी एस च करायचं होतं. एक वर्ष फार्मसीत केलं. दुसऱ्या वर्षी ए एफ एम सी त प्रवेश मिळाला. नौदलात डॉक्टर म्हणून भरती झालो. माझ्या बरोबरच्या इंजिनियर किंवा इतर लोकांना माझ्यापेक्षा जास्त पगार मिळत होता. त्यांची मुंबईत घरे सुद्धा लवकर झाली. परंतु मला लोकांची असूया कधीच वाटली नाही. आजही शाळेत, १० किंवा १२ वी ला माझ्यापेक्षा बरेच कमी गुण असलेले वर्गमित्र माझ्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मिळवत आहेत. पण आनंदी राहण्याचा असा "प्रयत्न" करायची गरज पडली नाही. आनंदी असणे हि वृत्ती आहे आणि ती आत्मसात करणे हि सोपे आहे एकदा तसे झाले कि मग असुया वाटणे किंवा स्वतः बद्दल खंत वाटणे बंद होते. एक उदाहरण देतो आहे. विक्रांत वर असताना मला विभागप्रमुख म्हणून वेगळी केबिन होती. ज्यात त्यातल्या त्यात चांगल्या सुविधा होत्या. एका उन्हाळ्याच्या दिवशी फार गरम होत असल्याने आणि वातानुकूलन यंत्रणा बंद होती म्हणून माझी चिडचिड होत होती. चहा घेत होतो तेवढ्यात दवाखान्यात रुग्ण आला म्हणून मला बोलावणे आले. मी वैतागाने दवाखान्याकडे चाललो असताना मध्ये खलाशांच्या मेस मधून जात होतो तेंव्हा एक कनिष्ठ खलाशी तीन टियरच्या बंक असलेल्या खोलीत मधल्या बंकवर आडवा होऊन काही तरी वाचत होता. बाजूने जाणाऱ्या पाईपवर त्याने चहाचा स्टीलचा ग्लास ठेवला होता. एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन तो अशा स्टाईल मध्ये सिगारेटचे झुरके घेत चहा पीत वाचत बसला होता कि जसा काही "बादशहा"च आहे आणि अख्खे जहाज त्याच्या बापाची जहागीर आहे. त्याच्या मेस मध्ये भरपूर गरम होत होते जेमतेम पंख्याचा वारा लागत होता. अशा परिस्थितीत तो ज्या स्टाईलमध्ये चहा पीत होता ते पाहून मला स्वतःची लाज वाटली. सगळं व्यवस्थित होतं तरी चिडचिड करण्यासारखं मला काहीच कारण नव्हतं. रुग्ण पाहून आल्यावर त्या नौसैनिकाला नमस्कार करावास वाटला म्हणून मी परत आलो पण तो तेथून गेला होता. मला कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे राहावे हे शिकवले याबद्दल त्या अनाम सैनिकाला प्रणाम. दुसऱ्याच्या नव्या बुटांचा हेवा करू नका कारण ते कुठे चावतात ते तुम्हाला कधीच कळत नाही count your blessings. --/\--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

हॅलो डॉक्टर !!!

राघवेंद्र
गुरुवार, 06/22/2017 - 00:37 नवीन
केंव्हा येत आहे पूर्वेच्या समुद्रात चा पुढील भाग ??? तुमचा नौदलतील गोष्टींचा खजिना बऱ्याच दिवस आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

प्रयत्न...

mayu4u
गुरुवार, 06/22/2017 - 20:52 नवीन
... इतरांसोबत होणारी तुलना (अनेकदा इतरांकडून) टाळण्यासाठी करावा लागतो...
आनंदी असणे हि वृत्ती आहे आणि ती आत्मसात करणे हि सोपे आहे
संपूर्ण सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दहावीला किती मार्क पडले हे

दशानन
Wed, 06/21/2017 - 21:43 नवीन
दहावीला किती मार्क पडले हे पाहायला गेलोच नाही, 40 च्या आत नक्कीच असावेत! कारण जाधव सर पार घरात येऊन गेले होते की झालास पास! शिक्षणावाचून माझे तसे काही अडले नाही, पण कधी कधी वाटतं की बुद्धी होती, शिकण्याची इचछा होती, चांगले दोस्त होते सोबत... पण हवे तसे शिक्षण नशिबी नव्हते. गरिबी आणि परिस्थती अशी होती की बोलण्यात काही राम नाही. सध्या चांगले चालू आहे असे काही नाही पण देव दयेने अगदी काचेच्या बिल्डिंगमध्ये एसीत बसून नोकरी करून झाली, चांगला व्यवसाय उभा करून तो यथावकाश बंद करून झाले, शेअर मार्केट ते संगणक व्यवसाय झाल्यावर, वेब सर्व्हिस सुरू करून झाले... सध्या फक्त हे काय जग आहे ते पाहावे म्हणून "NHAI" मध्ये गेल्या महिन्यापासून हायवे इंस्पेक्ष्ण व ट्रॅफिक कँटोल युनिटवर नोकरी करतोय :D
  • Log in or register to post comments

८५.46

कर्मदरिद्री
Wed, 07/05/2017 - 18:22 नवीन
२००६ साली दहावी झाली आता संगणक अभियंता आहे एका बऱ्या कंपनीत नोकरी चालू आहे माझ्या एकंदरीत शिक्षणाबाबत बोलण्यासारखे काहीच नाही पण कोणत्याही क्लासला न जाता संपूर्ण शिक्षण केले याचे समाधान आहे
  • Log in or register to post comments

८१.५७%

जेनी...
Wed, 07/05/2017 - 18:42 नवीन
८१.५७%
  • Log in or register to post comments

१९९१दहावीला शेवटचे सहा महिने

अजया
गुरुवार, 07/06/2017 - 11:28 नवीन
१९९१दहावीला शेवटचे सहा महिने बरीच आजारी होते. हाॅस्पिटलमधुन डिस्चार्ज घेऊन डायरेक्ट परीक्षा दिलेली. ८६.२८% मिळालेले. मी सोडून सर्वांना आश्चर्य वाटलेले पुस्तक हातात न धरता मार्क कसे मिळाले! अकरावीला आमच्या पेंढारकर काॅलेजला प्रचंड उनाडक्या केल्या. तेव्हा डोंबिवली एमायडिसी अगदी रिकामी होती. वर्गात शिकवलेले इंग्रजीतले सायन्स मॅथ्स कळत नसे. फक्त मराठी तासाला मजा यायची. एक साउथ इंडियन मॅडम मॅथ्स शिकवायच्या. बरेच दिवस त्या क्वॅड्रिलॅथरल सदृश उच्चार करत काहीतरी फळ्यावर लिहून शिकवायच्या. त्या काय म्हणतात त्याचा अर्थ काय हे शोधण्याऐवजी बराच काळ मी नव्या मित्र मैत्रिणींबरोबर कँटीनमध्ये घालवला! ब्लॅक लिस्टमध्ये आले तर त्यांनी अभिनंदन करुन पार्टी मागितली होती हे आठवतंय. सहा महिन्यात हळूहळू सूर सापडला. अकरावीला ७२% मिळाले. नंतर बारावीला क्लासला स्पेशल बॅच मिळाली. क्लासच्या जीवावर पिसिबी ९३.६६% मिळाले. मॅथ्समद्ये पण खूप मार्क होते कारण गणितं पाठ करुन गेलेले तिच पेपरात आली. घरचे म्हणायला लागले पिसिएम जास्त आहेत. व्हिजेटिआयला इंजिनिअरिंगला मिळेल. मग भोकाड पसरले. मला गणित येत नाही. नापास होऊ का. बायो जीव का प्राण आवडायचे. मग एक मार्काने मेडिकल हुकले आणि सेंट जाॅर्ज डेंटल ला गेले जी माझ्या आयुष्यात चुकून घडलेली सगळ्यात बेस्ट गोष्ट निघाली!
  • Log in or register to post comments

६३% - १९९८

विकास...
Wed, 07/19/2017 - 03:47 नवीन
दहावी १९९८ मध्ये ६३% मिळवून पास झालो, पुढे कॉमर्स ला, MCOM करून Distribution Business मध्ये JOB अशाच गप्पा मारताना समजलं कि दोघे (मी आणि ती) एकाच शाळेत आणि क्लास रूम मध्ये (वेगवेगळ्या वर्षांमध्ये) दहावीला होतो . . . . . . आणि मग . . . . . आणि मग त्या शाळेच्या आठवणी सांगताना इतकी ओळख झाली कि आम्ही लग्न केलं
  • Log in or register to post comments

लकी बॉय ;)

दशानन
गुरुवार, 07/20/2017 - 21:17 नवीन
लकी बॉय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास...

८५ मेरित होल्डर

एकुलता एक डॉन
Sun, 06/09/2019 - 17:26 नवीन
८५ मेरित होल्डर
  • Log in or register to post comments

85 ला

वरुण मोहिते
Sun, 06/09/2019 - 19:00 नवीन
मेरिट होल्डर????
  • Log in or register to post comments

७९ %...

हेमंतकुमार
Sun, 06/09/2019 - 20:23 नवीन
पण तेव्हा एवढ्यावर राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली बुवा ! पुढे mbbs ला गेल्यावर होस्टेल घेतल्यावर ती रक्कम दुप्पट झाली होती.
  • Log in or register to post comments

आता शिक्षणात दर्जा नाही

Rajesh188
Sun, 06/09/2019 - 23:17 नवीन
99% मार्क मिळवणारे कुठे आहेत . आता दर्जा नाही फक्त सूज आली आहे markanchi. 30 वर्षा पूर्वीचे 60%,आणि आताचे 99.99% एकच दर्जाचे आहेत
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा