शाळेचा पहिला दिवस
आज १४ जून . . प्रदीर्घ सुट्टीनंतर पहिल्यांदा शाळेत जायचा दिवस . . .नवीन गणवेश . . नवीन वह्यापुस्तकं . . . नवीन वर्ग . . . . नवीन सवंगडी . . . आपलं नाव कुठल्या वर्गात येतंय त्याची उत्सुकता . . . आपला हजेरी क्रमांक काय असेल , मग तो लकी आहे की नाही याचा अंदाज घेणे . . . नवीन शिक्षक कोण आले आहेत ते बघणे . . . . बाहेरच्या कुंद पावसाळी वातावरणात ते वाहनांचे आवाज आणि पादचारी लोकांची लगबग . . . शेजारच्या मशिदीतली ती भोंगावाली अजान . . .
आपला वर्ग आणि खोली पहायला प्रवेशद्वारी उसळलेली गर्दी . . .आपलं नवंकोरं दप्तर,ते भिजू नये म्हणून आपला चाललेला आटापिटा.... त्यातले ओळखीचे आणि अनोळखी चेहरे . . . गेल्या वर्षी चांगले मार्क मिळाल्याने काही उगाचच शिष्टपणा करणारी मुलं . . . त्यांच्या आजूबाजूला त्यांच्यासारखं बनू पाहणारी किंवा मार्कांच्या बाबतीत जवळपास असणारी मुलं . . (आमच्या शाळेत बहुधा तुमचे मार्क तुमचं वर्तुळ आणि बेंच ठरवतात) . . .
पावसामुळे ओलसर दमट झालेले ते बेंच . . . त्या पोपडे पडलेल्या वर्गाच्या भिंती . . . . अभ्यासू,मध्यम, टवाळ सगळ्या प्रकारची मुलं . . . वरवर शांत वाटणार्या पण प्रत्येक गोष्ट बारीक नजरेने टिपणार्या मुली. . . फळा, डस्टर, खडू आणि बरंच काही . . . प्रत्येक तासाचं निराळं कुतूहल . . . अभ्यासाची वाढलेली जबाबदारी . . . या वर्षी चांगले मार्क मिळवायचेच असा केलेला निश्चय . . . . इतर वर्गातला कोलाहल . . . स्वच्छतागृहाच्या बाजूने जाताना नाक जाळणारा भपकारा . . . टीचर रुममधली गडबड . . .
आपला आवडता बेंच पकडण्याची चढाओढ . . तेवढ्यात शिपायाने दिलेली घंटा . . . . तेच सुपरिचित गाणे . . . कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर . . . . त्यानंतर प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत . . . . मग वर्गात पसरलेली शांतता . . . हजेरी पट . . आपला नंबर पुकारला तरी सवय नसल्याने इकडे तिकडे बघत राहणे मग शिक्षकाचा वाढलेल्या स्वरात ओरडणं . . एकामागून एक सरकणारे तास . . प्रत्येक विषयाची तोंडओळख होते पहिल्या दिवशी . . . शिकवत असं कोणी नाहीच . . . . मधली सुट्टी . . . . डबा खाणे . . . . ग्राउंड बरं असेल तर खाली फेरी , अन्यथा आमचा बंदिस्त रंगमंच झिंदाबाद !
हे असे भरलेल्या पावसाचे दिवस आठवले की मनही भरून येतं . . . शरीर शिकून बाहेर पडलं फक्त शाळेतून आणि एकामागोमाग नित्यकर्म करत राहिलंय आयुष्याची. . . मग अजूनही घुटमळतंय तिथेच . . . ओल्या दमट बेंचवर . . कायमचं . . . . एक विद्यार्थी म्हणून !
वाचने
10301
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
लेख आवडला...
आपलं नाव कुठल्या वर्गात येतंय
In reply to आपलं नाव कुठल्या वर्गात येतंय by किसन शिंदे
कुठल्या तुकडीत ढकललंय हे कळायचं.
In reply to आपलं नाव कुठल्या वर्गात येतंय by किसन शिंदे
तुकडी माहिती असायची
बरंय बाबा, बरंच काही आठवतंय
In reply to बरंय बाबा, बरंच काही आठवतंय by अभ्या..
+1...
लेख आवडला.
'ए' विरुद्ध 'बी'
In reply to 'ए' विरुद्ध 'बी' by राघवेंद्र
त्यावरून उगीच आठवलं..
माझं मराठीचं पुस्तक वाचून
In reply to माझं मराठीचं पुस्तक वाचून by रातराणी
+१
चानचानचान
Old is Gold
सर्वात कंटाळवाणा दिवस. अजून
मैत्रीण बीत गेली
In reply to मैत्रीण बीत गेली by गामा पैलवान
+ १
In reply to मैत्रीण बीत गेली by गामा पैलवान
+१
कैचांभुच
In reply to कैचांभुच by गामा पैलवान
हो . .
In reply to हो . . by माम्लेदारचा पन्खा
तुम्हीच म्हटलंय की ...
मस्त!! आवडलं!!