माथाडी कामगार - काही प्रश्न
"माथाडी कामगार" हा शब्दप्रयोग काहीवेळा पेपरात वाचला होता, पण कधी यावर विचार नव्हता केला.
आज " स्वयंघोषित माथाडी नेत्यांकडून खंडणी वसूल "
http://www.esakal.com/pune/pune-news-marathi-news-maharashtra-news-pimpri-news-51757
ही बातमी वाचून हे "माथाडी कामगार" प्रकरण काय आहे , हे जाणून घेण्याची उत्सुकता वाटली.
https://mahakamgar.maharashtra.gov.in/lc-mathadi-boards-mr.htm
या सरकारच्या साइटनुसार
"माथा" म्हणजे डोके. ओझे वाहून नेण्यासाठी डोक्याचा वापर करणे म्हणजे माथाडी.माथाडी कामगार ओझी उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे. अशासारखी अन्य कामे करतात. डोक्यावरून ओझे वाहून नेणा-या कामगारास माथाडी कामगार म्हणतात.
हमाल व माथाडी कामगार यांना योग्य वेतन आणि अटीनुसार कामाच्या अन्य सुविधा मिळत नव्हत्या. मालकांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत.१९६६ मध्ये कै.माननीय आण्णा साहेब पाटील यांनी माथाडी कामगार व मुंबई मधील इतर बाजारातील त्याच्या नेत्यांना एकत्र केले. माथाडी कामगार यांनी कायद्याच्या एका भागात यावे अशी मागणी केली.खूप दिवसाच्या संघर्षानंतर आणि समितीने दिलेल्या अहवालाचा विचार करता,महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील यासाठी कायदा बनविला तो नियम म्हणजेच महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार(नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९. .. माथाडी कामगारांनी प्रत्येक महिन्याला मंडळाकडून मासिक वेतन मिळायला लागली.्याबरोबर भविष्य निर्वाह निधी, उपदान, व वैदकीय लाभ, बोनस, सुट्टी वेतन इ. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात बदल झालाही माहिती वाचून मला काही प्रश्न पडले. कोणाला यासंबंधी अधिक माहिती असल्यास द्यावी. 1. फक्त हमाल/माथाडी कामगारांसाठी सरकारने वेगळे नियम का केले? घरोघरी फरशी पुसणे, स्वयंपाक करणे हे काम करणाऱ्याना (बहुतांश महिला) यांना माथाडी कामगारांसोबत का नाही जोडले? 2. प्रायव्हेट बांधकामाच्या वेळी काम करणारे मजूर "माथाडी कामगार" असतात का? त्यांना पण सरकारकडून वेगळे मासिक वेतन मिळते का?
याद्या
16622
प्रतिक्रिया
6
वर्गीकरण
मिसळपाव
असंघटित कामगार
माहितीसाठी धन्यवाद.
In reply to असंघटित कामगार by Ranapratap
माथाडी कायद्यामुळे काही
वाराई म्हणजे हप्ता??
In reply to माथाडी कायद्यामुळे काही by पिंगू
वाराई म्हणजे रॉयल्टी
In reply to वाराई म्हणजे हप्ता?? by दशानन
हा हा हा.....