नवी पा.कृ.: ब्रह्माण्डाचे ऑम्लेट
नका डोळयांसी वटारू | नका काना॑सी टवकारू
शीर्षक योग्यची "पा.कृ."| वाटे जरी अस्थानी
प्रथम ब्रह्माण्ड फेटावे | स्थल-काल कुपीत ठेवावे
चांदण-चुऱ्याचे लवण घालावे |चवी पुरतेच फेटणी
अणु-गर्भाचे सोलीव कांदे | (बारीक चिरायचे वांदे)
फोडुनी तयांची पुष्ट दोंदे |ढकलावे फेटणी
आदि-स्फोटाचा अग्नी पेटवा |आकाश-गंगेचा चढवा तवा
तेजोमेघांचे तेल उडवा |दोन थेंबुटे त्यावरी
फेटण त्यावरी हळू ओता | गुरुत्व-कालथ्याने अरता-परता
ऑम्लेट होईल बोलता बोलता |कल्पांता पर्यंत
या पा.कृ. चे प्रकाश-चित्र | देखू न शकती चर्म-नेत्र
म्हणोनी तिचे रेखा-चित्र | सत्वर टाकावे कुणीतरी
वाचने
17548
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
चवदार आहे आम्लेट
छान. आणि हे कशाशी खातात बरें?
In reply to छान. आणि हे कशाशी खातात बरें? by एस
..
In reply to छान. आणि हे कशाशी खातात बरें? by एस
एस, धन्यवाद!हे कशाशी खातात
गामा पैलवान, आपल्या "चवदार"
झ का स !!!!!
वाहवा!
In reply to वाहवा! by चांदणे संदीप
स॑दीपभौ, सु॑दर रेखाचित्र! धन्यवाद !!
आअम्च्याकडे या पाककृतीत
In reply to आअम्च्याकडे या पाककृतीत by पुंबा
सौरा, धन्यवाद! आता २०६१ साली हॅलेचा
कविता खूप आवडली. एकदम हटके,
In reply to कविता खूप आवडली. एकदम हटके, by पद्मावति
+1
In reply to कविता खूप आवडली. एकदम हटके, by पद्मावति
+111111
अ.सो.का. मस्तंच आहेत
In reply to अ.सो.का. मस्तंच आहेत by गामा पैलवान
गा.पै., कुतूहल म्हणून जेव्हा पु॑ज रसायनशास्त्राचा...
In reply to गा.पै., कुतूहल म्हणून जेव्हा पु॑ज रसायनशास्त्राचा... by अनन्त्_यात्री
रसिक दिसताय
In reply to रसिक दिसताय by गामा पैलवान
गा.पै.
तुमच्या अचाट कल्पनाशक्तीच्या
In reply to तुमच्या अचाट कल्पनाशक्तीच्या by डॉ सुहास म्हात्रे
2 नंबरच्या भगव्या लाटेच्या
In reply to तुमच्या अचाट कल्पनाशक्तीच्या by डॉ सुहास म्हात्रे
सुहास म्हात्रे, माना के बून्द से गयी....
In reply to सुहास म्हात्रे, माना के बून्द से गयी.... by अनन्त्_यात्री
माणूस म्हटले की कधी ना कधी
ओम ब्रह्मर्पनम ब्रम्ह हविह
In reply to ओम ब्रह्मर्पनम ब्रम्ह हविह by कुलदादा
कुलदादा, कोन्त्याच श्लोकवरून स्फूर्ति बिर्ती नाय
जबरी कविता!
अप्रतीम कविता
विक्रममाधव,पद्मावति,इ.का,सुखीमाणूस,रुपी,इ.डो....
आभार
अफलातून पाकृ , आणि ग्रेट
स्नेहा॑किता, ऑम्लेट्ची चव...
काय कल्पनाशक्ति आहे सही
एकविरा, पा.कृ. वाचताना गोनीदा॑ची..
आधी वाटलं की ब्राम्हणी
सुरन्गीतै, __/\__ !. खर॑ तर गा.पै.यांचा प्रतिसाद ...
अभिनंदन अनन्त्_यात्री!