अंबरनक्षी
======
सुखाच्या जाणिवेपोटी
निद्रीस्तदामिनी झाली
नेणीवलकेर लहरता
निर्झरली शब्दमाऊली
उरले ना रितेपण रिते
आठवसाठले रांजण
डोळ्यातील आसवांनी
आता भरले गं आंगण
त्या क्षितिजरेषेवरती
झेपावला मानसपक्षी
विलंबित जलदांसाठी
उमलली ही अंबरनक्षी
ही सांज ढळण्याआधी
तेवते गाभारसमई
स्मरणातील उत्सवसंध्या
पांघरते गर्दनिळाई
- सांजसंध्या
4.6.2017
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6971
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख !!
व्वाह!
शार्दुल हातोळकर आणि अतृप्त
कळलं काही नाही, पण काहीतरी
कवितेत कळण्यासारखं काही दिसत नाही !
In reply to कळलं काही नाही, पण काहीतरी by किसन शिंदे
तुम्ही कविता म्हणून वाचली का
In reply to कवितेत कळण्यासारखं काही दिसत नाही ! by संजय क्षीरसागर
कविता म्हणूनच वाचली,
In reply to तुम्ही कविता म्हणून वाचली का by सांजसंध्या
तुम्ही म्हणता तेच खरे. मी काय
In reply to कविता म्हणूनच वाचली, by संजय क्षीरसागर
एकच संक्षीप्त मार्या पण क्या
In reply to तुम्ही म्हणता तेच खरे. मी काय by सांजसंध्या
संध्याजी,
In reply to तुम्ही म्हणता तेच खरे. मी काय by सांजसंध्या
प्रतिभेला वीज म्हटलं गेलं आहे. सुखाच्या जाणिवेने ती झोपी गेली.मग तुम्ही स्वतःच विचारतायं : २)नेणिवांतल्या या स्मृतीची जाणीव कधी होते ? ती प्रेरणा कधी होईल ?आता या अर्थव्यक्तीसाठी तुमची शब्दयोजना पाहा : नेणीवलकेर लहरता निर्झरली शब्दमाऊली म्हणजे कुठल्या तरी बॅकमेमरी `नेणीवेत लहरल्यामुळे', सुखाच्या जाणीवेनं `झोपलेल्या प्रतिभेतून' ही कविताझरलीआहे ! असा स्टार्टींगलाच घोळ आहे. ३) पुढे अशा ओळी येतात : त्या क्षितिजरेषेवरती झेपावला मानसपक्षी विलंबित जलदांसाठी उमलली ही अंबरनक्षी अर्थविदित करतांना तुम्ही म्हणता कीक्षितिज म्हणजे अमर्याद शक्यता. मानसपक्षी अर्थात कल्पनाथोडक्यात, तुमचा मानसपक्षी अनुभवातल्या अमर्याद शक्यता व्यक्त करण्यासाठी ऑलरेडी क्षितीजाकडे झेपावला आहे. तुम्ही पुन्हा त्याला मागे खेचतायं (विलंबित जलदांसाठी) कारण बरेच दिवस पाऊस (कविता) झालेला नाही. शिवाय क्षितीज आणि आकाश या एकमेकांना बिलगून असलेल्या गोष्टी आहेत. आता मन त्या अमर्याद शक्यतांचा वेध घेणार का प्रतिमांची ही गर्दी (अंबरनक्षी) पाहाणार ? याला बॅक-अँड-फोर्थ ऑफ इमॅजिनेशन म्हणतात. थोडक्यात अभिव्यक्त काय करायचं याची निश्चिती नसल्यामुळे अनेक कल्पनांची भाऊ गर्दी होते. मग अशा कल्पना अगम्य शब्दात बसवायचा प्रयत्न होतो. परिणामी कविता अर्थहिन होते. तुम्हाला चांगली कविता करायची असेल तर दोन गोष्टी करा : १) काव्यविषय हा एकसंध उत्कट अनुभव असला पाहिजे आणि कविता त्या अनुभवाशी इमान राखणारी असायला हवी, आणि २) इथल्या लल्लू-पंजू सदस्यांचे ज्यांना कवितेतलं काही गम्य नाही, रिमार्क फाट्यावर मारा.ज्यांना कवितेतलं काही गम्य
In reply to संध्याजी, by संजय क्षीरसागर
समजेल अशी अपेक्षा ठेऊ देखील
In reply to ज्यांना कवितेतलं काही गम्य by सांजसंध्या
मस्त...!
In reply to संध्याजी, by संजय क्षीरसागर
गर्दनिळाई
मस्त !!
अर्थ नक्की सांगेन यावेळी.
सर्वांचे आभार.
टँजंट गेली
शरदिनीबाइंची माइल्ड व्हर्जन
गेल्या चार ते पाच वर्षात
विलंबित जलदा बद्दल
कवी / कवयित्रीने अर्थ समजावून
कवी / कवयित्रीने अर्थ समजावून
In reply to कवी / कवयित्रीने अर्थ समजावून by दशानन
अगदी अगदी..
In reply to कवी / कवयित्रीने अर्थ समजावून by दशानन