Skip to main content

तळलेले बांगडे

लेखक मितालि यांनी मंगळवार, 24/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बांगडे, तेल, मीठ, कोकम रस, मिरचिपुड, तांदळाचे पीठ पाककृती : बांगडे स्वच्छ धुवुन त्याना कोकम रस व मीठ लावून ठेवा. तांदळाच्या पीठात मिरचिपुड घालुन मिक्स करा. या पिठात मासे घोळवून गरम तेलात तव्यावर छान त़ळुन काढा.

वाचने 5627
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

सकाळी सकाळी तळलेले बांगडे ! मालवणी पद्धतीचं बांगड्याचं कालवणही एकदम बेष्ट असतं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

अरे हे काय चाललय काय. सगळे नुसते छळायला टपलेत.. X( बांगडा हा आपला वीक पॉइंट. असली जीवघेणी पाकक्रिया आणि फोटू टाकुन मिपाकरांना जळवल्या बद्दल मिताली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाकी फोटु आणि पाकक्रिया एकदम खत्री.. @) डोळे दिपले.

आज की ताजा खबर..! मिपाकार तात्या अभ्यंकर हमारे बीच नही रहे! :) मितालीतै, जियो...! :) आपला, (बांगडाप्रेमी) तात्या.

का सगळेजण मला मत्स्याहारी बनायला भाग पाडताय? निदान फोटू तरी नका टाकू. रेवती

सुंदर फोटो (ही पाकृ चविष्ट लागतेच!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

=)) :P 8> =D> =P~ @) :X 8} ~X( :O) अरे कोणी तरी आग्राला नाय तर येरवड्याला पाठवा रे मला :D Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

जबराट फोटो ! तळलेला बांगडा मस्तंच.. आजचा बेत पक्का. :)

खुपच छान फोटो आहे. तळलेले बांगडा पाहुन तोंडाला पाणीच सुटले.