मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाकर मंडळींना निमंत्रण

इन कम · · मिपा कलादालन
माझे, इचिंग या प्रकारातील कलाकृतीचे प्रदर्शन मंगळवार दि.१८ एप्रिल ते सोमवार २४ एप्रिल २०१७ पर्यंत काळा घोडा,मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उदघाटन, मा.पद्मश्री. कुमार केतकर (वरिष्ठ पत्रकार )ह्यांच्या हस्ते, मंगळवार १८ एप्रिल २०१७ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता होणार आहे. इच्छुकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत

वाचने 3823 वाचनखूण प्रतिक्रिया 18

एस Mon, 04/17/2017 - 21:32
अरे वा! मुंबईला येणं शक्य नाही, पण तुमच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला शुभेच्छा. इथे काही नमुने दिले असते तर अजून उत्सुकता वाढली असती.

चित्रगुप्त Tue, 04/18/2017 - 08:38
प्रदर्शनासाठी हार्दिक शुभेच्छा. सवडीप्रमाणे तुमच्या चित्रांचे नमुने आणि इचिंग विषयी माहिती, तुम्ही या कलाप्रकाराकडे कसे आकर्षित झालात, साधना कशी, कुठे केली/करता वगैरे सर्व काही लिहावे ही विनंती. या निमित्याने चित्रकलेविषयी माझ्या काही लेखांचे दुवे: मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी... http://www.misalpav.com/node/18587 चित्रानुभूतीत जगण्याची धुंदी ... http://www.misalpav.com/node/31110 चांदबीबी आणि मादाम पोंपादूर : भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील भेद http://www.misalpav.com/node/26407 'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल http://www.misalpav.com/node/26519

पैसा Tue, 04/18/2017 - 10:02
अभिनंदन आणि प्रदर्शनाला हार्दिक शुभेच्छा! या कलाप्रकाराबद्दल नंतर सवडीने जरूर लिहा.

अरे वा ! अभिनंदन आणि प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !! प्रदर्शन झाल्यावर मिपावर त्याचा सचित्र वृत्तांत जरूर टाका.

कंजूस Sat, 04/22/2017 - 20:46
कालाघोडा,जहांगिर आर्ट गॅलरीतले इन-कम यांचे प्रदर्शन पाहिले आज दुपारी. पोर्टफोलियो दिलाय. तिथे फोटोला बंदी आहे. सात वर्षांनी प्रदर्शनाचा नंबर लागला. चाळीसेक चित्रे आहेत.स्टुडिओ ठाण्यात. एचिंगची माहिती कळली. मेटलप्लेटवर नेगटिव करून नंतर त्याच्या प्रिंट्स काढतात. पंधरा दिवसाला एक चित्र बनते. फोटो १) फोटो २)

इन कम Sun, 06/04/2017 - 20:45
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! शुभेच्छांसाठी आणि प्रतिसादासाठी आणि वेळात वेळ काढून प्रदर्शनास भेट दिल्याबद्दल ... (उशिर झाल्याबद्दल क्षमस्व ! ) माझ्या कला प्रवासाबद्दल नक्की सवडीने लिखाण करेल.

शुभेच्छा ! थोडा वेळ काढून इथे तुमच्या कलेची चित्रे थोड्या मजकूरासह टाकले तर तुमच्या कलेसंबंधी व व्यासंगासंबंधी मिपाकराना माहिती होईल.