Skip to main content

माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 24/02/2009 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
गडबड वेड्या वस्तीमध्ये शाळा पाखरांची पोपट मैना आणि कबुतर लगबग चिमण्यांची डेरदार त्या वृक्षावरती घर आणिक शाळा सकाळ सायंकाळी भरतो प्क्ष्यांचा मेळा कावळा मास्तर शाळेमध्ये पोर चिमणा-चिमणी कावळा शिकवी धडे-कविता मुले गाती गाणी किलबिल किलबिल किती तयांची आसमंत दाट्तो मैना गाइ सुरेल गाणे पोपट तो नाचतो अवतीभवती मनुष्यप्राणी लोभी हलकट मारामारी आणि भांडणे नुसता हवरट स्वार्थापायी या अधमाने कुर्हाड हो आणलि घर आणिक शाळा त्यांची झरझर हो तोडली घिरट्या घालीत होते पक्षी घर हरवले कोठे आर्त स्वराने त्या पक्ष्यांच्या आसमंत दाटे किलबिल किलबिल हरवून गेली सुने सुने झाले माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3003
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

किलबिल किलबिल हरवून गेली सुने सुने झाले माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले काय ओळी आहेत ....मनाला भिडल्या !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

>> स्वार्थापायी या अधमाने कुर्हाड हो आणलि घर आणिक शाळा त्यांची झरझर हो तोडली >> किलबिल किलबिल हरवून गेली सुने सुने झाले माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले या ओळी खूप आवडल्या. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

अ..प्र..ति..म.. गुणगुणायला लावणारी कविता..