Skip to main content

हळद

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 26/05/2017 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांच्या जखमा भरणारी हळद, तिला मात्र जखमी करून जाते... आजही ती कोणाच्या हळदीला जायचं अट्टाहासाने टाळते... जखमेवर हळद भरायची म्हटलं की तिचे डोळे येतात भरून... आजही.. हरितालिका पुजताना, वटपौर्णिमेला मागणं मागताना, कातर होते ती... अंगाला लागलेली हळद कोणाची.. कळेनासं होतं.. वेडावून जाते ती.. त्याने विनोद पाठवला जखम होण्याआधी फक्त लग्नातच हळद लागते तिचे डोळे भरून आले... हळदीच्या विनोदानेच जखमेवरची खपली काढली... हळदीनेच होणाऱ्या जखमेवर उपाय काय.....
लेखनविषय:

वाचने 1798
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सावन जो अगन लगाये.... वगैरे आठवलं! Sandy

मुंगी वरची कविता आवडली (मुंगळा) पैजारबुवा,

पहिल्या चार ओळी आणि नंतरच्या चार ओळी खासच. आवडली कविता. लिखते रहो. -दिलीप बिरुटे

खूप सुंंदर,खूप आवडली पण why ह्या प्रश्नाचे मिळत नाही, भूतकाळ/ कार्यकारणभाव वगैरेच्या स्पष्टीकरणासाठी, pls अजून एक तरी अंंतरा लिहा.