चला, चित्रकलेची सुरुवात करूया... (भाग १: रेखाटन)
मित्रहो, "आपण आता चित्रकलेची सुरुवात केली पाहिजे" असे नेहमी वाटत राहणाऱ्या, पण नेमके काय करावे, कसली चित्रे काढावीत, ती कशी निघतील, लोकांना ती आवडतील का, कोणते रंग-ब्रश-कागद वापरावेत, कोल्ड प्रेस कागद बरा की हॉट प्रेस, ऍसिड फ्री बरा की साधाच बरा, ऍक्रेलिक की ऑइल की पोस्टर कलर की जलरंग की पेस्टल वापरावेत, चित्रांचा आकार किती असावा, झालेले चित्र बेडरूमात लावावे की जिन्यात की कुठे, फ्रेमिंग कुठून करवावे, फेसबुकावर लाईक्स मिळतील ना ? मिपावर दंगा तर होणार नाही ? ..... छे..... काहीच कळत नाही बुवा/बाई..... आणि अगदी आत्ताच सुरुवात केली पाहिजे असे कोणी सांगितले ? चला, नंतर बघू कधीतरी.... आत्ता अमुक तमुक करु .....
...... असे वाटणाऱ्या सर्वांनो , हा धागा तुमच्यासाठीच आहे. तर आता काय करायचे ते बघूया.
१. सुरुवातीचा निश्चय
बहुतेक सर्वांच्याच चित्रकलेची सुरुवात फोटो वा चित्रे बघून काढण्यापासून होत असते. सुरुवात म्हणून हे ठीक असले, तरी नंतर मात्र या सवयीत अडकलेल्यांची प्रगती खुंटते.
तर समजा तुम्ही ती मधुबाला, सचिन, शिवाजीमहाराज वगैरेंची सुंदरशी हुबेहूब चित्रे काढून वाहवा मिळवणारांपैकी आहात, किंवा तसले काही न करणारांपैकी आहात ... आता पहिले काम करायचे ते असे, की "यापुढे कोणतेही चित्र वा फोटो बघून आपण चित्र काढायचे नाही" असा निश्चय सगळ्यात आधी करायचा.
२. बरं, मग पुढे ?
... सुरुवातीला सहज उपलब्ध असलेले साहित्य उदाहरणार्थ कोणताही कोरा/पाठकोरा कागद आणि पेन्सिल/ पेन घेऊन आता या पुढील अर्धा तास आपल्याला फक्त चित्र काढण्यात घालवायचा आहे, असे ठरवून सज्ज व्हा.
... अन्य व्यत्यय उदा. मोबाईल, टीव्ही, वगैरे बंद करा.
....आपण आता करणार असलेले चित्र कुणाला दाखवण्यासाठी, फेसबुक वा मिपावर वगैरे टाकण्यासाठी नसून निव्वळ शिकण्यासाठी, चित्रकलेचा आनंद लुटण्यासाठी आहे, ते चांगले झाले नाही तर फाडून टाकले तरी चालेल .. असे ठरवून आजूबाजूला बघा.
३. भोवताली काय दिसते आहे?
... ते बघा, आणि त्यापैकी एकादी वा दोनचार गोष्टी निवडा आणि त्याचे जसे जमेल तसे चित्रण करणे सुरु करा. भोवताल अगदीच नीरस वाटत असेल तर गॅलरीत, गच्चीवर वा बाहेर पडा आणि समोर दिसणारे दृश्य रेखाटने सुरु करा.
बस. हीच तुमच्या चित्रकलेची खरी सुरुवात आहे.
अन्य संकल्पना, रंगांचे प्रकार, कागद / कॅनव्हासचे प्रकार, ब्रशचे प्रकार आणि त्यांचे उपयोग वगैरे सर्व गोष्टी यथावकाश या लेखमालेच्या पुढील भागांमध्ये येतीलच.
हुर्रर्रर्रर्रर्रर्र सुटा, रेखाटनाला लागा, आणि चार- पाच रेखाटने इथे टाका. तुम्हाला आणि घरच्यांना ती कितीही खराब किंवा चांगली वाटली तरी.
(क्रमशः)
.
.
.
.
.
.
.
.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हायला, संदीपा भारी जमतं रे.
दादानुं...
कसलं सुरेख आहे हे !
काचेवर कागद
काचेवर कागद ठेऊन त्यावर
भारी उपक्रम , आवडलाच ! खुप
पर्स्पेक्टिव ड्रॉइंग
हे छान आहे.
भारी आहे...
अॅप्लाईड आर्टस मध्येही
कोणताही आकार
सद्ध्या घरात थोडे इंटेरीयरचे
अफलातून...
या मलिकेबध्द्ल धन्यवाद
हे वाचलंच नव्हतं अजून
अरे वाह आवडत्या विषयावर लेखमालिका
खुप छान मालिका.
पॅरिस
इथे म्हटल्याप्रमाणे स्केच
मिपा एक विद्द्या पीठ असे
धन्यवाद चित्रगुप्त जी
iPad Pro आणि Apple Pencil
हुश्श!!!
चित्र दिसत नाहीये
टॅबलेटवर काढलेली रेखाटनं आणि
अवश्य.
अतिशय चांगला धागा. बरंच काही
स्वस्ताचं काय म्हाईत नाही पण
हो.. व्हीनसमध्ये सगळं मिळतं.
भारती विद्यापीठामागे (मागच्या
आर्टिस्ट कट्टा पटर्वधन
आज जाऊन आले आर्टिस्ट कट्याला.
सुंदर प्रयोग होईल.
धन्यवाद....
चित्रगुप्त गुरुजी, हा धागा
तपशील छान रेखाटलेत.
धन्यवाद गुरुजी.
परस्पेक्टीव्ह ?
गुर्जी, ह्ये कसं वाटतय ते बघा
चित्र दिसत नाहिये भौ.
मी सुध्दा!
थोडकेमे परस्पेक्टीव्ह
एक राहिले
नीरस रेखाटन
मस्त लिहिलय ! अजुन लिहा !
पुन्हा एकदा
धन्यवाद हा धागा वर
उत्तम धागा.