Skip to main content

सूर्यास्त

लेखक जयवी यांनी सोमवार, 23/02/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
का लागली दृष्ट तेजोनिधीला अवेळी कसा आज सूर्यास्त झाला अर्ध्यातूनी सोडूनी डाव ऐसा शरण भास्करा तू कसा या निशेला बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली अंधार डोही धरा दीनवाणी कशी भासते आज केविलवाणी कंटाळवाणी प्रतिक्षा रवीची आस वेड्या जीवाला नव्याने उषेची जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1770
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

>> बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली या ओळी विशेष आवडल्या, जयश्री.

अतिशय सुरेख काव्य आहे. भास्कराने निशेला शरण जाणे... जबरदस्त कल्पना. :) बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली सुरेख! जयूताई, तुझ्या प्रतिभेसमोर मी नतमस्तक आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली अप्रतीम शब्दयोजना...! आपला, (जयूचा फ्यॅन) तात्या.

सुंदर कविता !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली - ग्रेट्ट्च . . .