Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शैलेन्द्र on Tue, 05/09/2017 - 19:46
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
मागील भागात आपण पाहिलं कि मानवाचा अगदी जवळचा नातलग असलेले चिंपांजी संवाद कसा साधतात आणि त्यांच्यात व आधुनिक मानवाच्या भाषेत काय फरक आहे , याच प्रश्नाकडे आता अजून थोडं विस्ताराने पाहू. मुळात मानवी भाषा इतर प्राण्यांच्या भाषेपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे आणि मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या तसेच अगदी इतर मानवांच्या मेंदूपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळा आहे या दोन प्रश्नांबरोबरच, मानवाच्या मेंदूचा त्याच्या भाषेवर काय प्रभाव आहे हेही समजून घेणं महत्वाचं ठरतं. पहिल्यांदा आपण मेंदूत नक्की काय बदल घडले ते पाहू, मानवी मेंदूतील बदल खरंतर 170000 वर्षापासूनच सुरू झाले. मानवी मेंदू हा मानववंशातील सर्वात मोठा मेंदू नक्कीच नव्हे, तो मान बहुदा निण्डेरथलचा आहे. इथे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की आपल्याला मानववंशातील प्राण्यांचे सांगाडे मिळालेत, त्यांच्या कवटीच माप आपल्याकडे आहे पण मेंदू हा पूर्ण कवटी व्यापतोच असं नव्हे. त्यामुळे कोणाचा मेंदू किती मोठा होता याबद्दल आपण फक्त अंदाज करू शकतो. दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे जी एक बौद्धिक क्रांती साधारण ७०००० वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं ती नक्की काय होती हे आपल्याला आज केवळ तर्काने जाणून घ्यावं लागेल, पण तरीही, बहुदा, या बदलात मेंदूचे आकारमान किंवा त्याचे भाग बदलले किंवा वाढले नाहीत. जे बदल घडले ते मेंदूच्या पेशींच्या एकमेकांशी असलेल्या संपर्काच्या क्षमतेत आणि प्रमाणात. जसं एखाद्या आडव्या तिडव्या पसरलेल्या भूप्रदेशात नवीन रस्त्याचं जाळं विणले जाते आणि मग पूर्वी खूप लांब असलेले प्रदेश जवळ येतात तसंच या नवीन मज्जापेशींनी मेंदूच्या वेगवेगळ्या प्रदेशांना अशा पद्धतीने जोडले की होमो सेपियन हा प्राणी इतरांपेक्षा वेगळा पडला. हे बदल अर्थातच कुठल्यातरी जनुकीय म्युटेशनमुळे झाले आणि सुदैवाने ( की दुर्दैवाने) संपूर्ण लोकसंख्येत पसरले. ज्या अर्थी हे बदल त्या पूर्ण लोकसंख्येत पसरले त्या अर्थी बहुदा तोपर्यंत होमो सेपियन ही प्रजाती फक्त पूर्व आफ्रिकेतच स्थायिक होती. अर्थात ही प्रक्रिया इतकी साधी नसणार, हे बदल घडत असताना, ही बौद्धिक क्षमता असलेले मानव आणि नसलेले मानव सुरवातीला एकाच कळपात राहत असतील, एकत्र प्रजनन करत असतील. अगदी जनुकीय दृष्ट्या बदललेल्या मानवालाही त्याच्या क्षमतेचा पूर्ण परिचय झालेला नसेल आणि आजूबाजूचे कित्येक लोक त्याला असं काही नसतंच हे समजावून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असावे. एकंदरच "होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक" अशी परिस्थिती असावी. जोवर एका ठराविक संख्येचे लोक या पद्धतीने म्युटेट होऊन बदलले नाही तोवर ही बौद्धिक क्षमता फारशी उपयुक्त ठरू शकली नसावी. ही गोष्ट अजून नीट समजून घेण्यासाठी आपल्याला नुकत्याच घडून गेलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीच उदाहरण घेता येईल. नव्वदच्या दशकानंतर या क्रांतीला खरा वेग आला कारण त्याआधी समाजातील बहुसंख्य वर्ग कॉम्प्युटर म्हणजे काय, त्याच लॉजिक काय याबद्दल अनभिज्ञ होता, एकदा एका विशिष्ट संख्येत लोकांना हे लॉजिक लक्षात आल्यावर मग पुढचा प्रवास सोपा झाला. लक्षात घ्या की, मानवी इतिहासात शारीरिक पातळीवर झालेली ही शेवटची क्रांती ( आत्ता आपण परत शारीरिक क्रांती शृंखलेच्या अगदी तोंडावर आहोत, पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी), त्यानंतर झालेल्या सगळ्या मोठ्या उलाढाली मग ती शेतकी क्रांती असो वा औद्योगिक, या मानवी समाजाच्या आणि विचारांच्या पातळीवर झाल्यात. मेंदूतील हा बदलही काही सहजसोपा आणि फक्त चांगलाच होता असं नव्हे, या बदलामुळे आपण आजही अशा काही रोगांना बळी पडतो जे फक्त मानवालाच होतात. उदाहरणार्थ, विस्मरणाचा आजार(पार्किन्सन्स) किंवा ऑटिसम. पण अर्थातच या क्रांतीचे फायदे जास्त होते, त्यातले लगेच उपयोगी ठरलेले आणि महत्वाचे फायदे आपण पाहू. ढोबळमानाने पाहता होमो सेपियन, त्या बौद्धिक क्रांतीनंतर एक गोष्ट इतर मानव वंशीयांपेक्षा जास्त चांगलं करू लागले, ते म्हणजे समूह बांधणे आणि तो मोठा करणे, तसच अनेक सुट्ट्या सुट्ट्या कळपातही एक सलग सुसूत्रता राखणे.. हे नक्की कसं झालं असावं? आपण मागील भागात बघितलं की लांडगे, रानकुत्रे, वानर यांचे अत्यंत सुसूत्रपणे बांधलेले कळप एका विशिष्ट संख्येपेक्षा मोठे झाले की फुटतात, कारण कळपात राहण्यासाठी, जिथे प्रश्न जगण्या मरण्याचा असतो तिथे, ज्या परस्पर सामंजस्याची गरज असते ते एक विशिष्ट संख्या असेपर्यंतच शक्य होतं. याच कारणासाठी सैन्यात एका तुकडीत ठराविक संख्येपेक्षा जास्त सैनिक ठेवत नाहीत. एका विशिष्ट संख्येनंतर परस्परातील बंध विरळ होतं जातात, आणि हळूहळू कळपात उभी फूट पडते. हेच तत्व मानववंशातील सगळ्या सजीवांना लागू होत, सत्तर हजार वर्षापूर्वी आधुनिक होमो सेपियनाने यात फक्त दोन बदल घडवून आणले.. बघुयात कोणते ते.. पहिला बदल होता तो कळपाच्या गणसंख्येत, जो शक्य झाला गॉस्सीपिंगमुळे.. आधी गॉसिपिंग म्हणजे काय ते समजून घेऊ.. बऱ्याचदा आपण दोन मुंग्यांना एकमेकींशी रासायनिक भाषेत बोलताना बघतो. हे संभाषण अत्यंत प्रार्थमिक पातळीवर असतं. जास्त विकसित प्राणी त्यापेक्षा बरंच जास्त बोलतात. दोन चिंपांजी एकमेकांना बऱ्याच गोष्टी सांगू शकतात, मग ते अन्न असो, एखादी शारीरिक इजा असो किंवा मादीवर स्वतःच्या अधिकाराची घोषणा असो..दोन चिंपांजी एकमेकांना एकमेकांबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतात, पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत, हा तिसरा चिंपांजी कसा आहे, त्याचे चांगले वाईट गुण कोणते, तो एखाद्या परिस्थितीत कसा वागेल ह्या बद्दल हे दोन चिंपांजी तिसऱ्याच्या अनुपस्थितीत कधीच बोलू शकत नाही. होमो सेपियन मात्र गॉसिप अत्यंत परिणामकारकपणे करू शकतो. हे गॉसिप त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल या दोघांची मतं ठरवण्याचे काम करते.. समजा दोन चिंपांजिंमध्ये काही खास बॉण्ड तयार करायचा असेल तर त्यांना एकमेकांना कुरवाळत, जवळ घेऊन बसावं लागेल. या पद्धतीला प्रचंड मर्यादा आहेत, म्हणजे एका वेळी तुम्ही एकाशीच स्पर्शातून संवाद साधू शकता. दिवसभरातील इतर सगळ्या जबाबदाऱ्या, संरक्षण, अन्न, मैथुन इत्यादी करून असे तुम्ही किती जणाना कुरवाळणार? याच मर्यादेमुळे हे समूह एका संख्येपेक्षा जास्त वाढू शकत नाहीत. भाषेचं आणि त्यातही गॉसिपच तसं नाही. दोन व्यक्ती एकाच वेळी अनेकांबद्दल बोलू शकतात. त्यातून त्या व्यक्तीचे तिसऱ्याद्दल मत तयार होते. ते त्या व्यक्तीवर विश्वास टाकावा, दूर रहावे की त्याला मारून टाकावे हे ठरवू शकतात. अर्थातच या पद्धतीने समूहातील बंध अधिक घट्ट आणि ठसठशीत होतात. समूहाच्या नैतृत्वाची उतरंड तयार करण्यात या गॉसिपचा प्रचंड मोठा हात असतो. विश्वास बसत नसेल तर राहुल गांधींना विचारा. पण तरीही गॉसिप करून किती मोठा समूह एकसंध ठेवता येईल याला मर्यादा आहेत, शास्त्रीय दृष्ट्या एकाच समुदायात, 150 पेक्षा जास्त लोकांबद्दल तुम्हीं परिणामकारक कुचाळक्या नाही करू शकत. जिथे ही मर्यादा संपली तिथेच मानवी मेंदूच्या दुसऱ्या एका अचाट शक्तीचा उदय झाला, तिच्या बद्दल पुढच्या भागात. शैलेंद्र
  • Log in or register to post comments
  • 23541 views

प्रतिक्रिया

Submitted by तुषार काळभोर on Tue, 05/09/2017 - 20:56

Permalink

तिथेच मानवी मेंदूच्या दुसऱ्या एका अचाट शक्तीचा उदय झाला, तिच्या

तिथेच मानवी मेंदूच्या दुसऱ्या एका अचाट शक्तीचा उदय झाला, तिच्या बद्दल पुढच्या भागात.
पुढील भागाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Tue, 05/09/2017 - 21:04

Permalink

आता पुढचा भाग २ आठवड्यात आला

आता पुढचा भाग २ आठवड्यात आला नाही तर या आयडीचे घर उन्हात बांधण्यात येईल. - हुकुमावरुन..
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 05/10/2017 - 21:19

In reply to आता पुढचा भाग २ आठवड्यात आला by अस्वस्थामा

Permalink

हा हा हा

हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Tue, 05/09/2017 - 21:23

Permalink

प्रचंड आवडतेय ही लेखमाला.

प्रचंड आवडतेय ही लेखमाला. हाही भाग जबरदस्त. पुढचे भाग जरा पटापटा येऊ द्या हो.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 05/11/2017 - 12:15

In reply to प्रचंड आवडतेय ही लेखमाला. by पद्मावति

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 05/09/2017 - 21:46

Permalink

मस्त!

या भागाची जरा वाट बघावी लागली पण चीज झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 05/09/2017 - 22:20

Permalink

ग्रेट!

ग्रेट!
  • Log in or register to post comments

Submitted by इडली डोसा on Wed, 05/10/2017 - 03:21

Permalink

अतिशय सुंदर मालिका

जरा मोठे लेख लिहा प्लीज, लगेच संपल्यासारखे वाटतायेत आणि मनाचं समाधन होत नाहिये =)
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 05/10/2017 - 21:16

In reply to अतिशय सुंदर मालिका by इडली डोसा

Permalink

नक्की प्रयत्न करतो

नक्की प्रयत्न करतो
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on Wed, 05/10/2017 - 10:30

Permalink

छान भाग झाला

प्रतिक्षा संपली. छान भाग झाला. पुभालटा
दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे जी एक बौद्धिक क्रांती साधारण ७०००० वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं ती नक्की काय होती हे आपल्याला आज केवळ तर्काने जाणून घ्यावं लागेल.............
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 05/10/2017 - 20:58

In reply to छान भाग झाला by दीपक११७७

Permalink

जोवर काही निश्चित पुरावा मिळत

जोवर काही निश्चित पुरावा मिळत नाही, तोवर तर्कच
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on Wed, 05/10/2017 - 21:46

In reply to जोवर काही निश्चित पुरावा मिळत by शैलेन्द्र

Permalink

मावंशा लोकं

मावंशा लोकं पुराव्या शिवाय काहिच बोलत नाही, असे काही दिवसा पुर्वी खुपदा वाचले होते, म्हणुन. बाकी विशेष काही नाही. विज्ञानाची सुरुवात तर्कानेच झाली आहे...... मावंशा # मानव वंश शास्त्रज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 05/11/2017 - 12:16

In reply to मावंशा लोकं by दीपक११७७

Permalink

कोणत्याही शास्त्रात

कोणत्याही शास्त्रात पुराव्याशिवाय तर्क करत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on गुरुवार, 05/11/2017 - 12:32

In reply to कोणत्याही शास्त्रात by शैलेन्द्र

Permalink

हुं

स्वतःलाच contradict करताय.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 05/11/2017 - 14:59

In reply to हुं by दीपक११७७

Permalink

तर्क म्हणजे काय?

तर्क म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on गुरुवार, 05/11/2017 - 15:33

In reply to तर्क म्हणजे काय? by शैलेन्द्र

Permalink

दुसरी आणि त्याहून महत्वाची

दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे जी एक बौद्धिक क्रांती साधारण ७०००० वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं ती नक्की काय होती हे आपल्याला आज केवळ तर्काने जाणून घ्यावं लागेल.............
जोवर काही निश्चित पुरावा मिळत नाही, तोवर तर्कच
कोणत्याही शास्त्रात पुराव्याशिवाय तर्क करत नाहीत.
स्वतःलाच contradict करताय. वरिल block quote केलेले सर्व विधान आपलेच आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 05/11/2017 - 16:25

In reply to दुसरी आणि त्याहून महत्वाची by दीपक११७७

Permalink

असो, वादासाठी वाद घालण्यात

असो, वादासाठी वाद घालण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 05/25/2017 - 23:23

In reply to दुसरी आणि त्याहून महत्वाची by दीपक११७७

Permalink

अहो...१००% पुरावे नसतात. काही

अहो...१००% पुरावे नसतात. काही संकेत असतात त्यावरुन तर्काने जुळणी करावी लागते. जसं ते दृश्यम मध्ये नाही का तब्बूला अखेर सगळा मामला तर्काने लक्षात येतो पण पुरावा नसल्याने गप्प बसावे लागते तसंच काहीसं.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 05/10/2017 - 14:42

Permalink

वाचतोय काही शंका आहेत पण

वाचतोय काही शंका आहेत पण कदाचित आपल्या पुढील भागातून माहिती येईल म्हणून सध्या तरी मुक वाचन. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 05/10/2017 - 20:56

In reply to वाचतोय काही शंका आहेत पण by माहितगार

Permalink

विचारा, उत्तर देण्याचा

विचारा, उत्तर देण्याचा प्रयत्न करतो
  • Log in or register to post comments

Submitted by संचित on Wed, 05/10/2017 - 16:26

Permalink

समूहाच्या नैतृत्वाची उतरंड

समूहाच्या नैतृत्वाची उतरंड तयार करण्यात या गॉसिपचा प्रचंड मोठा हात असतो. विश्वास बसत नसेल तर राहुल गांधींना विचारा
:) :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Wed, 05/10/2017 - 17:47

In reply to समूहाच्या नैतृत्वाची उतरंड by संचित

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 05/10/2017 - 19:32

Permalink

आवडला हा पण भाग . पुभाप्र...

आवडला हा पण भाग . पुभाप्र...
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Wed, 05/10/2017 - 20:21

Permalink

कालच

कालच कुठेतरी एक नवीन मानवसदॄश्य सांगाडा सापडल्याची बातमी वाचली. त्यामुळे होमो सेपियन थियरीचा पुनर्विचार करावा लागेल असा काहीसा सूर होता.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 05/10/2017 - 21:17

In reply to कालच by रामपुरी

Permalink

लिंक आहे का?

लिंक आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on Wed, 05/10/2017 - 21:38

In reply to लिंक आहे का? by शैलेन्द्र

Permalink

लिंक आहे का?

लिंक आहे का? असेल तर द्या
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 05/11/2017 - 13:02

In reply to लिंक आहे का? by शैलेन्द्र

Permalink

हि घ्या लिंक

लिंक
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on गुरुवार, 05/11/2017 - 14:41

In reply to हि घ्या लिंक by अर्धवटराव

Permalink

धन्यवाद अर्धवटराव जी

धन्यवाद अर्धवटराव जी. वाचतो मग ............
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 05/11/2017 - 15:00

In reply to हि घ्या लिंक by अर्धवटराव

Permalink

सकाळच्या पत्रकाराने

सकाळच्या पत्रकाराने नेहमीप्रमाणे गोंधळ घातलाय
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on Tue, 05/23/2017 - 19:38

In reply to सकाळच्या पत्रकाराने by शैलेन्द्र

Permalink

Humans originated in Europe,

Humans originated in Europe, not Africa: study dated 23/5/2017 India today http://indiatoday.intoday.in/story/humans-originated-in-europe-not-africa-study/1/960826 वरिल लिंक वचावी _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on Tue, 05/23/2017 - 19:39

In reply to सकाळच्या पत्रकाराने by शैलेन्द्र

Permalink

India today

Humans originated in Europe, not Africa: study dated 23/5/2017 India today http://indiatoday.intoday.in/story/humans-originated-in-europe-not-africa-study/1/960826 वरिल लिंक वचावी _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 05/18/2017 - 22:44

In reply to हि घ्या लिंक by अर्धवटराव

Permalink

हे वाचा. त्यासंबधीच्या बहुतेक

@अर्धवटराव, हे वाचा. त्यासंबधीच्या बहुतेक गोष्टी स्पष्ट होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by मंजूताई on गुरुवार, 05/11/2017 - 12:59

Permalink

छान

वाचतेय.... पुभा लवकर टाका...
  • Log in or register to post comments

Submitted by इडली डोसा on गुरुवार, 05/18/2017 - 22:12

Permalink

पुढचा भाग कधी?

लवकर येऊ दे, वाट पाहणे चालु आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बरखा on Mon, 05/22/2017 - 10:57

Permalink

हा भाग पण आवडला

सगळे भाग वाचले आहेत. हा भाग पण छान झालाय. पुढ्च्या भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on Tue, 05/23/2017 - 22:17

Permalink

Europe was the birthplace of mankind, not Africa, scientists..

Europe was the birthplace of mankind, not Africa, scientists find http://www.telegraph.co.uk/science/2017/05/22/europe-birthplace-mankind-not-africa-scientists-find/#comments
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 05/24/2017 - 09:34

In reply to Europe was the birthplace of mankind, not Africa, scientists.. by दीपक११७७

Permalink

सत्य बाहेर येईलच, आणि तेंव्हा

सत्य बाहेर येईलच, आणि तेंव्हा ते नक्की स्वीकारलं जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on Wed, 05/24/2017 - 10:39

In reply to सत्य बाहेर येईलच, आणि तेंव्हा by शैलेन्द्र

Permalink

हम्म......

हम्म......
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Wed, 05/24/2017 - 07:55

Permalink

फारच आवडत आहे ही लेखमाला.

फारच आवडत आहे ही लेखमाला.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 05/24/2017 - 13:35

Permalink

महाराज दरबारी ताटकळलेत...

महाराज दरबारी ताटकळलेत...
  • Log in or register to post comments

Submitted by विचित्रा on Fri, 05/26/2017 - 09:37

Permalink

रोचक लेखमाला

पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा पाटील on गुरुवार, 06/01/2017 - 14:13

Permalink

या विषयावरचे Yuval Harari

या विषयावरचे Yuval Harari यांचे पुस्तक ' A Brief of Humankind - Sapiens' उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 06/15/2017 - 10:34

In reply to या विषयावरचे Yuval Harari by विशाखा पाटील

Permalink

+11

+11
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Fri, 06/09/2017 - 10:26

Permalink

पुढचा भाग कधी??

पुढचा भाग कधी??
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Fri, 06/09/2017 - 23:37

Permalink

एक शंका ...

लेख छान आणि माहितीपूर्ण आहे. पुढील भागासाठी उत्कंठा वाढली आहे. तुमच्या लेखात काही वाक्ये अशी आहेत. - 'दोन चिंपांजी एकमेकांना बऱ्याच गोष्टी सांगू शकतात, मग ते अन्न असो, एखादी शारीरिक इजा असो किंवा मादीवर स्वतःच्या अधिकाराची घोषणा असो......................... 'पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत' इथे दोन चिम्पान्झी 'तिसर्याच' मादी चिम्पान्झी विषयी बोलत आहेत, नाही का ? मग दोन चिम्पान्झी तिसर्या चिम्पान्झी विषयी गप्पा मारू शकत नाहीत हे विधान कितपत बरोबर आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on Mon, 06/12/2017 - 15:53

In reply to एक शंका ... by सौन्दर्य

Permalink

बहुदा कधीही

'पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत'
वरिल वाक्यात बहुदा कधीही हा शब्द अश्या प्रश्नांन पासुन बचाव करण्यासाठी केला आहे. हे वेगळ सांगाव लागेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 06/15/2017 - 10:26

In reply to बहुदा कधीही by दीपक११७७

Permalink

"बहुदा कधीही" हा शब्दप्रयोग

"बहुदा कधीही" हा शब्दप्रयोग ज्ञान किंवा माहितीची अपूर्णता दर्शवतो, प्रश्नांपासून बचाव नव्हे. विज्ञानाला ही अपूर्णता मान्य कराविच लागते. तुमच्या माहितीसाठी, नुकताच मोरोक्कोमध्ये होमो सेपियन्ससदृश्य काही अवशेष सापडले, जे 200000 वर्षापेक्षा जुने आहेत, आता या माहितीच्या उजेडात काही गृहीतक नव्याने मांडावी लागतील. त्यामुळे "बहुदा" ला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक११७७ on गुरुवार, 06/15/2017 - 11:15

In reply to "बहुदा कधीही" हा शब्दप्रयोग by शैलेन्द्र

Permalink

काय संबंध

नुकताच मोरोक्कोमध्ये होमो सेपियन्ससदृश्य काही अवशेष सापडले, जे 200000 वर्षापेक्षा जुने आहेत, आता या माहितीच्या उजेडात काही गृहीतक नव्याने मांडावी लागतील
काही गृहीतक नव्याने मांडावी लागतील यासाठी "बहुदा कधीही" हा शब्द प्रयोग केला असेल हे पटण्यासारखे नाही असो. सांगडे याआधीपण चीक्कार मिळाले आहेत. "बहुदा कधीही" या शब्द प्रयोगासाठी हा नुकताच सापडलेला सांगडा कारण नसावा.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 06/15/2017 - 11:27

In reply to काय संबंध by दीपक११७७

Permalink

साहेब, मला मिपा वर 9 वर्ष

  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 06/15/2017 - 11:27

In reply to काय संबंध by दीपक११७७

Permalink

साहेब, मला मिपा वर 9 वर्ष

  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com