हरवले सापडले : एक विलक्षण अनुभव
दिनांक ७ मे २०१७ वेळः साधारण रात्रीचे ८-३०
गेल्या काही तासांपूर्वीच ही घटना घडलेली आहे. पायाखालची जमीन सरकणे,जग स्वत:भोवती फिरणे पासुन ते हॅपी एंडीग पर्यंतचा विल्क्षण अनुभव ह्या घटनेने दिला. व दरम्यान देवावरची श्रध्दा अजुन मजबुत झाली.
झाले असे कि आज रविवार व घरी एकटा असल्याने संध्याकाळच्या जेवणाची सोय करण्यासाठी बाहेर पडलो.मागच्या महीन्याचे रेंटचे पैसेही घरमालकाला द्यायचे होते.रक्कम दहाहजारावर होती. पण आधी बाहेरची कामे उरकु व नंतर पैसे देऊ असा विचार करुन रक्कम पाकिटात ठेवली. जाताना नेहेमीप्रमाणे बर्म्युडा टी शर्ट अश्या टिपिकल घरगुती पेहेरावात गेलो. होण्डा अॅक्टीवा काढली. थोडा रिमझिम पाऊस पडत होता. तसाच बाहेर निघालो. बी.टी.एम मधल्या रोटी मने मधुन काही ज्वारीच्य भाकर्या घेतल्या व परत घरी निघालो. मध्येच विचार आला भाकरी सोबत कांदा लिम्बु असले तर मजा येईल जेवताना. रस्त्यात दिसणारी होपकॉम ची दुकाने टाळली व घराशेजारच्या रस्त्यावर काही ठेले आहेत तिथुन्च खरेदी करावी असा विचार केला. पाऊस थोडा थोडा पडतच होता व काही भागामध्यी वीज ही गेली होती. घराजवळच्या ठेल्याजवळ आलो व लिंबु खरेदी करण्यासाठी पाकिट काढायला खिशात हात घातला आणि हादरलो. खिशात पाकिट नव्हते.डिकिमध्ये चेक केले तिथेही नव्हते. अगदी हवालदील झालो. गाडीच्या चाकाखालची व माझ्या पायाखालची जमीन हादरणे म्हणजे काय प्रकार असतो तो अनुभव आला.खरेतर ह्य बर्य्मुडाचा खिसा तसा पाकिटाआठी अपरा होता व पाकिट पडु नये म्हणुन नेहेमी खबरदारी घ्यायचो पण ह्यावेळेला वेधळेपणा व अतिआत्मविश्वास दोन्हीही नडले. स्वतःवरच चरफडलो.तसाच परत आलेल्या मार्गावरुन गेलो. रस्त्यामधेय अगदी काळजीपूर्वक पाहत जसा आलो त्याच मार्गाने जात राहिलो. पाकिट कुठेही नव्हते. पुन्हा रोटी मने मध्ये आलो. तिथेही विचारले. नव्हते. परंतु ह्या दरम्यान मिपावरच हरवलेल्या वस्तु सापडण्यासाठीचा कार्तवीर्याजुनाचा मंत्र वाचला होता व मी सश्रध्द असल्याने साधारणप्णे रोज एकदा तरी असाच म्हणत होतो त्याचे आवर्तनावर आवर्तन चालु केले. ह्या मंत्राचा आधीही विलक्षण अनुभव आला होता. परंतु ह्यावेळेला परिस्थिती अगई बिकट होती. पाकिटात साधारण १२ ते १३ हजारापर्यंतची रक्कम होती. सोबत क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड्स, लायसन्स, पॅन कार्ड वगैरे तत्सम गोष्टीही होत्या. गोष्ट पैश्यांची तशी नव्व्हती पण हे कार्ड ब्लॉक करणे पुन्हा नवीन कार्डासाठी विनंती करणे त्याचे सोपस्कार + पोलिस कंम्प्लेट ह्या गोष्टी ताण वाढवणार्या होत्या. मंत्रोच्चारण चालुच होते. आता काय करु शकतो ह्याचा विचार केला. आधी घरी जाऊन जेवावे मग पोलिस कंप्लेट करावी असा विचार केला. व मग घराकडे वळलो. घरापाशी जाणार्या लेन मधेय शिरलोच तेवढ्यात फोन वाजला. उचलला. पलिकडुन कन्नड मध्ये एक व्यक्ती बोलत होती.
योगेशचा फोन आहे का म्हणुन.?
होय. मी योगेशच.
कुठे आहात?
माझे पाकिट मिळाले का? - माझ्यातोंडुन अनवधानाने बाहेर पडले.
हो.कुठे अहात.?
अमुक अमुक ठिकणी. पण तुम्ही अहे तिथेच थांबा मी तिथे येतो. तुम्ही कुठे आहात.
तमुक तमुक ठिकाण. - हे ठिकाण माझ्या घरापासुन काही पावलांच्या अंतरावर होते.
जीव भांड्यात पडला. देवाचे मनोमन आभार मानले.मंत्रोच्चारण चालुच होते.
तसाच जिथे बोलावलो तिथे गेलो. काही सेकंदान्तर पुन्हा फोन आला. ती व्यक्ती तिथेच होती. एकुण चारजण होते. तिशीच्या आतले तरुण होते. पहिल्यांदी फोन न्बर कन्फर्म केला व जेव्हा खात्री पटली तेव्हा माझे पाकिट परत केले.
मी काही पैसे देऊ केले तेव्हा त्यांनी विनयाने ते नाकारले. मी म्हणालो पुढच्या आठवड्यात पार्टी देतो.
पाकिट कुठे मिळाले असे विचारल्याव्वर त्यांनी सांगितले कि जेवणासाठी आम्ही बाहेर पडलो तो रस्त्यावर पाकिट पडले होते रक्कम बाहेर पडली होती. आम्ही दुसर्या कोणाची नजर पडण्याअगोदर त्वरीत उचलली व पाकिटात काही माहीती मिळते आहे का ते पाहु लागलो. त्यांना तिथल्या एका आय होस्पिटलचे कार्ड मिळाले जिथे आय-टेस्ट करण्यासाठी अर्धांगिनीने पीडुन पीडुन मला जायला लावले होते. तिथे एक इमर्जन्सी कार्ड बनवले गेले होते व त्यावर माझे नाव व नंबर होता त्यावरुन त्यांनी मला फोन केला. अनेकवेळा त्यांचे आभार मानले. व घरी परत्लो.
पूर्ण घटना साधारण अर्ध्या तासाभरातच घडली असावी. एक्स्ट्रीम टेन्शन ते अगदी ताणरहीत मुकत अवस्था दोन्हीचा अनुभव घेतला.
घरी आल्यावर सर्वप्रथम देवासमोर अगरबत्ती लावली व तुपाचा दिवा लावला. सश्रध्द अंतःकरणाने नमस्कार केला.
बर्याच दिवसांनी एक पॉझिटीव फिलिंग आले होते.
मग पत्नीला फोन लावुन सर्व घटना सांगुन तिचे आभार मानले. ते कार्ड मिळाले नसते तर पाकिट इतक्या सहजगत्या मिळणे अवघड होते.
वडिलांची अध्यात्मात रूची असल्याने घरी वडिलांनाही फोन लावुन अनुभव सांगितला. वडील ही खुश व आनंदीत झाले.
त्यांनाही तो मंत्र पाठवायचा आहे.
घटना तशी अर्ध्यातासाचीच आहे पण तिने पुढील आयुष्यासाठी आवश्यक असलेली देवावरची श्रध्दा बळकट केली आहे.
याद्या
8561
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
पैसे व पाकीट मिळाले हे छान
पाभे भाऊ. होय बेंगलोरमध्ये
In reply to पैसे व पाकीट मिळाले हे छान by पाषाणभेद
विलक्षण अनुभव.. नशीबवान आहात!
मोदका,
In reply to विलक्षण अनुभव.. नशीबवान आहात! by मोदक
नशीबवान आहात!
खेडूतजी, मी ही तसा अंधश्रध्द
In reply to नशीबवान आहात! by खेडूत
तुमच्या श्रद्धेबद्दल आदर आहेच
तुमच्याही मताबद्दल आदर आहे
In reply to तुमच्या श्रद्धेबद्दल आदर आहेच by सतिश गावडे
नशीबवान आहात नक्की!
http://www.misalpav.com/node
येस्स. घाटपांडेसर हाच तो धाग
In reply to http://www.misalpav.com/node by प्रकाश घाटपांडे
मस्त! मंत्राचा धागा बुकमार्क
पाकीट सापडले ते बरेच झाले.
नशीबवान आहात!
गेलेला "पैसा" परत मिळाला.
In reply to नशीबवान आहात! by पैसा
"रुपी" पण परत मिळाले का?
In reply to गेलेला "पैसा" परत मिळाला. by कानडाऊ योगेशु
=))
In reply to "रुपी" पण परत मिळाले का? by रुपी
हा हा. हो "रूपी" पण मिळाले व
In reply to "रुपी" पण परत मिळाले का? by रुपी
झाले ते चांगलेच
In reply to हा हा. हो "रूपी" पण मिळाले व by कानडाऊ योगेशु
२ फेकटर ऑथेंटिकेशन आल्यापासून
In reply to झाले ते चांगलेच by पैसा
हो
In reply to २ फेकटर ऑथेंटिकेशन आल्यापासून by सतिश गावडे
बरं झालं पैसे सापडले.
छान अनुभव !
तर तर...कट्टा झालाच पाहिजे
In reply to छान अनुभव ! by अनिता
एकंदरीत कठीण आहे.
मंत्राचा उपयोग
+११११११ पण फक्त पहिल्या
In reply to मंत्राचा उपयोग by संजय क्षीरसागर