राजकवींना थोबाडाया . . .
एक जमाना होता विशेषतः महाराष्ट्रामधे ज्यावेळी प्रत्येक व्यक्तीला नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या तीन गोष्टी पुरत नसत. पूर्ण नावामागे त्याला एखादे तरी बिरूद जोडावेसे वाटे. त्याशिवाय त्याच्या व्यक्तीमत्वाला किंवा जनमानसातल्या प्रतिमेला पूर्णत्त्वच आल्यासारखे वाटत नसे. उदाहरणे अनेक आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भालाकार भोपटकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, 'काळ'कर्ते शि म परांजपे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे. इथे अनेकांना त्यांनी नेमके प्रबोधन काय केले असा प्रश्न पडू शकतो. पण प्रबोधन हे त्यांच्या वर्तमानपत्राचे नाव होते हे सांगावे लागते. साहित्यसम्राट असे म्हटले की नरसिंह चिंतामण केळकर हे उत्तर सर्वांना ठाऊक असते. पण त्यांचे नेमके साहित्य काय हे मात्र अनेकांना सांगता येत नाही तरीही उल्लेख मात्र साहित्यसम्राट असा केला जातो. लोकनायक बापूजी अणे, लोकमान्यांचे कर्नाटकातले एक अनुयायी होते. त्यांचा उल्लेख कर्नाटकसिंह गंगाधरराव देशपांडे केला जाई. नेमस्तांचे एक नेमस्त पुढारी होते. ते होते मुंबईचा सिंह फिरोजशहा मेहता. लोकमान्य, महात्मा, स्वातंत्र्यवीर अशी बिरुदे कुणीतरी घेतल्यावर काही जणांनी स्वतःच्या नावापुढे दे. भ. लावायला सुरुवात केली. देशभक्त शंकरराव देव. पण दे. भ. न लावणारे देशभक्त नसतात काय हा प्रश्न उरतोच. चित्रपटक्षेत्रामधे कुणी चित्रमहर्षि तर कुणी चित्रपती असतात. आमचे गदिमा महाकवी ग. दि. माडगूळकर होते. शास्त्रीयच नव्हे तर सुगम संगीताच्या क्षेत्रातही काही जणांचा पंडित असा उल्लेख केला जातो. त्यांच्या पांडित्याशी त्या बिरुदाचा काही संबंध असेलच असे नाही. पूर्वी असेच कुणी महात्मा तर कुणी महर्षि होवून गेले. विशेषतः रुळणारी दाढी राखणार्या लोकांना आपसूकच महर्षि, ऋषि किंवा ऋषितुल्य असे बिरुद हटकून मिळते. ते व्यक्तीमत्त्वाने ऋषि असलेच पाहीजेत असे नाही. कुणा एकाचा उल्लेख बालगंधर्व झाल्याबरोबर इतरांनी उरलेली नावे रीजर्व करून टाकली. कुणी कुमार गंधर्व झाले, कुणी छोटा गंधर्व झाले. आजकाल काही आमदार किंवा नगरसेवकांचा कार्यसम्राट इ उल्लेख होतो. लेखक विश्वास पाटील यांचा पानिपतकार असा उल्लेख होतो, तो रास्तही आहे. काही वेळा माणूस छोटा पण त्याचे बिरुद मात्र मोठे असाही प्रकार होतो. आता ही असली बिरुदे नेहमीच लोक देतात असे नव्हे. मनमोहन नातू नावाचे एक कवी होते. त्यांच्या काळात राजकवी म्हणवून घेणारे अनेक जण होते. नातूंना लोककवी म्हटले जात असे. त्यांना कुणीतरी विचारले, हे बिरुद तुम्हाला कुणी दिले ? ते म्हणाले. असे कुणी बिरुद देत वगैरे नसते. आपले आपणच घ्यायचे असते. मग लोकही तसा उल्लेख करायला लागतात. त्यांनी स्पष्टीकरण दिले राजकवींना थोबाडाया लोककवी मी पहीला झालो ! बिरुदे आणि उपाधींबाबत सध्या एवढेच बास !
याद्या
5703
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
बिरुदांची महती सांगणारा आणि
रियासतकार सरदेसाई
In reply to बिरुदांची महती सांगणारा आणि by माहितगार
कुणि बिरुदांची यादी बनवून
लोककवी मनमोहन
लेखात दिलेल्या बहुतेक लोकांनी
In reply to लोककवी मनमोहन by पैसा
या लेखानिमित्ते ....
कुणा एकाचा उल्लेख बालगंधर्व
देवगंधर्व
In reply to कुणा एकाचा उल्लेख बालगंधर्व by पुंबा
हो हो... . क्षमस्व..
In reply to देवगंधर्व by अत्रन्गि पाउस
देवगंधर्व
In reply to कुणा एकाचा उल्लेख बालगंधर्व by पुंबा
राष्ट्रऋषी
लेख छान
दिली बिरुदे हा आयडि कसा वाटतो
In reply to लेख छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स
In reply to लेख छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुण्यात एका फ्लेक्स वर
सचिन तेंडुलकरने भारतरत्न
तसं मिपाकर हे बिरूदही
In reply to सचिन तेंडुलकरने भारतरत्न by बोका-ए-आझम
मराठीहृदयसम्राट आणि
बरेचसे सहकारसम्राट..
लेख आवडला