Skip to main content

आंब्याची शिकरण (दूध आंबा):

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 01/05/2017 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: 5 हापूस आंबे, (हापुसच), दूध अर्धा ली. , साखर दोन चमचे, अगदी थोडे मीठ. aamba कृती: आंबे स्वच्छ धुवावेत. दोन बाजू कापून घ्याव्यात, त्यावर उभ्या आडव्या फोडी होतील अशा सुरीने रेषा माराव्यात. चमच्याने भांड्यात काढून घ्याव्यात. दोन्ही कडा पण कापून त्याच्या फोडी करून घ्याव्यात . कोयीचा रस काढून घ्यावा. दूध न तापवता गार करून घ्यावे. फोडी आणि रस एकत्र करावा. त्यात दूध आणि साखर आणि अगदी चवीला मीठ घालावे. नीट मिक्स करावे. आणि गारेगार खावे. मिठाने दूध नासत नाही, पण जर नको असेल तर नका घालू. चवीला मीठ घातले तर छान लागते. एक नवीन सोपी स्वीट डिश, अजून शाही करायचे तर देताना आईसक्रीम चा गोळा ठेवा. चविनुसार साखर वाढवण्यास हरकत नाही. aamba

वाचने 12679
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

आमच्याकडे बायको ती शिकरण म्हणते मी ते शिकरण म्हणतो. कोब्रा ती शिकरण म्हणतात

ए बाई, असे फोटू दाखवून का त्रास देतेस? कृती चांगली नसायला काय झालय? येऊ का तुझ्या गावात रहायला? आमच्याकडे ही पाकृ पाठवून सिद्ध कर की हा पदार्थ छान लागतो. अजून इथे बाजारात पुरते पिकलेले आंबे आले नाहीयेत. मागील अठवड्यात सहा मेक्सिकन आंबे आणले. दोन बरे निघाले. उरलेल्या चारांचा मुरांबा करावा लागला. तुझी आठवण अश्यावेळी येतेच!

छान पाकृ! पण मला पहिलाच फोटो इतका आवडला की माझी त्यानंतर शिकरण बनवायला आंबेच राहणार नाहीत. :)