✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निशाचर

ज
जव्हेरगंज यांनी
Tue, 05/02/2017 - 11:15  ·  लेख
लेख
वेताळभैरवाचा नगारा वाजला. घोंघावतं वारं झोपडीत शिरलं. रातकिडे किर्रर्र. कंदिल ढळत होता. ओसरीत कुत्रं जोरात भुंकलं आणि मी जागा झालो. उठून कवाडामागचं दांडकं हातात घेतलं आणि बाहेर आलो. काळ्याभोर अंधारात जंगल सळसळत होतं. धो धो वाऱ्यानं फुफाटा डोळ्यात जात होता. तुळशीच्या ओट्यावर बसूनच कुत्रं भुंकलं होतं. कंदिलाची वात वाढवून चौफेर नजर फिरवली. कडब्याच्या गंजीजवळ चमकणारे दोन डोळे दिसले आणि एक थंड शिरशिरी अंगावर धावून गेली. ते हिंस्त्र डोळे होते. उग्र लालबुंद झालेले. एक भयाण सावली. हा भास तर नाही? कंदील उंचावत मी सावध गंजीकडं चालत गेलो. मिणमिणत्या प्रकाशात आता ती सावली अधिकच अवाढव्य होत चालली. एका बधीर जाणिवेने मी चालत गेलो कितीतरी दूर. दूर डोंगरावर पेटलेल्या दोन शेकोट्या मला दिसत होत्या. अवाढव्य काळा पहाड एखाद्या राक्षसासारखा विशालकाय भासत होता. हा भास होता हे जाणून मला बरे वाटले. कंदील विझवून मी पाहत राहिलो चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या दऱ्याखोऱ्या. खोल खोल गेलेल्या. मग बोचऱ्या थंडीत भटकत राहिलो त्या घनघोर अंधारात. रातकिड्यांच्या किर्रर्र आवाजात शेवटी परत फिरलो. घोंघावत्या वाऱ्यात भलीमोठी गंज सळसळत होती. तिच्या आडोश्याला उभा राहून मी पाहिलं एक जुनाट छप्पर. त्याच्या समोर होती एक दगडी तुळस आणि एक दगडी कुत्रं. दूर डोंगरावर वेताळभैरवाचा नगारा वाजला. एकाकी कुत्रं भुंकलं. एक थंड शिरशिरी अंगावर धावून गेली. मी जागीच गारठून गेलो. त्या कुत्र्याच्या जवळंच उभी होती एक भयाण सावली. तिचे डोळे हिंस्त्र होते. उग्र आणि लालबुंद झालेले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
7080 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

भन्नाट !!!!!!!!!

मितान
Tue, 05/02/2017 - 14:38 नवीन
भन्नाट !!!!!!!!! तुमच्या कथांमधली वातावरण निर्मिति जबरदस्त असते !
  • Log in or register to post comments

वातावरण निर्मिती

वरुण मोहिते
Tue, 05/02/2017 - 14:41 नवीन
हा प्रकार जव्हेरगंज सरांकडून शिकावा. आवडलं
  • Log in or register to post comments

वा! या कथेतली कलाटणी भारी आहे

एस
Tue, 05/02/2017 - 15:22 नवीन
वा! या कथेतली कलाटणी भारी आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिली आहे

सुखी
Tue, 05/02/2017 - 15:31 नवीन
छान लिहिली आहे
समोर होती एक दगडी तुळस आणि एक दगडी कुत्रं.
दगडी म्हणजे निसचेत कि झोपलेला हे कळला नाही
  • Log in or register to post comments

निसचेत

जव्हेरगंज
Tue, 05/02/2017 - 17:49 नवीन
निसचेत कुत्र्याच्या आकारात कोरलेली दगडी मुर्ती असं काहीतरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

मैं कौन हू? क्या मैं वो ही हू...

निशाचर
Tue, 05/02/2017 - 15:55 नवीन
आवडली गोष्ट!
  • Log in or register to post comments

आमचा बालिश प्रश्न.

चित्रगुप्त
Tue, 05/02/2017 - 16:49 नवीन
चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या दऱ्याखोऱ्या..... आणि ...... भटकत राहिलो त्या घनघोर अंधारात..... हे एकाच वाक्यात कसे ? की हाच कथेचा आत्मा आहे ? .. कळेना कळेना कळेना ढळेना । ढळे नाढळे संशयो ही ढळेना ।
  • Log in or register to post comments

हो,

जव्हेरगंज
Tue, 05/02/2017 - 17:52 नवीन
हो, पण चंद्रप्रकाशात जंगलात झाडाखाली अंधारंच असणार ना.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

जव्हेरगंज आज कुठे काय तरी

हेमंत८२
Tue, 05/02/2017 - 17:16 नवीन
जव्हेरगंज आज कुठे काय तरी हरवलेले वाटले.. जसे कि ओसरी हि घराला असते आणि तुम्ही सुरवातीला झोपडी म्हंटले आहे. वरती चित्रगुप्त यांनी उजेडाचा उल्लेख केला आहे. आज कंदाची आपण कुठे तरी कमी पडले असे आमच्या बालमनाला वाटते. लहान मुलाचे किती ऐकवायचे हे मोठ्यानं ना सांगणे..
  • Log in or register to post comments

बरोबर,

जव्हेरगंज
Tue, 05/02/2017 - 17:54 नवीन
बरोबर, ओसरी ऐवजी काहितरी वेगळा शब्द हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत८२

आभारी आहे सगळ्यांचा _/\_

जव्हेरगंज
Tue, 05/02/2017 - 17:56 नवीन
आभारी आहे सगळ्यांचा _/\_
  • Log in or register to post comments

छान!

कंजूस
Tue, 05/02/2017 - 18:53 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

मला कळली नाही.

तेजस आठवले
Tue, 05/02/2017 - 19:03 नवीन
मला कळली नाही.
  • Log in or register to post comments

सिंपल आहे!

जव्हेरगंज
Wed, 05/03/2017 - 07:09 नवीन
सिंपल आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

loop चांगलीए .. मस्त

अद्द्या
Wed, 05/03/2017 - 12:28 नवीन
loop चांगलीए .. मस्त
  • Log in or register to post comments

मस्त लेखन .

सिरुसेरि
गुरुवार, 05/04/2017 - 19:16 नवीन
मस्त लेखन . दर अवसेला होणारा वेतोबाचा फेरा आठवला .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा