स्त्रीया आणि कॉपीराईट
लेख शीर्षक स्मजण्यास सोपे जावे म्हणून कॉपीराईट हा शब्द प्रयोग केला असला तरीही या लेखातून एकुणच बौद्धीकसंपदा कायद्यांचा उहापोह करण्याचा मानस आहे. कॉपीराईटमुळे कलाकृती हा शब्द प्रयोग लेखनात पुन्हा पुन्हा वापरला जात असला तरीही सॉफ्टवेअर सारख्या मोठा सेवा उद्योग बौद्धीक संपदा कायदे आणि कॉपीराईट कायद्यांने संरक्षीत पायावर ऊभा आहे हे लक्षात घेऊन मी तर कलाकार नाही मला याचे काय काम असा विचार सुरवातीसच टाळलेला बरा असे वाटते.
सप्तरंगी यांच्या चित्र विषयक माझी काही ट्युलिप्स पेंटिंग्स या धाग्यावर चित्रांवरील कॉपीराईट बद्दल चर्चा करण्याचा योग आला. त्या धाग्यावर चित्रांच्या कॉपीराईट बद्दल माझी चर्चा संपत आली असतानाच कॉपीराईट बद्दल सप्तरंगी यांनी कॉपीराईट बद्दल अधिक माहिती करून घेण्यास उत्सुकता दर्शवल्यामुळे या विषयावर लेख लिहून पहावा असे वाटले.
तुमच्या कलाकृतीवरचा तुमचा कॉपीराईट हि खरेतर तुमची प्रॉपर्टी असते. जंगलातील आदीवासी ज्या जमिनींवर राहतात त्यावाटून घेऊन आर्थीक आधारावर देवाण घेवाण करत नाहीत म्हणून आर्थीक मुल्यवर्धन किंवा आर्थीक विकास होत नाही. मानवी सांस्कृतीक उन्नयन अंशतः आर्थीक प्रगती अवलंबून आहे आणि आर्थीक प्रगतीचे चाक गोष्टींना मुल्य प्रदान करण्यावर आहे. आणि कॉपीराईटची संकल्पना तुम्ही गुंतवलेल्या वेळेवर, कौशल्य आणि बुद्धीमत्तेवर जी कलाकृती निर्माण होते त्याला मुल्य प्रदान करण्याचा अधिकार देते जेणे करून तुमच्या कलाकृतीचा वापर आणि वितरण कसे आणि कोणत्या कोणत्या किमतीने केले जावे याचा कलाकृतीचा निर्माता निर्माती म्हणून तुम्हाला कायद्याच्या बळावर मर्यादीत का होईना महत्वपूर्ण अधिकार मिळत असतो. त्यामुळे बौद्धीक संपदा कायद्यांची केवळ सजगता नव्हे तर सक्रीय वापर केवळ व्यक्तिगत नव्हे तर सामुहीक आर्थीक आणि सांस्कृतीक विकास चक्राला गती देण्यास साहाय्यभूत होऊ शकतो.
कलाकृतीच्या निर्मितीत आणि बौद्धीक संपदा कायद्यात मुलतः स्त्री पुरुष असा भेद नसतो. परंतु विवीध व्यक्तिगत अथवा सामाजिक परिस्थितींमुळे बहुतांश स्त्रींयांना ऑर्गनाईज्ड सेक्टरच्या संधी उपलब्ध होत नाहीत अथवा विवीध कारणांनी वयाच्या एखाद्या टप्प्यावर त्या सुटतात. त्या मुळे बर्याच स्त्रीयांना स्वयं रोजगाराच्या विवीध मार्ग चोखाळावे लागतात (-रोजगार हा शब्द खटकत असेल तर पर्यायी शब्द काय वापरावा ते वाचकांनी सुचवावे). स्त्रीयांकडून स्विकारल्या जात असलेल्या स्वयंरोजगारांमध्ये कौशल्य तंत्रज्ञान आणि मार्केटींग विक्री वितरणाच्या लागणार्या सॉफट्स्कीलच्या कमतरता जसे त्यांच्या उत्पन्नावर मर्यादा आणतात तसेच बौद्धीक संपदा कायद्यां बद्दल सजगतेचा व सक्रीय वापराचा अभावही त्यांना शक्य असलेल्या मुल्यवृद्धीच्या संधींपासून वंचीत ठेवत असू शकतो. त्यामुळे विवीध बौद्धीक संपदा कायद्यांचा परिचय करून घेणे आणि जिथे स्त्रीयांसाठी सयुक्तीक असे बदल कायद्यांमध्ये करून उत्पन्नाचे मार्ग सुरक्षीत कसे होऊ शकतीले पहाणे उपयूक्त असू शकते.
पहीला प्रकार पारंपारीक कलाकौशल्यांचा
स्त्रीयांच्या कलाकृती कार्यात बर्याच पारंपारीक कलांचाही समावेश होतो जसे लोकगीत प्रकारातील नवी काव्य रचना समजा कुणी गरबा नृत्यासाठी लिहिली तर त्याचा कमर्शिअल उपयोगही होऊन जाईल पण मूळ काव्य लेखीकेला काही उत्पन्न मिळेलच असे नाही किंबहूना बहुतेक वेळा ते मिळतच नसावे कारण सर्वसामान्य जनतेला ते जुने लोकगीत नाही हे कळण्यासही मार्ग नसतो कमर्शिल प्रेझेंटरची त्यावेळेस सजगतेने मूळ कविस / संगितकारास मोबदला देण्याची मुख्य जबाबदारी असते पण एकुणच सामाजिक कायदे विषयक सजगतेचा आणि कायदेविषयक सक्रीयतेच्या अभावामुळे मूळ कलाकारास आपल्या उत्पन्नाच्या अधिकारांपासून मुकावे लागते. अशाच बाबी रांगोळी मेंदी अशा बाबतीत दाखवता येतील कि साप्ताहीके मेंदी किंवा रांगोळी विशेषांक काढताना मूळ कलाकाराची कलाकृती नवी असेल तर त्यास मोबदला पोहोचवतात का ? किंवा लग्नात कमस्रिअली मेंदी काढून घेतली तर मेंदी काढणार्या व्यक्तिस उत्पन्न मिळतेही पण मेंदीचे मूळ डिझाईन समजा नवीन आहे तर त्या मेंदीचे नवीन डिझाईन करणार्यास उत्पन्न मिळते का ? कार्पोरेट किंवा अगदी राजकीय कार्यक्रमासाठी कमर्शीअली पे करून रांगोळी काढून घेतली गेली तर डेकोरेटर ला पैसे मिळत असणार पण रांगोळीचे डिझाईन नाविन्यपूर्ण असेल तर त्याचा मोबदला डेकोरेटर रांगोळीचे नावीन्य पूर्ण डिझाईन बनवणार्या व्यक्तीस पोहोचवतो का ? लग्नासाठी कुणी नवे मंगलाष्टक रचले आणि लग्नांमध्ये वापरण्याआधी त्याचा मोबदला रचनाकाराकडे पोहोचवला जातो का ? शेवटी काही अंशी सांस्कृतीक प्रामाणिकतेचाही प्रश्न आहे. 'हॅपी बर्थ डे टू यू' सारख्या छोट्या काव्य पंक्तीची म्हणण्याच्या पद्धतीवर अगदी आत्ता आत्ता पर्यंत कॉपीराईट होता रेस्टॉरंट सारख्या पब्लिक प्लेसवर कार्यक्रम झाल्यास सबंध युरोमेरीकन मूळ संगितकारांच्या वंशजांना त्यांचा पैसा रितसर पोचता करत. पण आपल्याकडे याचे सर्वसाधारणपणे उत्तर नकारार्थी येते. कला पारंपारीक स्वरुपाची असेल तर तुमची कला नविन वेगळी ओळखू यावी आणि नव्या कलेचे रजिस्ट्रेशन करता यावे म्हणून जुन्या निर्मितींचे दस्तएवजीकरण करणे जरुरी असते ते अंशतः नियतकालिकांमधून अल्पसे पुस्तकातून होतही असते पण एकतर सर्व पारंपारीक कलांचे दस्तएवजीकरण होत नाही आणि होते ते पुरेसे होते म्हणण्यासारखी परिस्थिती नाही.
पारंपारीक कलांचे उदाहरण बारकावे लक्षात यावेत म्हणून मुद्दाम दिले. पोषाखांवरील नक्षीकामात आणि एकुणच पोषाखांच्या डिझाईन्स मध्ये नव्या रचना करुन कॉपीराईट आणि उत्पन्न मिळवणे शक्य असावे. मग इंटिरीअर देकोरेशन, लँडस्केपिंग आर्कीटॅक्चर, मुर्तीकला इत्यादी व्यवसाय आहेत त्यात नव्या रचनांवर कॉपीराईट राखणे शक्य असावे.
व्यस्ततेमुळे एका बैठकीत लेखन पुर्ण होईल असे दिसत नाही तेव्हा उर्वरीत लेखन क्रमशः
उत्तरदायक्त्वास नकार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
१) पारंपरिक कलेचे कॅापिराइट
उत्तरदायक्त्वास नकारचा दुवा
पारंपारीक कलेचे कॉपीराईट भारता बाहेरील एक संकल्पना आणि मर्यादा
देवगड हापूस ट्रेडमार्क होणार
http://www.ipindia.gov.in/ या
ऐश्वर्या राय आणि अनिल
हां 'ताल' बरोबर. आठवण
उत्तम माहितीपूर्ण लेख
मिपाच्या माध्यामातून
धन्यवाद माहितगार.