नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
या उपक्रमाद्वारे दर महिन्याला एक नवीन मिपाकर आपली 'व्यायामगाथा' घेऊन आपल्याला भेटायला येत राहील. या महिन्यात व्यायामाचा अनुभव सांगत आहे "इरसाल कार्ट"
वाडा सारख्या एका अर्थाने दुर्गम भागात राहून धावण्याला सुरूवात करून आणि एकट्यानेच परंतु कमालीच्या सातत्याने धावत राहून व नितांतसुंदर फोटो टाकून इरसाल कार्ट्याने ग्रुपवरच्या सर्व सायकलवीरांना रोज इनो घ्यायला लावले आहे. ;)
तुमच्याकडेही सांगण्यासारखे कांही असले तर आंम्हाला जरूर व्यनी करा.
टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास.
************************************************
याच आठवड्यात सायकल दामटत पुण्याहून वाड्याला आलो. दोन दिवसात जवळजवळ २०० किमी अंतर पार केले आणि बाईक अँड हाईकची एक अॅक्टिविटी पूर्ण केली. क्रिकेटही खेळू ना शकणारा मी एवढे अंतर पार कसे करू शकलो हा विचार करत गावातील हापिसातील मित्रमंडळी तोंडात बोटं घालत आहेत. पण या प्रवासामागे लै लांबी ष्टोरी आहे, आज तीच सांगावीशी वाटते.
या गोष्टीची सुरुवात होते 'आज मी केलेला व्यायाम' या धाग्यापासून. जवळ जवळ दोन महिन्यांपासून मिपावर दर महिन्याला हा धागा येत होता पण काहीतरी चर्चा असेल म्हणून मी तो वाचण्याचे टाळत होतो. मध्यंतरी याचे विडंबन म्हणून 'आज मी केलेला आराम' हा धागाही येऊन गेला, पण मी तोही वाचला नाही. या धाग्याकडे पुन्हा लक्ष गेले ते जानेवारीच्या अखेरीस. आणि बरेच मिपाकर इथे घाम गळताना बघून (वाचून म्हणा हवं तर) खूप जळायला झालं. खरंतर थंडीच्या या मोसमात मीही मित्रांबरोबर धावण्यासारखे प्रकार केले होते पण अतिशय वेगाने संक्रमित होणाऱ्या आळसापुढे सगळ्यांनी गुडघे टेकले आणि आमचे रोजचे धावणे बारगळले. गावातील एकुलत्या एक जिममध्ये पंचक्रोशीतली अख्खी तरुणाई लोटत असल्यामुळे प्रचंड गर्दी होते त्यामुळे तिथे जायची इच्छा तिसऱ्याच दिवशी उडून गेली आणि पुन्हा सुरु झाले आठ वाजता उठून घाईगडबडीत तयारी उरकून ऑफिसात जाणे आणि दिवसभर खुर्चीत काम करून परतणे, एवढाच दिनक्रम. कधी दोन तीन महिन्यातून केलेला एखादा छोटी ट्रेक आणि रोजचे दोन माजले चढणे उतारणे हाच काय तो व्यायाम. व्यायाम म्हणून काहीतरी करावे असे मनापासून वाटत होते पण श्रीगणेशा काही होत नव्हता. एक तर जोडीला कोणी भिडू मिळत नव्हता त्यात जबरदस्तीने तयार केलेले भिडू त्यांचा आळस वेगाने आपल्यात संक्रमित करतात हा पूर्वानुभव आणि एकट्याने जायचा कंटाळा. हा धागा वाचताना त्याच्या प्रतिसादांमध्ये मिपाकरांचा एक व्हाट्सअप ग्रुपही आहे हे कळले आणि प्रतिसादांमध्येच विनंती केली मला सामावून घेण्याची. लागलीच ग्रुपात सामावून घेतलं गेलं आणि व्यायामासाठी भिडूची गरज उरली नाही. ऑनलाईन एवढे जण भेटले एकदाच. त्यातही बरेच मिपाकर, मग तर अजूनच कल्ला. ग्रुपवर नुसता कल्ला चालू होता. नव्यानेच ग्रुपमध्ये आठवडाभराचे आव्हान स्वीकारण्याची चढाओढ लागली होती. तीन जणांच्या टीम मधून काहींनी रोज ५० किमी तर काहींनी चक्क रोज १०० किमी अंतर सायकलिंगचे आव्हानं स्वीकारले होते. अर्थात मलाही यात सहभागी व्हायचे होते पण एक समस्या होती, सगळी आव्हानं सायकल चालवणाऱ्यांसाठी होती आणि माझ्याकडे सायकल नव्हती. धावणाऱ्यांसाठी काहीतरी करा अशी विनंती केल्यावर मोदक आणि प्रसाद दाते माझ्या मदतीला आले. तिघांनी मिळून आठवडाभर दररोज १० किमी धावण्याचे आव्हान स्वीकारले आणि आमच्या व्यायामाचा श्रीगणेशा झाला. मी, मोदक आणि प्रसाद दातेंनी मिळून रोज पळायला सुरुवात केली. ग्रुपमध्ये सगळेच पेटून उठले होते. आमचे धावणे नियमित चालू असताना तिसऱ्या दिवशी प्रवासात असल्यामुळे मोदकाला धावायला वेळ मिळाला नाही त्यामुळे आमची टीम आव्हानातून बाहेर पडली. आता पुन्हा दोघांनीच मिळून आव्हानं स्वीकारायचे ठरवले आणि ब्रेक न घेता दुसऱ्याच दिवसापासून मी आणि दातेंनी धावायला सुरुवात केली. मी रोज सकाळी नियमीतपणे धावत होतो पण दातेंनी जसा वेळ मिळेल तसे अगदी दुपारीही धावून आमचे आव्हान जिवंत ठेवले. सुरुवातीला सोपे वाटणारे अंतर नंतर नंतर दोघांना भारी पडू लागले. मी आत्ताच धावायला लागलो होतो त्यामुळे लवकर थकत होतो. तरी बरे उन्हाळा सुरु झाला नव्हता. प्रचंड थकायला होत होतं. यावर उपाय म्हणून सलग जास्त न धावत मधले ब्रेक वाढवले. त्यामुळे वेळ वाढला पण ५-७ किमी अंतर धावणे झेपू लागले. आता काही झालं तरी मागे हटवायचे नाही म्हणत दोघेही वेळा सांभाळून पळत होतो. मोदकचे प्रोत्साहन होतेच, दातेंनीही जबरदस्त साथ दिली. एकदा तर चॅलेंज टिकून राहावं म्हणून त्यांनी भर दुपारी कोचीन मध्ये पूर्ण फॉर्मल कपड्यांनिशी लॅपटॉपची बॅग घेऊन तीन किमीचे अंतर धावून पार केले. एवढा सगळा उत्साह भरून वाहत असताना काय बिशाद आमची आळसावण्याची. कधी ५-५ किमी तर कधी ७-३ किमी असे अंतर वाटून घेऊन सलग सात दिवस धावलो आणि आव्हान पूर्ण केलं. आपण आव्हान स्वीकारलं तर कठीण कामही करू शकतो हे तेव्हा नव्याने उमगलं. आता रोज किमान ५ किमी अंतर धावयाचेच असे ठरवून धावणं चालू ठेवलं. कधीतरी दांडी व्हायची पण ग्रुपमधील इतरांचे अटकेपार रोवलेले झेंडे पाहून दुसऱ्या दिवशी नव्या जोशाने धावणं चालू व्हायचं. मधल्या काळात बंधुराजांनाही पिन मारली 'मला सकाळी उठवायला गवारी(गुराखी) लागेल' एवढ्या अटीवर तो आनंदाने तयार झाला. गवाऱ्याची भूमीका मी निभावणार म्हणत दुसऱ्या दिवसापासून त्याला फोन करायला सुरुवात केली. अगदी तिसऱ्या दिवसापासून मी फोन न करताही त्याचेही लांज्यात चालणे सुरु झाले नियमित. इकडे मलाही अजून तीन जण जॉईन झाले. इतरांच्या डोक्यात खूळ घालणं आता जोरात चालू आहे.
खरं सांगायचं तर धावताना आपल्याकडे विचित्र नजरेने बघणाऱ्या लोकांमुळे थोडा अवघडलेपणाही जाणवत होता पण आता मलाच त्यांचं हसू येतं. इकडे लोकांना सायकलींचं किती वावडं आहे ते मोदकला सांगितले तेव्हा तो बोलला होता की "पायोनियर व्हा" तेवढं ध्यानात ठेवून हा सगळा प्रवास चालू आहे.
अश्यातच एक दिवशी डोक्यात विचार आला कि आपणही सायकल घेऊया. लहानपणापासूनच मनसोक्त सायकल अशी चालवायला मिळाली नव्हती आणि मोठे झालो तेव्हापर्यंत 'वाहतुकीचे' साधन म्हणून सायकल हि संकल्पना पंचक्रोशीतुन हद्दपार झाली होती. त्यामुळे सायकल घेण्याचा विचार कधी डोक्यात आला नव्हता. छोटे बंधुराज मात्र रत्नागिरीतील खेड आणि लांज्यात राहिलेले त्यामुळे त्याने हि कल्पना खूप कधीच सुचवली होती, तिकडे कॉलेज करत असताना त्याने सायकल घेतलीही होती. लगेच हि कल्पना त्याला सांगितली. तोही तयार झाला आणि सायकल घ्यायची हे पक्कं झालं.
धावण्याच्या सुरुवात केल्यापासून वजन किती कमी झालं ते नाही बघितलं अजून पण दिवसभराची प्रसन्नता मिळते, आत्मविश्वास दुणावलाय. असंख्य प्रयत्न करूनही झोप ना येण्यामुळं रात्रीच्या निरव शांततेला कंटाळलेला, भर तारुण्यापासून झोपेचे बारा वाजलेला मी आता रात्रीचे दहा वाजले कि पेंगायला लागलोय. शरीराचं घड्याळ पुन्हा सुस्थितीत आलंय. अकारण होणारी छातीतली धडधड थांबलीय. ऍसिडिटी तर पार पळून गेलीय. कधी जाऊ शकलो नाही व्यायामाला तर दिवसभर चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं.
स्वत:लाच नव्याने भेटल्यासारखं वाटतंय.
माझ्या या प्रवासातील काही क्षण...
माझी धावपट्टी अशी दिसते नकाशात. ग्रुपातले मिपाकर याला 'तलवार' म्हणतात. या तलवारीचे दोन वार मला ४.८ किमीला पडतात.
तानसा धरणाकडे जाणारा रस्ता.
डावीकडून मी, सागर, सचिन आणि विश्वास.
माझ्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून दिसणाऱ्या रानवाटा.
धुकं पांघरलेल्या या टेकड्या मला केवळ धावण्याच्या सवयीने गवसल्या.
आधी ह्याच सूर्याची किरणं खिडकीतून चेहऱ्यावर येईपर्यंत लोट पडलेलो असायचो आता घामेजलेल्या चेहऱ्याने मीच त्याचे स्वागत करतो.
माझी धावपट्टी अशी दिसते नकाशात. ग्रुपातले मिपाकर याला 'तलवार' म्हणतात. या तलवारीचे दोन वार मला ४.८ किमीला पडतात.
तानसा धरणाकडे जाणारा रस्ता.
डावीकडून मी, सागर, सचिन आणि विश्वास.
माझ्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून दिसणाऱ्या रानवाटा.
धुकं पांघरलेल्या या टेकड्या मला केवळ धावण्याच्या सवयीने गवसल्या.
आधी ह्याच सूर्याची किरणं खिडकीतून चेहऱ्यावर येईपर्यंत लोट पडलेलो असायचो आता घामेजलेल्या चेहऱ्याने मीच त्याचे स्वागत करतो.
वाचने
31363
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज चौदा किमी सायकल चालवली.
मस्त!
In reply to आज चौदा किमी सायकल चालवली. by एस
मागच्या गुरुवारनन्तर ...
२६ अप्रिल
माझीपण.
In reply to २६ अप्रिल by विटेकर
आज पाच फेर्या
काल २५०. शिवाय पुश अप्स,
In reply to आज पाच फेर्या by विटेकर
आज पाच फेर्या आणि अडिच किमी चालणे
छान वाटलं वाचून. मी पण
काल दांडी आणि आज ५ फेर्या
आज सहा सुर्य्नमस्कार आणि ८ आसने
काका नवीन धाग्यावर टाका ना
In reply to आज सहा सुर्य्नमस्कार आणि ८ आसने by विटेकर
नवीन धागा कुठाय ?
In reply to काका नवीन धाग्यावर टाका ना by वेल्लाभट
http://www.misalpav.com/node
In reply to नवीन धागा कुठाय ? by विटेकर
अफाट कामगिरी
आज ११ मे
हा धागा वाचनमात्र करा हो...