अगदी योग्य शब्दांत वर्णन.
'भिन्न' वाचून मी कितीतरी महिने सुन्न होते. अजूनही...
या विषयाबद्दलची सरकारी आणि सामाजिक पातळीवर अनास्था, झापडे ओढून घेण्याचा दृष्टीकोन आणि रोग्यांची मानसिकता याचा एक वेगळाच आणि थरकापवून सोडणारा आलेख वाचायला मिळतो...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
चांगला परिचय . अशाच पुस्तकांचा परिचय देत जा. व्यक्ती असो वा पुस्तक; परिचय वा शिफारशीत पुर्वग्रह पोषित / दुषित मुल्ये असु शकतात. त्यामुळे प्रत्येकाने वाचुनच ठरवावे.
प्रकाश घाटपांडे
सर्वप्रथम, बर्याच दिवसांनी लिहिते झाल्याबद्दल मुक्तसुनीतचे अभिनंदन. :)
साधारण सहा महिन्यांपूर्वी मेघनाच्या शिफारसीवरून ही कादंबरी विकत घेतली होती. कादंबरी उत्तमच आहे, शंकाच नाही. परिचय अगदी नेटका आणि पूर्ण आहे. 'नी'ने लिहिल्याप्रमाणे वाचून सुन्न झालो होतो.
जरूर वाचण्यासारखी कादंबरी.
बिपिन कार्यकर्ते
साधारण सहा महिन्यांपूर्वी मेघनाच्या शिफारसीवरून ही कादंबरी विकत घेतली होती.
हेच म्हणतो ! :-) भुस्कुटेबाईंचे आणि मिपावरील इतर मित्रमैत्रिणींचे उत्तमोत्तम लिखाण मिळवून वाचण्याकरता , चांगलेचुंगले संगीत ऐकण्याकरता , लज्जतदार खाण्याच्या पदार्थांकरता (आणि आता आपापल्या पीसी च्या , आय पी अड्रेस च्यासुरक्षिततेकरताही ;-) ) उपकार आहेत. पुस्तकांच्या बाबतीत मेघनाबाईंचा लंबर पैला हाय !
आणि एक अतिअवांतर , वैयक्तिक मजकूर : मिसळपाव वर आलो मेघनाबाईंमुळे ! :-)
अवांतर:
"Can one feel gratitude for gratitude?" - Gail Wynand, The Fountainhead (by Ayn Rand)
कसचं कसचं!
पण सध्या माझंच वाचन बोंबललं आहे. मला कुणी नवी ताजी मराठी पुस्तके सुचवील काय?
भिन्न - मी वाचलेली आहे. मन सुन्न होतं. विचार करायला लावणारी कादंबरी आहे. त्यातल्या "पंढरीच्या वारीच्या दिवसांत कंडोमची मागणी वाढते" - हे वाचल्यावर चकीत झालो.
माझ्या या टीचभर लिखाणाला आलेला , दस्तुरखुद्द लेखिकेचा प्रतिसाद इथे चिकटवत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद ...
...
...
... "भिन्न" चा विषय माझ्या दृष्टीने एड्स हा नाहीए. एड्स हे तर केवळ एक निमित्त आहे. त्या निमित्ताने आमचे नातेसंबंध, प्रेम, लग्न, कुटुंब-व्यवस्था, मुळे अशा गोष्टींकडे वेगवेगळ्या स्तरातील बायका कसे पाहतात, याचे ते दर्शन आहे. व्यक्तिगत आयुष्य आणि संस्थात्मक आयुष्य यातील नाते तपासले आहे.
"भिन्न" वर टीका खूप झाली आणि नावाजलीही चांगली गेली. दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया आहेत.
3 महत्वाचे पुरस्कार मिळलेत आणि आता इंग्लीश मधे अनुवाद देखील सुरू झालाय. असे बरे चाललेय एकूण भिन्न चे...! :-)
-------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरीचे मला झालेले आकलन तोकडे आहे आणि माझ्या एकपानी टिपणात कादंबरीच्या वेगवेगळ्या अवकाशांना मी जराही न्याय दिला नाही याची मला जाणीव होतीच. लेखिकेच्या उत्तराने त्यावर शिक्कामोर्तब झाले.
या कादंबरीवर टीकाही झाली आहे हे अंमळ रोचक वाटले. टीकेचा रोख कादंबरीच्या एकूण शैलीवर , रचनेवर असेल तर ते मला (एक वेळ) समजेल. अन्यथा कुठल्या कारणांनी टीका झाली आहे ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.
प्रतिक्रिया
धन्यवाद
अगदी योग्य
वाचायला हवे...
+१
मस्त !
चांगला परिचय
छान परिचय...
+१
अवांतर
थोडक्यात
मुक्तराव,
१+
उत्तम
१+
"भिन्न " नव्हे तर "सुन्न"
छान परिचय
लेखिकेचा प्रतिसाद
अरेवा!
नाही.
भिन्न