नमस्कार मिपाकर्स..
गेले कांही वर्षे सायकल चालवत असल्याने अनेक व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य आहे.. त्यातील एका ग्रुपवर एक मदत संदेश येऊन धडकला.
घर बांधण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरलेल्या बाटल्या हव्या आहेत.
उत्सुकता चाळवली म्हणून या प्रोजेक्टची अधिक माहिती घेतली आणि बांधकाम सुरू आहे तेथे भेटही देऊन आलो.
हा प्रोजेक्ट करणार्या अवालियाचे नांव आहे राजेंद्र इनामदार, सिंहगडाच्या पायथ्याशी एके ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे.
दोन कामगार बाटल्या भरताना..
घराची बाजू - दोन चौकटी आणि एक खिडकी..
बेस (फाऊंडेशन) पासून अशा सळया वर घेतल्या आहेत आणि कोपर्यावर कॉलमसारखे स्ट्रक्चर करून मजबुती वाढवली आहे.
घराच्या आतून.. पुढे आलेल्या बाटलीच्या टोकावर जाळी लाऊन गिलावा केला जाईल.
प्रत्येक ओळीतील बाटल्यांना एका मजबुत दोरीने बांधून मग एकावर एक रचले जाते.. त्यामुळे बाटल्या एकावर एक पक्क्या बसतात.
*****************
१) प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बारीक खडी (ग्रीटपेक्षाही बारीक) भरून बाटल्या विटांप्रमाणे वापरल्या आहेत. हा या प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याने फायदे तोटे किंवा घराच्या आत गरम होणे किंवा वातावरणातील बदलाचे घरावर होणारे परिणाम कळायला वेळ लागेल.
२) सुमारे २० हजार बाटल्या गोळा करून हे काम सुरू केले आणि अजुनही तितक्याच बाटल्यांची गरज आहे.
३) आपण घरातल्या / आपल्या वापरानंतरच्या बाटल्या टाकून न देता यांना देऊ शकतो पण येथे असलेली बाटल्यांची गरज आणि एकंदर आकडा बघता एकेकट्याने बाटल्या देणे सोयीचे होणार नाही. एखादी सोसायटी किंवा किमान १० - १५ घरांनी मिळून बाटल्या साठवल्या तर वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे पडेल
४) मिपाकरांकडून हवी असलेली मदत पुढीलप्रमाणे,
-- तुमच्यापैकी कोणी अशाप्रकारच्या प्रोजेक्टवर काम केले असल्यास अशा पद्धतीतले फायदे तोटे काय असतात..?
-- एकाच ठिकाणी नियमीतपणे / भरपूर प्रमाणात बाटल्या मिळतील असे एखादे हॉटेल किंवा अशा प्रकारचा व्यवसाय तुमच्या बघण्यात असल्यास प्लीज माहिती द्या.
-- आणखी कांही सल्ला / शंका असल्यास जरूर प्रतिसादावे.

वाचने
10113
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण जवळच आहोत व आमच्या नरहे
दोन दिवसात तुला 200+ बाटल्या
साईझची कांही अट नाही. मिळतील
In reply to दोन दिवसात तुला 200+ बाटल्या by दशानन
तारेचे हुक लॉक का वापरात नाही
भन्नाट आहे कल्पना. अनेक शंका
भन्नाट आहे कल्पना. अनेक शंका
शेकिंग टेबलसारखे काहीतरी मशीन
व्हायब्रेटिंग फीडर बनवता येउ
In reply to शेकिंग टेबलसारखे काहीतरी मशीन by मोदक
अभिनव व भन्नाट उपक्रम.
आयडिया भारी आहे.
स्वागतार्ह कल्पना !
In reply to आयडिया भारी आहे. by अत्रे
1. https://youtu.be
प्लॅस्टिक वापरलं जातय
उपक्रमाला शुभेच्छा ! :
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सपनों में इंडिया है जाना है मुझको... :- Arash - Bombay Dreams (feat. Aneela & Rebecca)धागा टाकल्याबद्दल धन्यवाद मोदक,
>>एकाच ठिकाणी नियमीतपणे /
ह्म्म्म...
शुभ बोल नार्या
+1
In reply to शुभ बोल नार्या by मार्मिक गोडसे
अवांतर
लेख दिल्याबद्दल धन्यवाद. एकूण
वाळूपेक्षाही बारीक दगड आणि
Let's Drink
चालेल
In reply to Let's Drink by कपिलमुनी
रेल्वे रुळांवर फिरणार्या
वाह मोदकशेठ, स्तुत्य उपक्रम...