✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मराठी वाचवा असे म्हणण्या पेक्षा आपणच काहीतरी केले पाहीजे

ब
बाप्पा यांनी
Fri, 02/20/2009 - 11:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4942 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

संगणक

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/20/2009 - 11:54 नवीन
संगणक अभीयंता (B. E.) (B. E.) ला मराठी प्रतीशब्द हवा आहे. आमच्या एका मित्राला तो शब्द अर्पण करुन आम्हाला 'आपण काहितरी केले पाहिजे' ह्या अभियानाची सुरुवात करायची आहे ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

(B. E.)

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 02/20/2009 - 11:58 नवीन
पदवी bachelor पदविका diploma
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

(B. E.)

शेखर
Fri, 02/20/2009 - 12:00 नवीन
(B. E.) = अविवाहीत अभियंता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आणि...

सुनील
Fri, 02/20/2009 - 14:00 नवीन
M. E. = विवाहित अभियंता ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

अभियांत्र

सुचेल तसं
Fri, 02/20/2009 - 12:00 नवीन
अभियांत्रिकी पदवीधर तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो, तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो, मग माझं म्हणून काय असतं? -श्याम मनोहर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यु

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/20/2009 - 12:04 नवीन
प्रेषक सुचेल तसं ( शुक्र, 02/20/2009 - 12:00) . अभियांत्रिकी पदवीधर आपले धन्यवाद ! आता हा शब्द आम्ही अत्यंत उदात्त भावनेने 'बाप्पा' ह्यांना अर्पण करत आहे. आता जा आणी आपल्या माहीती पुस्तकात योग्य बदल करा ! ब्रम्हज्ञानी कोरडा पाषण ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मराथि शब्द

हरकाम्या
Sat, 02/21/2009 - 19:32 नवीन
इंजिनियरला प्रतिशब्द " अभियंता " आहे हे आपणास माहित नाही काय ? सरकारी पाट्या वाचा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मराठी

विसोबा खेचर
Fri, 02/20/2009 - 12:00 नवीन
मराठी वाचवा असे म्हणण्या पेक्षा आपणच काहीतरी केले पाहीजे आंतरजालावर मराठीचा अधिकाधिक प्रसार आणि प्रचार व्हावा या दृष्टीने जी काही मराठी संस्थळे आहेत त्यात मिपाची भर टाकून आम्ही थोडासा हातभार लावला आहे... शिवाय होता होईल तोवर आम्ही इतरही सगळीकडे मराठीचाच आग्रह धरतो.. तात्या.
  • Log in or register to post comments

तात्या,

बाप्पा
Fri, 02/20/2009 - 12:05 नवीन
तात्या, आम्ही आपणाशी निर्विवाद पणे सहमत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

Mobile साठी अजून एक

सातारकर
Fri, 02/20/2009 - 12:09 नवीन
कर्णपिशाच्च
  • Log in or register to post comments

ऑफिस मधे

मराठी_माणूस
Fri, 02/20/2009 - 14:13 नवीन
ऑफिस मधे मराठी माणसाशी मराठीतच बोलतो , भले तो कोणत्याही भाषेत बोलो. बर्‍याचदा तो , आजुबाजुला अन्य भाषीक असतील तर हींदी किंवा ईंग्रजीत बोलतो , पण मी त्याच्याशी मराठीतच चालु ठेवतो. (अवांतरः ऑफिस मधल्या मराठी चा आग्रह धरणार्‍या अन्य एका सहकार्‍याचा दुसरा एक मराठी भाषीक 'राज' चा माणूस म्हणून उपहास करतो आणि तेही परप्रांतीया समोर)
  • Log in or register to post comments

सही करता

दशानन
Fri, 02/20/2009 - 14:15 नवीन
सही करता ! मला तसं करता येणार नाही .. इकडे कोणी मराठी नाहीच आहे.. पण मी महाराष्ट्रात कुठे ही फोन केला तर ९९% मराठीतूनच बोलण्याचा प्रयत्न करतो. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

हे बरिक खर हो.....

विटेकर
Fri, 02/20/2009 - 16:13 नवीन
Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन आवडले. आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

नवीन शब्द

अमित.कुलकर्णी
Sat, 02/21/2009 - 04:18 नवीन
नवीन मराठी शब्द तयार करून वापरणार असू तर चांगलंच आहे पण हल्ली ऐकू येत असलेल्या काही साध्या वाक्यरचनांमध्ये थोडे बदल केले तर ते जरा बरे वाटतील. काही उदाहरणे - १. मी त्याची हेल्प केली --- मी त्याला मदत केली २. त्याचं पॅकेज सेव्हन पॉईंट फाईव्ह आहे ----- त्याला साडेसात लाख रुपये पगार मिळतो ३. पहिल्या वन डे मधे सचिनची फिफ्टी --- पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिनचे अर्धशतक (एका वृत्तमित्रात असली वाक्ये असतात.. पत्र नव्हे मित्र. आणि हे उदाहरण फक्त वृत्तपत्रीय लेखी भाषेबद्दल दिले आहे रोजच्या बोलण्याबद्दल नाही.) ४. मला फोन करायला टाईम भेटला नाही - मला फोन करायला वेळ झाला नाही ("फोन" शब्द न बदलताही दुसरे वाक्य अधिक मराठी वाटते) ५. संडेला तू बिझी आहेस का? ---- रविवारी तुला काम आहे का? (आणि जमेल तितके शुद्धलेखनाकडेही लक्ष दिल्यास उत्तम. कारण "तू" या शब्दातल्या उकाराचा उच्चार मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेत दीर्घ केला जातो - केवळ म्हणून तरी "तु" असे लिहू नका असे माझे म्हणणे आहे. हे करणे आपण आज थांबविले आणि प्रत्येकजण स्वतःच्या नियमांप्रमाणे लिहू लागला तर तर अजून १० वर्षांनी "तू" हा एकेकाळी दीर्घ का लिहिला जायचा हे कुणाला सांगताही येणार नाही. त्यात काही वावगे वाटत नसल्यास सोडून द्या!) -अमित
  • Log in or register to post comments

नावे उलट करून बघू

विकास
Sat, 02/21/2009 - 05:18 नवीन
आपण इंग्रजीला मराठी आणि मराठी म्हणले तर कदाचीत नवीन इंग्रजीच्या म्हणजेजुन्या मराठीच्या वेडापायी आपोआप खरी मराठी वाचेल. :-) अर्थात तसे वेड लागण्यासाठी काय लागेल? - अर्थातच मराठी माणसाकडे मराठीपणा न सोडता देखील भांडवलासारखा पैसा आहे आणि त्याचे उद्योग आहेत अथवा ज्याच्यात तो आहे त्याच्यात तो पैसा करू शकतो, आंतर्राष्ट्रीय होवू शकतो, असे समजल्यास आपोआप मराठी वाचेल...
  • Log in or register to post comments

अमित

१.५ शहाणा
Sat, 02/21/2009 - 07:08 नवीन
१. मी त्याची हेल्प केली --- मी त्याला मदत केली २. त्याचं पॅकेज सेव्हन पॉईंट फाईव्ह आहे ----- त्याला साडेसात लाख रुपये पगार मिळतो ३. पहिल्या वन डे मधे सचिनची फिफ्टी --- पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिनचे अर्धशतक (एका वृत्तमित्रात असली वाक्ये असतात.. पत्र नव्हे मित्र. आणि हे उदाहरण फक्त वृत्तपत्रीय लेखी भाषेबद्दल दिले आहे रोजच्या बोलण्याबद्दल नाही.) ४. मला फोन करायला टाईम भेटला नाही - मला फोन करायला वेळ झाला नाही ("फोन" शब्द न बदलताही दुसरे वाक्य अधिक मराठी वाटते) ५. संडेला तू बिझी आहेस का? ---- रविवारी तुला काम आहे का? सहमत मी जरुर याच प्रकारे बोलेन (इंप्लिमेंट ?करेन)
  • Log in or register to post comments

गॉसिप

शिवापा
Sat, 02/21/2009 - 22:25 नवीन
मार्लिश मधे मध्यंतरी एका मुलिचे दुसर्या मुलीबरोबर चाललेले एक गॉसिप कानावर पडले होते. "चांगला आहे गं तो. स्वताची सॉफ्टवेअर कंपनी आहे पण देअर आर सो मेनी छोट्या छोट्या कंपन्याज ना! आता मला गॉसिप शब्दासाठि तेव्हढाच मसालेदार शब्द द्या. स्वगत. (इंग्लिश भाषेवर असे बलात्कार करनार्‍या विरोधात इंग्रज लोक मराठी लोकांचे काहिच कसे करत नाहित?)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा